Mental Health Tip : धावपळीच्या आयुष्यात शांतता हवीय? मग 'हा' मंत्र वापरुन पहा, मानसिक शांतता मिळेल
‘साँटर’ म्हणजे घाईगडबड न करता, कोणत्याही स्पर्धेचा विचार न करता निवांतपणे चालणे. हा दिवस १९७९ मध्ये अमेरिकेतील मिशिगन राज्यातील मॅकिनॅक आयलंड येथे जनसंपर्क तज्ज्ञ डब्ल्यू. टी. राबे यांनी सुरू केला. त्या काळात जॉगिंग आणि वेगवान व्यायाम प्रकारांची लोकप्रियता वाढत होती. त्याला पर्याय म्हणून जीवनातील साध्या क्षणांचा आनंद घेण्यासाठी आणि निसर्गाशी नाते जोडण्यासाठी त्यांनी ‘साँटरिंग’ची संकल्पना पुढे आणली. आज या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
भारतात मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अहवालानुसार, देशातील सुमारे १० ते ११ टक्के नागरिकांना आयुष्यात कधीतरी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, १५ कोटींहून अधिक नागरिकांना मानसिक आरोग्य सेवांची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, देशातील ५.६ कोटी नागरिक नैराश्याने तर ३.८ कोटी नागरिक चिंताविकाराने प्रभावित आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक संशोधनांमध्ये ताणतणाव, चिंता आणि नैराश्य यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. अशा वेळी निवांत चालणे हा मानसिक आरोग्यासाठी प्रभावी उपाय मानला जातो. चालताना मन शांत होते, विचारांची गर्दी कमी होते आणि शरीरातील ताण कमी होण्यास मदत होते. विशेषतः उद्याने, झाडांनी नटलेले रस्ते किंवा निसर्गरम्य ठिकाणी फेरफटका मारल्यास त्याचा सकारात्मक परिणाम अधिक जाणवतो.
डॉ. शुभांगी तेरकर, जनरल फिजिशियन सांगतात, ‘तंत्रज्ञानाच्या युगात माणूस जगाशी जोडला गेला असला तरी स्वतःपासून दूर जात असल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जाते. त्यामुळे जागतिक साँटरिंग डे हा केवळ चालण्याचा दिवस नाही, तर स्वतःशी संवाद साधण्याची, निसर्गाशी नाते दृढ करण्याची आणि मानसिक शांतता शोधण्याची संधी आहे. कदाचित काही किलोमीटर धावण्यापेक्षा काही मिनिटे निवांत चालणेच आपल्याला अधिक समाधान आणि आनंद देऊ शकते.’
World Blood Donor Day : एक थेंब आशेचा! रक्तदानात महाराष्ट्र आघाडीवर; 10 लाखांचा आकडा होतोय पार






