Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुले दाम्पत्याने सुरु केली देशातील पहिली मुलींची शाळा; जाणून घ्या 01 जानेवारीचा इतिहास

१ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात फुले दाम्पत्यांनी ही शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः मुलींना शिक्षणाचे धडे दिले. त्यामुळे त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 01, 2026 | 10:54 AM
Jyotiba Phule Savitribai Phule started indias first school for women in Pune Bhide Wada 1 January

Jyotiba Phule Savitribai Phule started indias first school for women in Pune Bhide Wada 1 January

Follow Us
Follow Us:

स्त्रीच्या हातामध्ये पाटी पुस्तक देणाऱ्या जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आजच्या दिवशी देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात फुले दाम्पत्यांनी ही शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः मुलींना शिक्षणाचे धडे दिले. त्यामुळे त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. या ऐतिहासिक घटनेमुळे भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि समाजात स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.

 

01 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1756 : निकोबार बेटांचा ताबा डेन्मार्कने घेतला आणि त्याला नवीन डेन्मार्क असे नाव दिले.
  • 1772 : लंडन क्रेडिट एक्सचेंज कंपनीने 90 युरोपियन शहरांमध्ये वापरता येणारे पहिले ट्रॅव्हलर्स चेक जारी केले.
  • 1788 : द टाइम्स ऑफ लंडनची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
  • 1808 : अमेरिकेत गुलामांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली.
  • 1818 : भीमा कोरेगाव येथे, एफ. एफ. स्टँटन यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने, केवळ 500 सैनिकांसह, पेशव्यांच्या 25,000 सैन्याचा पराभव केला.
  • 1842 : बाबा पद्मनाजींचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.
  • 1848 : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली.
  • 1862 : भारतीय दंड संहिता अस्तित्वात आली.
  • 1880 : विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, जी.जी. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
  • 1883 : पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना झाली..
  • 1899 : क्युबातील स्पॅनिश राजवट संपली.
  • 1900 : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
  • 1919 : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
  • 1923 : चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
  • 1932 : डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले.
  • 1983 : ARPANET अधिकृतपणे TCP/IP, इंटरनेट प्रोटोकॉल वापरून प्रभावीपणे इंटरनेट तयार करण्यासाठी बदलले.
  • 1995 : जागतिक व्यापार संघटना (WTO) ची स्थापना झाली.
  • 1999 : युरोपियन युनियनच्या 11 सदस्य राष्ट्रांमध्ये युरो चलन सुरू करण्यात आले
  • 2001 : ग्रीसने युरो चलन स्वीकारले, 12वा युरोझोन देश बनला
  • 2023 : क्रोएशियाने अधिकृतपणे युरो चलन स्वीकारले, 20 वा युरोझोन देश बनला.
हे देखील वाचा : ‘रशियाच्या विजयानेच युद्ध संपेल…’ नवीन वर्षाच्या पहाटे Putin यांची डरकाळी; Ukraine युद्धाबाबत जगाला दिला ‘हा’ मोठा इशारा

01 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1662 : ‘बाळाजी विश्वनाथ भट’ – पहिला पेशवा यांचा जन्म. (मृत्यू : 12 एप्रिल 1720)
  • 1879 : ‘इ. एम. फोर्स्टर’ – ब्रिटिश साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 1970)
  • 1892 : ‘महादेव देसाई’ – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑगस्ट 1942)
  • 1894 : ‘सत्येंद्रनाथ बोस’ – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 फेब्रुवारी 1974)
  • 1900 : ‘श्रीकृष्ण नारायण रातंजनकर’ – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू यांचा जन्म. (मृत्यू : 14 फेब्रुवारी 1974)
  • 1902 : ‘कमलाकांत वामन केळकर’ – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 1971)
  • 1918 : ‘शांताबाई दाणी’ – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी यांचा जन्म. (मृत्यू : 9 ऑगस्ट 2002)
  • 1923 : ‘उमा देवी खत्री उर्फ टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका यांचा जन्म. (मृत्यू : 24 नोव्हेंबर 2003)
  • 1928 : ‘डॉ. मधुकर आष्टीकर’ – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 22 मे 1998)
  • 1935 : ‘ओम प्रकाश चौटाला’ – हरियाणाचे 7 वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 20 डिसेंबर 2024)
  • 1936 : ‘राजा राजवाडे’ – साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जुलै 1997)
  • 1941 : ‘गोवर्धन असरानी’ – चित्रपट कलाकार यांचा जन्म.
  • 1943 : ‘रघुनाथ माशेलकर’ – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते यांचा जन्म.
  • 1950 : ‘दीपा मेहता’ – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका यांचा जन्म.
  • 1951 : ‘नाना पाटेकर’ – अभिनेते यांचा जन्म.
हे देखील वाचा : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर

01 जानेवारी मृत्यू दिनविशेष

  • 1515 : ‘लुई (बारावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 27 जून 1462)
  • 1748 : ‘जोहान बर्नोली’ – स्विस गणितज्ञ यांचे निधन.
  • 1894 : ‘हेन्‍रिच हर्ट्‌झ’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 22 फेब्रुवारी 1857)
  • 1944 : ‘सर एडविन लुटेन्स’ – दिल्लीचे नगररचनाकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1869)
  • 1955 : ‘डॉ. शांतिस्वरूप भटनागर’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1975 : ‘शंकरराव वासुदेव किर्लोस्कर’ – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार यांचे निधन. (जन्म : 8 ऑक्टोबर 1891)
  • 1989 : ‘दिनकर साक्रीकर’ – समाजवादी विचारवंत व पत्रकार यांचे निधन.
  • 2009 : ‘रामाश्रेय झा’ – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान यांचे निधन. (जन्म : 11 ऑगस्ट 1928)

Web Title: Jyotiba phule savitribai phule started indias first school for women in pune bhide wada 1 january

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • new year 2026

संबंधित बातम्या

August 11 History: आज राष्ट्रीय मुलगा आणि मुलगी दिवस; जाणून घ्या ११ ऑगस्टचा इतिहास..
1

August 11 History: आज राष्ट्रीय मुलगा आणि मुलगी दिवस; जाणून घ्या ११ ऑगस्टचा इतिहास..

International Biodiesel Day: आज आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिवस; जाणून घ्या १० ऑगस्टचा इतिहास….
2

International Biodiesel Day: आज आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिवस; जाणून घ्या १० ऑगस्टचा इतिहास….

August 9 History: आज कांती दिवस; जाणून घ्या ९ ऑगस्टचा इतिहास..
3

August 9 History: आज कांती दिवस; जाणून घ्या ९ ऑगस्टचा इतिहास..

Sushma Swaraj : आज सुषमा स्वराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ६ ऑगस्टचा इतिहास..
4

Sushma Swaraj : आज सुषमा स्वराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ६ ऑगस्टचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.