Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Labour Day 2025: श्रमिकांच्या हक्कांचा जागर आणि संघर्षाच्या इतिहासाची आठवण

International Labour Day 2025 : 1 मे रोजी दरवर्षी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणजे केवळ एक दिवस नव्हे, तर श्रमिकांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि हक्कांसाठी लढ्याचा जागर आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 04, 2025 | 11:59 AM
Labour Day 2025 Workers' rights and historic struggle

Labour Day 2025 Workers' rights and historic struggle

Follow Us
Close
Follow Us:

International Labour Day 2025 : १ मे रोजी दरवर्षी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणजे केवळ एक दिवस नव्हे, तर श्रमिकांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि हक्कांसाठी लढ्याचा जागर आहे. २०२५ मध्ये हा दिवस गुरुवारी, १ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी जगभरातील कामगार, संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि शासनसंस्था एकत्र येऊन कामगारांच्या हक्कांवर, त्यांच्या सुरक्षिततेवर आणि श्रमाच्या प्रतिष्ठेवर चर्चा करतात.

कामगार दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा उगम १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील कामगार चळवळीमध्ये झाला. त्या काळात कामाचे तास, वेतन, सुरक्षितता यांचे कोणतेही ठोस नियम नव्हते. १८८४ मध्ये फेडरेशन ऑफ ऑर्गनाइज्ड ट्रेड्स अँड लेबर युनियन या संघटनेने घोषणा केली की, १ मे १८८६ पासून कामगार फक्त ८ तास काम करतील. याच्या समर्थनार्थ शिकागो शहरात लाखो कामगारांनी संप पुकारला. ३ मे रोजी मॅककॉर्मिक हार्वेस्टिंग मशीन कंपनीसमोरच्या हिंसाचारात दोन कामगार पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले. दुसऱ्या दिवशी, म्हणजे ४ मे रोजी झालेल्या हेमार्केट निदर्शनादरम्यान बॉम्बस्फोट झाला आणि पोलिसांसह अनेकांचा बळी गेला. ही घटना कामगार चळवळीचा निर्णायक क्षण ठरली. याच पार्श्वभूमीवर, १८८९ मध्ये पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेमध्ये १ मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून घोषित करण्यात आला.

भारतातील कामगार दिनाची सुरुवात

भारतामध्ये १ मे १९२३ रोजी मद्रास (सध्याचे चेन्नई) येथे कामगार किसान पक्षाने प्रथमच कामगार दिन साजरा केला. यानंतर देशभरात कामगार हक्कांसाठी लढा अधिक संघटित झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’, चीन-अमेरिका करारानंतर नवा संकेत

कामगार दिन 2025: यंदाची थीम

२०२५ साली आंतरराष्ट्रीय कामगार दिन कोणती जागतिक थीम घेऊन साजरा होणार हे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, प्रत्येक देश आपापल्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीनुसार यासंबंधीचे विषय स्वीकारतो. समान, सुरक्षित आणि समावेशक कार्यस्थळे निर्माण करणे हा यंदाचाही केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

श्रमिकांच्या हक्कांची गरज आणि आजचे वास्तव

आजही अनेक देशांत कामगारांचे हक्क डावलले जात आहेत. कमी वेतन, असुरक्षित कामाचे ठिकाण, जादा कामाचे तास आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव ही संकटे अद्यापही अस्तित्वात आहेत. या समस्यांवर जागतिक स्तरावर तोडगा काढण्यासाठी आणि कामगारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या दिवशी रॅली, चर्चासत्रे, मोर्चे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Khamenei declares victory : ‘इराणनेच जिंकला रणसंग्राम…’ खामेनेईंनी बंकरमधूनच केली विजयाची घोषणा, इस्रायलला कडवा इशारा

कामगार दिन 2025

कामगार दिन 2025 हा केवळ एक औपचारिक साजरा नसून, श्रमिकांच्या सन्मानाचा, त्यांच्या हक्कांच्या मागणीचा आणि सामाजिक न्यायासाठीच्या जागृतीचा दिवस आहे. १ मे हा दिवस आठवण करून देतो की, जगातील प्रत्येक प्रगतीमागे कामगाराचा घाम असतो आणि त्या घामाला योग्य मूल्य, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेची हमी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: Labour day 2025 workers rights and historic struggle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 10:14 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?
1

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत…  मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!
2

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
3

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Independence Day 2025: नेताजींना वाचवण्यासाठी पतीची हत्या, पुढे सेल्युलर जेलमध्ये स्तन कापून काढले! कथा पहिल्या महिला गुप्तहेराची
4

Independence Day 2025: नेताजींना वाचवण्यासाठी पतीची हत्या, पुढे सेल्युलर जेलमध्ये स्तन कापून काढले! कथा पहिल्या महिला गुप्तहेराची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.