Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sea Buckthorn: 28 हजार रुपये प्रति लिटर तेल! लडाखच्या ‘या’ सोन्यासारख्या फळामागे का लागल्यात मोठ्या कंपन्या?

Sea Buckthorn : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी इंस्टाग्रामवर सी बकथॉर्नचा एक फोटो शेअर केला आहे. हे लडाखमध्ये १४,००० फूट उंचीवर वाढते. त्याची मागणी वाढत आहे. ते विशेष का आहे, हे जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 24, 2026 | 11:30 AM
Sea Buckthorn Ladakh Sea Buckthorn Benefits and Price Ladakh GI Tag Products

Sea Buckthorn Ladakh Sea Buckthorn Benefits and Price Ladakh GI Tag Products

Follow Us
Follow Us:
  • लडाखचे ‘सुवर्ण फळ’
  • पोषक तत्त्वांचा खजिना
  • आर्थिक अन् औद्योगिक भरारी

वाळवंटी भाग आणि हाडे गोठवणारी थंडी अशी ओळख असलेल्या लडाखच्या पर्वतरांगांमध्ये सध्या एका लहानशा नारंगी रंगाच्या फळाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या फळाचे नाव आहे ‘सी बकथॉर्न’ (Sea Buckthorn). नुकतेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोशल मीडियावर लडाखच्या या भौगोलिक मानांकन (GI Tag) प्राप्त फळाचे छायाचित्र शेअर करत त्याला ‘लडाखचे सोने’ (Gold of Ladakh) असे संबोधित केले. अत्यंत प्रतिकूल वातावरणात नैसर्गिकरीत्या उगवणारे हे फळ केवळ लडाखच्या पर्यावरणाचे रक्षण करत नाही, तर स्थानिक शेतकरी आणि उद्योजकांसाठी अर्थार्जनाचा मोठा स्त्रोत ठरत आहे.

हिमालयीन क्षेत्रातील १४,००० फूट उंचीवर जिथे सामान्य पिके किंवा झाडे जगू शकत नाहीत, तिथे सी बकथॉर्न अत्यंत सहजतेने बहरते. देशात एकूण १३,००० हेक्टर क्षेत्रात या वनस्पतीची लागवड किंवा नैसर्गिक पैदास होते, ज्यापैकी तब्बल ७० टक्क्यांहून अधिक भाग एकट्या लडाख केंद्रशासित प्रदेशात आहे. लडाखशिवाय हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती, किन्नौर तसेच उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या उंच भागातही ही वनस्पती आढळते. जागतिक बाजारात चीन ही या फळाची सर्वात मोठी बाजारपेठ असली, तर भारतात लडाख हे सी बकथॉर्नचे मुख्य केंद्र बनले आहे.

नापीक जमिनीत उगवणारे नैसर्गिक वरदान

सी बकथॉर्न ही एक अशी वैशिष्ट्यपूर्ण झुडूपवर्गीय वनस्पती आहे, जी उणे ४० अंश सेल्सिअस थंडीपासून ते तीव्र उन्हाळ्याचा सामना करू शकते. ४,००० ते १४,००० फूट उंचीवरील वालुकामय, खडकाळ आणि पाणी धरून न ठेवणाऱ्या जमिनीतही ही वनस्पती मुळे घट्ट रोवून राहते. या वनस्पतीची मुळे जमिनीची धूप रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यामुळे लडाखसारख्या संवेदनशील परिसंस्थेत जमिनीचे वाळवंटीकरण रोखण्यात या वनस्पतीचा मोलाचा वाटा आहे.

लडाखमधील सी बकथॉर्नची शेती ही पूर्णपणे निसर्गनिर्मित आणि सेंद्रिय आहे. येथे कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे या फळाची गुणवत्ता आणि त्यातील औषधी गुणधर्म जगात सर्वोत्तम मानले जातात. सरकारी आकडेवारीनुसार, लडाखमध्ये दरवर्षी सुमारे ६०० टन बेरीचे उत्पादन घेतले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?

‘सुपरफूड’ का मानले जाते हे लहान फळ?

सी बकथॉर्नला वैज्ञानिकांनी आणि पोषणतज्ज्ञांनी ‘सुपरफूड’चा दर्जा दिला आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे या लहानशा बेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी चे प्रचंड प्रमाण. सामान्य लिंबाच्या तुलनेत सी बकथॉर्नमध्ये कित्येक पट जास्त व्हिटॅमिन सी आढळते. याव्यतिरिक्त, यात व्हिटॅमिन ई, कॅरोटीनॉइड्स, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स आणि मुबलक अँटीऑक्सिडंट्स असतात.

Ladakh’s GOLD 🏔️🧡 GI-tagged Seabuckthorn of Ladakh is a remarkable gift of nature, known for its exceptional vitamin content and rich nutritional profile. A golden treasure of India’s natural heritage, empowering local livelihoods and advancing global wellness. https://t.co/RsNIznGzyP — Piyush Goyal (@PiyushGoyal) October 20, 2026

credit – social media and Twitter

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या फळाच्या गरामध्ये आणि बियांमध्ये ओमेगा-३, ६, ९ आणि अत्यंत दुर्मिळ मानले जाणारे ओमेगा-७ (Omega-7) फॅटी ॲसिड विपुल प्रमाणात असते. ओमेगा-७ मुळेच या फळाला जागतिक आरोग्य आणि सौंदर्याच्या बाजारात विशेष मागणी आहे. मानवी त्वचेचे पोषण करणे, पेशींचे पुनरुज्जीवन करणे आणि पचनसंस्था सुदृढ ठेवण्यात ओमेगा-७ अत्यंत प्रभावी ठरते.

जीआय टॅगमुळे ओळखीला आंतरराष्ट्रीय अधिमानता

लडाखच्या उद्योग आणि वाणिज्य विभागाला ‘लडाख सी-बकथॉर्न’साठी अधिकृत GI Tag (Geographical Indication) मिळाला आहे. लडाखला मिळालेला हा चौथा जीआय टॅग आहे. जीआय टॅग मिळाल्यामुळे लडाखच्या मूळ उत्पादनाची ओळख सुरक्षित झाली असून बाजारात बनावट उत्पादनांना आळा बसणार आहे. तसेच, स्थानिक शेतकऱ्यांना आणि प्रक्रिया उद्योगांना त्यांच्या उत्पादनासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात योग्य आणि जास्त भाव मिळणे शक्य झाले आहे.

काढणीतील आव्हाने आणि तंत्रज्ञानाची मदत

सी बकथॉर्नच्या झुडपांवर अणकुचीदार काटे असतात. त्यामुळे हाताने फळे तोडणे हे स्थानिक महिला आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण आणि कष्टाचे काम असते. फळे तोडताना ती फुटण्याचा आणि नुकसान होण्याचा धोका असतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) अंतर्गत येणाऱ्या DIHAR (Defense Institute of High Altitude Research) या संस्थेने एक विशेष ‘इलेक्ट्रिक हार्वेस्टर’ विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे कमी वेळेत आणि काटे न बोचता फळांची सुरळीत काढणी करणे शक्य झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Science Mysteries: पक्षी पुरुषांपेक्षा स्त्रियांना पाहिल्यावर अधिक वेगाने जातात उडून; शास्त्रज्ञांसमोर नवे वैज्ञानिक कोडे

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून प्रचंड मागणी

सी बकथॉर्नच्या फळांचा वापर केवळ खाण्यासाठी किंवा ज्यूस बनवण्यासाठी होत नाही, तर त्याचा व्याप्ती उद्योग जगतात मोठी आहे:

  • हर्बल व न्यूट्रास्युटिकल ब्रँड्स: २०१५ मध्ये डीआरडीओने सी-बकथॉर्न आधारित उत्पादनांचे पेटंट आणि तंत्रज्ञान पतंजली आयुर्वेदाला हस्तांतरित केले होते. त्याआधी डीआरडीओने लडाख फूड्सच्या सहकार्याने ‘लेह बेरी’ (Leh Berry) हा प्रसिद्ध ज्यूस ब्रँड बाजारात आणला होता.
  • चहा आणि सौंदर्यप्रसाधने: सी बकथॉर्नच्या पानांपासून बनवल्या जाणाऱ्या हर्बल टी (चहा) चे तंत्रज्ञान खाजगी कंपन्यांना देण्यात आले असून हा चहा जगभरातील ५ हून अधिक देशांमध्ये निर्यात केला जातो.
  • महागडे तेल आणि आंतरराष्ट्रीय दर: सी बकथॉर्नच्या बिया आणि गरापासून काढले जाणारे तेल कॉस्मॅटिक्स आणि स्किनकेअर इंडस्ट्रीत अत्यंत महागड्या दराने विकले जाते. स्थानिक उद्योजकांच्या माहितीनुसार, या बेरीच्या गराचे तेल सुमारे २०,००० ते २२,००० रुपये प्रति लिटर आणि बियांचे तेल तब्बल २८,००० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

लडाख प्रशासनाच्या नवीन धोरणांमुळे आणि तंत्रज्ञानाच्या पाठबळामुळे सी बकथॉर्न हे केवळ एक जंगली फळ न राहता लडाखच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे आणि स्थानिकांना शाश्वत रोजगार देणारे एक ‘गोल्डन क्रॉप’ ठरत आहे.

Web Title: Ladakh sea buckthorn superfood gi tag benefits and market demand hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Ladakh
  • Piyush Goyal
  • World news

संबंधित बातम्या

Saudi Arabia : ईश्वरनिंदेचा आरोप अन् थेट फाशीची शिक्षा; जाणून घ्या श्रीलंकेने तरीही कसा वाचवला नागरिकाचा जीव?
1

Saudi Arabia : ईश्वरनिंदेचा आरोप अन् थेट फाशीची शिक्षा; जाणून घ्या श्रीलंकेने तरीही कसा वाचवला नागरिकाचा जीव?

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?
2

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?

Alberta Referendum: कॅनडाचे 2 तुकडे होण्यापासून टळले; भारतीय मतदारांच्या ‘या’ एका निर्णयामुळे इतिहासाला कलाटणी
3

Alberta Referendum: कॅनडाचे 2 तुकडे होण्यापासून टळले; भारतीय मतदारांच्या ‘या’ एका निर्णयामुळे इतिहासाला कलाटणी

Science Mysteries: पक्षी पुरुषांपेक्षा स्त्रियांना पाहिल्यावर अधिक वेगाने जातात उडून; शास्त्रज्ञांसमोर नवे वैज्ञानिक कोडे
4

Science Mysteries: पक्षी पुरुषांपेक्षा स्त्रियांना पाहिल्यावर अधिक वेगाने जातात उडून; शास्त्रज्ञांसमोर नवे वैज्ञानिक कोडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.