Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Laughter Day: हास्य योगाने स्वस्थ ‘आरोग्य’

जागतिक हास्य दिन दरवर्षी ५  मे रोजी साजरा केला जातो आणि यावर्षी तो रविवारी साजरा केला जाईल. जागतिक हास्य दिनाची सुरुवात १९९८ मध्ये जागतिक हास्य योग चळवळीचे दूरदर्शी डॉ. मदन कटारिया यांच्या प्रयत्नातून झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 03, 2025 | 11:59 PM
World Laughter Day: हास्य योगाने स्वस्थ ‘आरोग्य’
Follow Us
Close
Follow Us:

पुणे/प्रगती करंबेळकर: ‘हास्य योगा’ मानसिक आणि शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी प्रभावी उपाय आहे. आज जगभर हास्य दिवस साजरा केला जातो जागतिक हास्य दिन हास्याची कला आणि व्यक्तींना ताजेतवाने आणि बरे करण्याची त्याची उल्लेखनीय क्षमता साजरी करण्यासाठी समर्पित आहे. हा आपल्या दैनंदिन जीवनात विनोद आणि हास्याचे महत्त्व लक्षात घेण्याचा क्षण आहे. हा वार्षिक उत्सव मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

जागतिक हास्य दिन दरवर्षी ५  मे रोजी साजरा केला जातो आणि यावर्षी तो रविवारी साजरा केला जाईल. जागतिक हास्य दिनाची सुरुवात १९९८ मध्ये जागतिक हास्य योग चळवळीचे दूरदर्शी डॉ. मदन कटारिया यांच्या प्रयत्नातून झाली. भारतातील एक सराव करणारे फॅमिली डॉक्टर, डॉ. कटारिया यांनी चेहऱ्यावरील अभिप्राय गृहीतकातून प्रेरणा घेतली, जे सूचित करते की चेहऱ्यावरील हावभाव भावनांवर प्रभाव टाकू शकतात, आणि हास्य योग चळवळ सुरू केली.

मदन काटरिया यांच्या शिष्य अर्चना राव यांच्याशी हास्य योगा बद्दल संवाद साधला. त्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट जीवनापासून ते लाफ्टर योगा इंडियाच्या स्थापने पर्यंतचा प्रवास सांगितला त्या म्हणाल्या ” लाफ्टर योगा हे स्वस्थ आरोग्य ठेवण्यासाठी उपयोगी पडते. मी जेव्हा मानसिक तणावात होते आणि हसण्यासाठी कारण शोधत होते तेव्हा मला मदन कटारिया यांचा विडियो दिसला आणि मी त्या पासून ठरवलं की या हास्य योगा मधूनच लोकांना हसण्याचे महत्व सांगायचे आणि मग मी लाफ्टर योगा इंडियाची स्थापना केली. जेव्हा मी हास्य योगा सुरु केला तेव्हा मला मायग्रेन चा त्रास होता हास्य योगाने तो आता दूर झाला. ‘लाफ्टर योगा इंडिया’ दहा वर्ष झाली मी जवळजवळ ६०, ००० पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षण दिले. कॅन्सर, एड्स सारख्या रुग्णांनाही प्रशिक्षण दिले आहे. ज्यां रुग्णांकडे जगण्यासाठी कमी वेळ असतो आणि जेव्हा ते सगळं विसरून खळखळून हसतात तेव्हा माझ्या कामाचा हेतू पूर्ण झाल्यासारखा मला वाटतो.

अर्चना राव यांच्या ‘लाफ्टर योगा इंडिया’ संस्थचे ब्रीदवाक्य आहे ‘ उद्या नसल्यासारखे जगा’ या ब्रीद वाक्यावर त्या अर्चना म्हणाल्या , “कोरोनाच्या वेळी कळले की आयुष्य किती क्षणभंगूर आहे उद्या आपण असू की नाही याची शाश्वती नाही म्हणूनच उद्या नसल्यासारखे जगा आणि हसा”

हास्य योगाबद्दल सांगताना अर्चना राव यांनी वेगवेगळ्या योगाचे प्रकार सांगितले. त्या हे योगाचे प्रकार सांगाताना म्हणाल्या ज्या गोष्टी कडे पाहून आपल्या वाईट वाटत तणाव येतो त्या गोष्टीकडे बघून हसायचं जसं की वृद्धांसाठी त्यांच्या आरोग्याचा अहवालास पाहत हसण्याचा योगा, शालेय मुलांसाठी त्यांचे श्रेणी पुस्तकाकडे बघत हसण्याचा योगा, कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचा त्यांच्या न वाढलेल्या पागरकडे बघत हसणारा योगा असे विलक्षण योगा त्या घेतात. त्यांच्या म्हणण्यानुसार खोटं हसणेही आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.

हास्य योगाचे फायदे

– मानसिक तणाव दूर होतो
– रोगप्रतिकारक शक्ती वाढते
– शारीरिक थकवा दूर होतो
– हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते.

Web Title: Laughter yoga is an effective way to maintain mental and physical health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 11:59 PM

Topics:  

  • navarashtra special
  • navarashtra special story
  • pune news

संबंधित बातम्या

शनिवारवाडा ते स्वारगेट भूमिगत रस्त्याला ‘ब्रेक’; सार्वजनिक बांधकाम नव्हे तर पुणे महापालिकेवर जबाबदारी; मुख्यमंत्र्यांच्या सूचना
1

शनिवारवाडा ते स्वारगेट भूमिगत रस्त्याला ‘ब्रेक’; सार्वजनिक बांधकाम नव्हे तर पुणे महापालिकेवर जबाबदारी; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
2

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

दहीहंडीनिमित्त पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात
3

दहीहंडीनिमित्त पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

‘हा’ खास दिवस म्हणजे ‘Greatness University’ पासून ‘World Book of Greatness’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
4

‘हा’ खास दिवस म्हणजे ‘Greatness University’ पासून ‘World Book of Greatness’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.