Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Independence Day 2025 : भारत-पाकिस्तान सीमारेषा काढणाऱ्या व्यक्तीने कधीही भारतीय भूमीवर पाऊल ठेवले नव्हते. ही सीमा लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या फाळणीच्या दुर्घटनेचे कारण बनली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 15, 2025 | 02:45 PM
Independence Day 2025 The man who drew the India-Pakistan border had never seen it

Independence Day 2025 The man who drew the India-Pakistan border had never seen it

Follow Us
Close
Follow Us:

Independence Day 2025 : भारत आज आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, ७८ वर्षांपूर्वी घडलेल्या एका ऐतिहासिक आणि हृदयद्रावक घटनेची आठवण होते  फाळणीची कहाणी. देशाच्या नकाशावर आज ज्या भारत-पाकिस्तान सीमारेषा दिसतात, त्या आखणारा माणूस असा होता, ज्याने त्या आधी कधीही भारतीय भूमीवर पाऊलसुद्धा ठेवले नव्हते. त्याचे नाव होते सर सिरिल रॅडक्लिफ.

ब्रिटिश वकिलाकडे ‘सीमा रेषा’ आखण्याचे अवघड काम

ब्रिटनमधील सुप्रसिद्ध वकील सर सिरिल रॅडक्लिफ यांची सीमा आयोगाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. १७ कोटी लोकसंख्या असलेल्या या उपखंडाचा नकाशा तयार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना फक्त ५ आठवडे दिले. त्यांना पंजाब आणि बंगालचे विभाजन करून हिंदू आणि मुस्लिम बहुल भागांच्या आधारे दोन राष्ट्रे  भारत आणि पाकिस्तान निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली. परंतु रॅडक्लिफ यांना भारताचा भूगोल, राजकारण वा सांस्कृतिक पार्श्वभूमीची कोणतीही माहिती नव्हती.

हे देखील वाचा : 15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा

माहिती जुनी, वास्तव वेगळे

रॅडक्लिफ यांच्याकडे असलेली माहिती जुनी जनगणना, आकडेवारी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचे अहवाल इतकीच होती. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती खूप गुंतागुंतीची होती गावे, शहरे, जिल्हे हे धार्मिकदृष्ट्या एकसंध नव्हते. हिंदूबहुल गावाच्या मध्यभागी मुस्लिम वस्ती तर मुस्लिमबहुल भागात हिंदू गावे होती. धर्माच्या आधारावर रेषा आखण्याचा प्रयत्न करताना, वास्तवातील ही मिसळलेली लोकसंख्या मोठा अडथळा ठरली.

१७ ऑगस्ट १९४७ : ‘रॅडक्लिफ रेषा’ जाहीर

स्वातंत्र्यानंतर फक्त दोन दिवसांनी, १७ ऑगस्ट १९४७ रोजी, रॅडक्लिफ यांनी आखलेली सीमा जाहीर झाली. उद्दिष्ट होते हिंसाचार टाळणे, परंतु निकाल उलट लागला. या रेषेने एका क्षणात लाखो लोकांना दुसऱ्या देशाचे नागरिक बनवले. पंजाब आणि बंगालमध्ये भयानक दंगली उसळल्या. गावे पेटली, मृतदेहांनी भरलेल्या गाड्या चालू लागल्या, आणि या हिंसाचारात १० ते १५ लाख लोकांनी जीव गमावला. लाखो लोक विस्थापित झाले.

रॅडक्लिफचे पश्चात्ताप

या घटनांनी रॅडक्लिफ यांना खोलवर हादरवले. भारत सोडण्यापूर्वी त्यांनी आपली सर्व कागदपत्रे जाळून टाकली, जेणेकरून त्यांच्या निर्णयांबद्दल पुढे कोणताही वाद निर्माण होऊ नये.

हे देखील वाचा : 79वा स्वातंत्र्यदिन आणि इतिहासातील सुवर्णक्षण…वाचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या टपाल तिकिटाची ‘ही’ अनोखी कहाणी

नंतर त्यांनी कबूल केले…

“जर मला या कामाचे गांभीर्य आणि त्याचे परिणाम आधीच कळले असते, तर मी हे काम कधीही स्वीकारले नसते.”

आज, स्वातंत्र्यदिनाच्या या पर्वावर, ही कहाणी आपल्याला आठवण करून देते की एका अनभिज्ञ माणसाच्या पाच आठवड्यांच्या निर्णयाने लाखो लोकांचे जीवन कायमचे बदलून गेले. भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा हा फक्त नकाशावरील एक रेषा नसून, ती असंख्य जखमा, अश्रू आणि बलिदानांची साक्ष देणारी वेदनांची कहाणी आहे.

Web Title: Independence day 2025 the man who drew the india pakistan border had never seen it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Independence Day
  • Independence Day 2025
  • Independence Day Special
  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?
1

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
2

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

भारताचा राष्ट्रीय पक्षी अन् राष्ट्रीय प्राणी एकाच फ्रेममध्ये आढळले; दबक्या पावलांनी आले अन् अद्भुत दृश्य कॅमेरात कैद; Video Viral
3

भारताचा राष्ट्रीय पक्षी अन् राष्ट्रीय प्राणी एकाच फ्रेममध्ये आढळले; दबक्या पावलांनी आले अन् अद्भुत दृश्य कॅमेरात कैद; Video Viral

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत…  मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!
4

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.