खिळखिळ्या बसप्रमाणेच महामंडळाचीही अवस्था...', श्रीरंग बरगे यांचा आरोप
St Bus News In Marathi : ‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ हे ब्रीद वाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC)सेवेत काळानुरूप बदल झाला, हे नाकारता येत नाही. ‘गाव तिथे एसटी’ या वाक्याचा अभिमान बाळगून महामंडळाने गेल्या दोन दशकांत ‘शिवाई’, ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘विठाई’, ‘अश्वमेध’ आदी विविध नावांनी सेवा सुरू केल्या. इलेक्ट्रिक बस देखील आणल्या, अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून ते महिलांपर्यंत विविध श्रेणींसाठी सवलत योजना लागू करण्यात आली आणि ऑनलाइन बुकिंगपासून अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या. यामध्ये ‘एसटी’चे अधिकारी, कर्मचारी यांची मेहनत आणि सकारात्मक कार्यपद्धत यांचा यात महत्त्वाचा वाटा आहे. पण याच कर्मचाऱ्यांचा एसटीसोबतचा प्रवास सुखरुप होत आहे का? याचविषयावर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस आणि अभ्यासक श्रीरंग बरगे यांनी नवराष्ट्र डिजीटला दिली खास मुलाखत…
एसटी ही अत्यावश्यक सेवा असल्याने कर्मचारी कुठल्याही सणाला कुटुंबासोबत नसतात. चालक आणि वाहक सेवाभावी दृष्टिकोन ठेवून रात्रंदिवस प्रवाशांना सेवा देत असतात. सुदैवाने महामंडळातील कर्मचाऱ्यांना जून २०२५ च्या वेतनापासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात आली. दरम्यान 87 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा 1 हजार कोटींचा महागाई भत्ता थकीत आहे. एसटी कर्मचाऱ्याचा खर्चाला लागणारी सर्व वेतन सरकार देईल असं सरकारने हायकोर्टात मान्य केलं होतं, मात्र अद्याप असं काही घडलं नाही, सरकार सवलीतीची प्रतिकृती करत आहे, असा आरोप श्रीरंग बरगे यांनी केला.
एसटी महामंडळात चालकांची संख्या 6747 ने कमी आहे तर वाहकांची संख्याबळ 3730 ने कमी आहे. एसटी महामंडळात प्रशासकीय कर्मचारी, वाहक ,चालक 29361 कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. असे असताना देखील महामंडळच्या २९ हजार जागा रिक्त आहेत. महामंडळीतील या जागांवर भरती काढली तर एसटीमध्ये रोजगार उपलब्ध होईल तसेच एसटी महामंडळाचा आणि कर्मचाऱ्यांवरचा ताण थोडाफार का होईना कमी होईल.
महाभाई भत्ता हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही मिळाला पाहिजे. महागाई भत्ता मिळतो पण विलंबाने दिला जातो आणि त्यामधील फरक मात्र दिलाच जात नाही. एसटीचा कर्मचारी हा कर्जबाजारी आहे. एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी जास्त जोखिमीची आहे. एसटी कर्मचारी आणि शासकीय वाहन चालकांच्या पगारीची तुलना केल्यास, दोघांमध्ये बरीच तफावत आढळून येते.
एसटी महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ तरी करावी किंवा सरकारने त्यांच्या खात्यातून पैसे द्यावे…जरी एसटी ना नफा ना तोटावर चालवली जात असली तरी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यायची झाली का मात्र महामंडळाचा तोटा आड येतो. महाभाई भत्ता सरकार देत नाही. तर दुसरीकडे वेतनवाढीचा फरक २३१८ कोटींचा आहे. एकंदरित सरकारची आणि एसटी प्रशासनाची ही दुहेरी भूमिका आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होताना दिसत आहे. यावर कायस्वरुपीचा तोडगा काढला पाहिजे. एकंदरित जुन्या एसटीच्या गाड्या खिळखिळत झाल्या आहेत, तसं एसटी महामंडळाचं व्यवस्थापन खिळखिळीत झालं आहे.
गेल्या सात आठ महिने परिवहनमंत्र्यांचे घोषणा करण्यामध्येच गेले, आता उत्पन्ना वाढीचा विचार केला पाहिजे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना दिलाच पाहिजे. सरकारने कर्मचाऱ्यांची देणगी दिली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देताना विलंब करतात आणि नंतर मधला फरक देत नाही. एकंदरित कर्मचाऱ्यांचे पैसे चोरत आहे, असा थेट आरोप श्रीरंग बरगे यांनी महामंडळावर केला आहे.
येत्या काही दिवसात दिवाळी हा सण येत आहे. अशातच एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळेल का? जर एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली तरच महामंडळाचे उत्पन्न वाढू शकते. अपुरी संख्याबळमुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. एसटी महामंडळात अधिकार वर्ग आहे जो चांगला नाही, बहुतांशी कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक दिली जाते. अगदी छोट्या कामासाठी ही चार्जशीट दिली जाते. अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही मग एसटी कर्मचाऱ्यांवर का? गणेशोत्सव काळात एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढ होईल अशी अपेक्षा होती, मात्र सप्टेंबर १ ते १० सप्टेंबर २८ कोटी ६३ लाखांचं उत्पन्न एसटी महामंडळाला मिळालं. साधारण साडे चार कोटींच तफावत आहे. अपेक्षित उत्त्पन मिळत नाही..
२४६० गाड्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार होत्या मात्र अद्याप २३४७ बस महामंडळात दाखल झाल्या आहेत. अजूनही वीजेवरच्या गाड्या आल्या नाहीत. दरवर्षी पाच हजार एसटी बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार अशी घोषणा एकनाथ शिंदे परिवहन मंत्री असताना केली होती, मात्र आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या काळात २४६० गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आता केवळ चार महिने शिल्लक आहेत, असे असताना पाच हजार गाड्या दाखल होतील का, अशी शंका श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली.