
एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात घुसून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शाब्दिक हुज्जत, श्रीरंग बरगे यांची चौकशीची मागणी
मुंबई : एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात महामंडळाचे तीन वरिष्ठ अधिकारी व एसटी बँकेचे अधिकारी हे एसटी बँकेच्या कामकाजाविषयी चर्चा करीत असताना अचानक एका अवगुणी व्यक्तीने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात परवानगी शिवाय घुसखोरी केली. तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शाब्दिक हुज्जत घालून गुण उधळले व अधिकाऱ्यांना ब्लॅक मेलिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात राज्य सरकारने लक्ष घालून गोंधळ निर्माण करणारी ही अवगुणी व्यक्ती कोण आहे? याची पोलीस चौकशी करण्यात येऊन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
मंगळवार २७ जानेवारी, रोजी संध्याकाळी ६.३० वाजता एसटी बँकेचे एक अधिकारी व महामंडळाचे वरिष्ठ तीन अधिकारी यांच्यात बँकेच्या कामकाजा संबंधी चर्चा करीत असताना एसटी महामंडळासी कुठलाही संबंध नसलेल्या व एसटी बँकेशी सुद्धा काहीही संबंध नसलेल्या बाहेरील अवगुनी व्यक्तीने कार्यालयीन वेळ संपली असताना अचानक उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात पूर्ण परवानगी शिवाय घुसून गुण उधळले व शाब्दिक गोंधळ घातला. महामंडळातील तीन बडे अधिकारी चर्चा करीत असताना त्यांना दमदाटी वजा शब्द वापरले.व तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शाब्दिक हुज्जत घालून गोंधळ निर्माण केला.अधिकाऱ्यांना अपमानीत करणारे शब्द वापरले व मोठमोठ्याने आवाज करीत शाब्दिक वादावादी केली.असा प्रकार उघडकीस आला असून हे प्रकरण काय आहे याची चौकशी करण्यात आली पाहिजे. असेही बरगे यांनी म्हणले असून हा प्रकार सुरू असताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
सुरक्षा अधिकारी आले असताना त्यांनाही त्यांचे काम करण्यापासून रोखण्यात आले असल्याचे समजत असून एकूण सगळा प्रकार पाहिला तर एसटीचे मुंबई सेंट्रल येथील मुख्यालय व तिथे काम करणारे अधिकारी व कर्मचारी सुरक्षित नसल्याचे दिसून येत असून जे महामंडळाचे कर्मचारी किंवा माजी कर्मचारी नाहीत. कुठल्याही संघटनेचे पदाधिकारी नाहीत. एसटी बँकेचे खातेदार किंवा सभासद नाहीत.त्यांना या कार्यालयात येण्यास मज्जाव करण्यात यावा. तसेच घडलेल्या प्रकाराची राज्य सरकार कडून पोलिस खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी.व तातडीची उपाययोजना म्हणून महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयास पोलिस संरक्षण देण्यात यावे. एसटी मुख्यालयात एसटी बँकेचे कार्यालय असून तिथे अनधिकृत व्यक्तींची ये- जा सुरू असते.बँकेत गेल्या काही दिवसांत मारामारी व शाब्दिक वादावादी घडल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने बँकेचे कार्यालय महामंडळाच्या जागेतून इतरत्र हलविण्यात यावे. व त्याच प्रमाणे राज्यभरात महामंडळाच्या आवारात वारंवार होणाऱ्या अनुचित घटना पाहता, मध्यंतरी पुणे येथील एका अनुचित घटनेनंतर पूर्वी प्रमाणे आय. पी. एस. अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल असे जाहीर केले होते, ती नियुक्ती तात्काळ करण्यात यावी असेही बरगे यांनी म्हटले आहे.
स्वतःला कायदे पंडित मानणाऱ्या एका बिनडोक व्यक्तीने आपले अव”गुण” उधळून गोंधळ घालत अधिकाऱ्यांना वेठीस धरल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात घडला.
महामंडळाच्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर मंगळवार , २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात आणि दालनाबाहेर घडलेल्या या गोंधळामुळे अधिकारी व कर्मचारी धास्तावले असून एसटीच्या मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे. एसटी मधील महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने त्याची सखोल चौकशी करावी तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गाला भयमुक्त वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करावी अशी मागणी केली.
गेली अनेक वर्षे पोलिस खात्यातील आय पी एस अधिकारी एस टी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी या पदावर होते पण आता मात्र पद रिक्त आहे हे पद तत्काळ भरण्यात यावे अशीही मागणी या निमित्ताने बरगे यांनी केली तसेच एसटीच्या मुख्यालयात गोंधळ घालणाऱ्या सदर व्यक्तीला प्रवेश बंदी करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.