Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mothers Day Special : “देशसेवा हीच ईश्वरसेवा”; वीरमाता अनुराधा गोरे यांची शौर्यगाथा

आई जशी तिच्या बाळासाठी हळवी असते तशीच ती खमकीसुद्धा असते. अशीच एक खमकी आई म्हणजे अनुराधा गोरे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 11, 2025 | 01:05 PM
Mothers Day Special : “देशसेवा हीच ईश्वरसेवा”; वीरमाता अनुराधा गोरे यांची शौर्यगाथा
Follow Us
Close
Follow Us:

आई आणि तिच्या बाळाचं नातं तिचं बाळ जन्माला येण्याआधीच घट्ट झालेलं असतं. असं म्हणतात की नऊ महिने जसं बाळ आईच्या पोटात आकार घेतं तसंच त्या नऊ महिन्यात स्त्रीमध्येसुद्धा मातृत्व झिरपत जातं. आई जशी तिच्या बाळासाठी हळवी असते तशीच ती खमकीसुद्धा असते. अशीच एक खमकी आई म्हणजे अनुराधा गोरे.

अनुराधा गोरे यांना भारताची वीरमाता म्हणण्याचं कारणही तितकंच मोठं आहे.विनायक विष्णू गोरे २६ सप्टेंबर, इ.स. १९९५ कुपवाडा मध्ये वयाच्या २६व्या वर्षी कुपवाडा येथे भारत-पाकिस्तान युद्धात शहिद झाले. एकुलत्या एक मुलाला आलेलं वीरमरण या माऊलीने मोठ्या धिटाईने स्विकारलं. एवढ्या मोठ्या आव्हानाला अनुराधा गोरे खचल्या नाही. देशाच्या सुरक्षेसाठी देशप्रेमासाठी जीवावर उदार होण्याची धमक दाखवणारे असंख्य विनायक त्यांनी उभे केले. कॅप्टन विनायक यांच्या मृत्यूनंतर अनुराधा गोरे यांनी शाळांशाळातून आणि मंडळांमंडळातून व्याख्याने देऊन तरुणांना भारतीय सैन्याची, सैनिकांची आणि ते करीत असलेल्या कामाची माहिती देणारी व्याख्याने देणे आणि वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिणे सुरू केले. अनुराधा गोरे यांची बहुतेक पुस्तकं सैन्याच्या शौर्य आणि पराक्रम यासंबंधी आहेत.  जानेवारी २०१७ साली बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष देखील होत्या.

शिवाजी जन्मावा पण आपल्या नाही दुसऱ्याच्या घरात अशी एक म्हण आहे. मात्र या देशात असेही काही पालक आहेत अशा ही काही माता आहेत ज्यांनी देशासाठी आपल्या पोटच्या मुलांचा त्याग केला. सध्या भारत पाकिस्तान युद्धामुळे देशातल्या नागरिकांमध्ये असुरक्षितेची जाणिव आहे. तरुण वर्गामध्येही याबाबात भिती आहे.मात्र असं असताना आपला मुलगा सैन्यात आहे आणि तो देशाचं संरक्षण करतोय याची जाणिव असणाऱ्या वीरमाता सर्व भारतीयांसाठी मोठा आदर्श आहेत.

सीमेवर जाऊन बंदूक हातात घेता येत नसली म्हणून काय झालं या वीर मातेने लिखाण हेच शस्त्र आणि हीच देशसेवा असं म्हणून तरुणांनी सैन्यात जाण्यासाठी प्रेरित करण्याचं व्रत हाती घेतलं. वीरमाता अनुराधा गोरे यांनी भारतीय सैन्यावर अनेक लेख आणि पुस्तकंही लिहीली आहे. शिवबाने स्वराज्याच्या डोलारा उभा केला कारण पाठीशी जिजाऊ आईसाहेब होत्या.तसंच देशासाठी प्राण पणाला लाववणाऱ्या प्रत्येक वीरपुत्राला पाठीशी जिजाऊंसारथी वीरमाता असते. आजच्या या मातृदिनाच्या निमित्ताने देशासाठी पोटच्या मुलांमा सैन्यात पाठवणाऱ्या या तमाम वीरमातांना नवराष्ट्रचा मानाचा सलाम!

Web Title: Mothers day special service to the country is service to god the heroic story of virmata anuradha gore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • indian army
  • mothers day
  • Navrashtra

संबंधित बातम्या

Indian Army : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थेट सैन्यात अधिकारी होण्याची संधी! आता अर्ज करण्याची अंतिम तारिख पहा एका क्लिकवर..
1

Indian Army : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थेट सैन्यात अधिकारी होण्याची संधी! आता अर्ज करण्याची अंतिम तारिख पहा एका क्लिकवर..

Sambhajinagar : वाळूज मधील संतप्त महिलांचा MIDC कार्यालयात ठिय्या, पाण्यासाठी वणवण
2

Sambhajinagar : वाळूज मधील संतप्त महिलांचा MIDC कार्यालयात ठिय्या, पाण्यासाठी वणवण

‘अग्निवीरांना समान लाभ मिळणार नाही’; केंद्र सरकारचे मुंबई हायकोर्टात स्पष्टीकरण
3

‘अग्निवीरांना समान लाभ मिळणार नाही’; केंद्र सरकारचे मुंबई हायकोर्टात स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.