
Muhammad Ali Jinnah's love story married Ruttie 24 years younger than him
भारताच्या फाळणीतील प्रमुख व्यक्तिमत्व असलेले मुहम्मद अली जिना यांचे व्यक्तीमत्त्व हे नेहमी वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले राहिले आहे. त्यांच्या राजकारणाची चर्चा राहिली तशीच चर्चा त्यांच्या वैवाहिक आयुष्याची देखील राहिली आहे. त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीत ते राष्ट्रवादी नेते होते, परंतु नंतरच्या दोन दशकांत ते कट्टरपंथी बनले, ज्यामुळे इस्लामच्या नावाखाली देशाची फाळणी झाली. जिना यांनी चक्क एका पारसी युवतीशी लग्न केले. ही युवती त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान होती. यामुळे चिडलेल्या या युवतीच्या वडीलांनी थेट तिच्या मृत्यूची बातमी पेपरमध्ये छापली होती.
हे देखील वाचा : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती; जाणून घ्या 25 डिसेंबरचा इतिहास
मोहम्मद अली जिना यांच्या स्वतःच्या लग्नाची कहाणीही कमी रोमांचक नाही. जिना यांचे पहिले लग्न १८९२ मध्ये अमीबाईशी झाले होते, जेव्हा ते फक्त १६ वर्षांचे होते. त्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि ब्रिटनहून परतल्यानंतर १८९३ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. जिना यांना वैयक्तिक आयुष्यापेक्षा राजकारणात जास्त रस निर्माण झाला. मात्र नंतर पुन्हा त्यांचा रस्ता प्रेमाकडे वळला, जेव्हा जिना हे ४० वर्षांचे झाले तेव्हा पुन्हा एकदा प्रेमात पडले. मात्र यावेळी त्यांच्या मुलीच्या वयाच्या तरुणीशी त्यांना प्रेम झाले.
एक प्रमुख पारसी नेते आणि व्यापारी सर दिनशॉ पेटिट यांच्या मुलीवर मुहम्मद अली जिना यांना प्रेम जडले. पण या प्रेमाला ना वयाचे बंधन होते ना धर्माचे. दिनशॉ पेटिट त्यांच्यापेक्षा जीना हे फक्त तीन वर्षांनी लहान होते. एक प्रसिद्ध वकील आणि राष्ट्रवादी नेते म्हणून, जिना वारंवार दिनशॉ पेटिट यांच्या घरी जात असत. पेटिट हे धार्मिक ऐक्याचे समर्थन करणारे उदारमतवादी व्यक्तिमत्व होते. या संवादादरम्यानच जिना यांचे रतीबाईंवरील प्रेम फुलले. जिना यांचा असा विश्वास होता की दिनशा पेटिट उदारमतवादी आहेत आणि त्यांना आंतरधर्मीय विवाहांना कोणताही आक्षेप नसेल आणि हे लग्न स्वीकारतील असा विश्वास जीना यांना वाटत होता. त्यामुळे मुहम्मद अली जिना यांनी सर दिनशॉ पेटिट यांचा मुलीचा लग्नासाठी हात मागितला, मात्र यामुळे दिनशा पेटिट यांचा राग अनावरण झाला आणि त्यांनी थेट आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी पेपरमध्ये छापली.
हे देखील वाचा : “अजेंठा कुठे आहे? ही स्वार्थाची अन् खुर्चीची युती; एकनाथ शिंदेंचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र
१६ वर्षांची रती आणि 40 वर्षांचे मोहम्मद अली
वीरेंद्र कुमार बर्नवाल यांनी त्यांच्या ‘जिना: अ रिफ्लेक्शन’ या पुस्तकात या घटनेबद्दल सविस्तर लिहिले आहे. ते लिहितात, “यानंतर सर पेटिट यांनी जिना यांच्याशी कधीही मैत्रीपूर्ण पद्धतीने बोलले नाही. लग्नाला सहमती देणे तर दूरच, संताप अनावर झालेल्या सर पेटिट यांनी जिना यांना रतीला भेटण्यास मनाई केली.” त्यावेळी रती या फक्त १६ वर्षांच्या होत्या आणि पारशी विवाह कायद्यानुसार मुलगी १८ वर्षांची असणे आवश्यक आहे. दिनशॉ पेटिट यांनी हा युक्तिवाद न्यायालयात केला आणि न्यायालयाने रतीबाईंना तिच्या लग्नाबाबत कोणताही निर्णय घेण्यास अक्षम घोषित केले. त्यानंतर रती आणि जिना यांनी दोन वर्षे वाट पाहिली. अखेर, २० फेब्रुवारी १९१८ रोजी, पेटिट कुटुंब त्यांच्या मुलीच्या १८ व्या वाढदिवसाची तयारी करत असताना, रती यांनी जिना यांच्याशी लग्न केले. आणि एका रात्रीत त्या रतीबाई जिना बनल्या. जीना यांच्या या वैवाहिक जीवनामुळे हे नेहमीच चर्चेत राहिले आहे.