बांबू हे एक वृक्षाच्छादित बारमाही गवत आहे. ज्याचे अनेक उपयोग आहेत. हि पृथ्वीवरील सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती आहे. भारतात १३५ हून अधिक बांबू प्रजाती आहेत. त्यापैकी भारत सरकारने व्यावसायिक लागवडीसाठी १५ बांबू जातींची निवड केली आहे. बांबूपासून २००० हून अधिक उत्पादने तयार केली जातात. घरगुती वापरातील फर्निचर, सजावटीच्या वस्तू, कागद, बांधकाम साहित्य, सायकल, पेन, कप, कुंडी, पाणी बॉटल्स, इकोडायरी, टूथब्रश पासून ते अगदी बांबू फायबर पासून कापड निर्मितीही केली जाते. अशा हजारो वस्तू आज बाजारात उपलब्ध आहेत. या वस्तू टिकाऊ आणि पर्यावरण पूरक आहेत. अगदी इथेनॉल, सीएनजी, कोळसा, बायोचार, रेयॉन, कापडासाठी फायबर आणि बरेच काही तयार करू शकते. हे उद्योग लाखो लोकांना उपजीविकेच्या संधी प्रदान करते. अनेक उद्योजक बांबूवर आधारित उद्योग उभारत आहेत.
Explainer: हिंसक व्हिडिओंचा तरुणांवर कसा होतोय नकारात्मक परिणाम? संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर
– श्रीकृष्ण परांजपे, ट्राईब छतरी, पुणे