Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel युद्धामुळे विद्यार्थी, नोकरदार उपाशी राहणार? गॅस तुटवड्यामुळे हॉटेल, मेस अन्….; नुकसान किती?

विद्यार्थी, नोकरी करणारे नागरिक आणि स्थलांतरित कामगार मेस आणि लहान भोजनालयांवर अवलंबून असतात. हॉटेल उद्योगाशी संबंधित संघटनांनी प्रशासनाकडे कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 10, 2026 | 09:35 PM
Iran Israel युद्धामुळे विद्यार्थी नोकरदार उपाशी राहणार? गॅस तुटवड्यामुळे हॉटेल, मेस अन्....; नुकसान किती?

Iran Israel युद्धामुळे विद्यार्थी नोकरदार उपाशी राहणार? गॅस तुटवड्यामुळे हॉटेल, मेस अन्....; नुकसान किती?

Follow Us
Close
Follow Us:

एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मर्यादा
अनेक हॉटेल व भोजनालये बंद होण्याची शक्यता
हॉटेल व्यवसायावर होतोय परिणाम

पुणे: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्याने पुण्यातील हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मेस चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. परिस्थिती लवकर सुरळीत झाली नाही तर शहरातील अनेक हॉटेल व भोजनालये बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अलीकडील काळात घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिल्यामुळे व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरची उपलब्धता कमी करण्यात आली आहे. त्याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होत आहे. कारण शहरातील बहुतांश हॉटेल आणि भोजनालये अन्न शिजवण्यासाठी कमर्शियल एलपीजी सिलेंडरवर अवलंबून आहेत.

शहरात सुमारे ८ ते १० हजार हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मेस संख्या हजारोंच्या घरात आहे. यापैकी सुमारे ८५ टक्के आस्थापना कमर्शियल गॅस सिलेंडरचा वापर करतात, तर उर्वरित हॉटेल पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी)वर अवलंबून आहेत. हॉटेल चालकांच्या माहितीनुसार बहुतांश आस्थापनांकडे साधारण एक ते दोन दिवसांचा गॅस साठा असतो. अग्निसुरक्षा नियमांमुळे अतिरिक्त सिलेंडर साठवून ठेवणे शक्य नसते. त्यामुळे कमर्शियल गॅसचा पुरवठा दीर्घकाळ विस्कळीत राहिल्यास मोठ्या प्रमाणावर हॉटेल आणि मेस बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे हॉटेल व्यवसायाबरोबरच या क्षेत्राशी संबंधित हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही परिणाम होऊ शकतो.

LPG Gas Shortage : भारताला बसली युद्धाची झळ! LPG गॅसचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले की, शहरातील मोठ्या प्रमाणातील स्पर्धा परिक्षा विद्यार्थी, नोकरी करणारे नागरिक आणि स्थलांतरित कामगार मेस आणि लहान भोजनालयांवर अवलंबून असतात. त्यामुळे गॅस पुरवठा खंडित होऊन हॉटेल आणि मेस बंद झाल्यास त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवरही होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल उद्योगाशी संबंधित संघटनांनी प्रशासनाकडे कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

“कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा काही प्रमाणात मर्यादित करण्यात आला आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. ग्राहकांना नियमितपणे सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरजेनुसारच गॅस सिलेंडर बुक करावा.”

-महेश सुधाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे.

LPG Gas Shortage : गॅसच्या तुटवड्यावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; संपूर्ण देशात ESMA कायदा लागू

“कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद राहिला आणि सध्याचा साठा संपला तर पुण्यातील सुमारे ८० टक्के हॉटेल बंद होण्याच्या स्थितीत येतील. त्यामुळे हॉटेल उद्योगाला दररोज सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो.”

-गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलियर्स असोसिएशन.

Web Title: Lpg gas cylinder shoratage hotel restuarants chance to close trouble people in pune iran israel world war 3 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • hotel
  • Iran Israel Conflict
  • LPG gas cylinder
  • pune news

संबंधित बातम्या

World Bank Warning: भय इथले संपत नाही… 4.5 कोटी लोकं धोक्यात, Iran युद्धाबाबत जागतिक बँकेचा मोठा इशारा
1

World Bank Warning: भय इथले संपत नाही… 4.5 कोटी लोकं धोक्यात, Iran युद्धाबाबत जागतिक बँकेचा मोठा इशारा

PCMC Water Supply: श्रीमंत महापालिका पण पाण्याचा दुष्काळ! दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; टँकर लॉबीचा विळखा
2

PCMC Water Supply: श्रीमंत महापालिका पण पाण्याचा दुष्काळ! दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; टँकर लॉबीचा विळखा

Maharashtra Heatwave : कुठे ४७ अंशांची आग, तर कुठे पावसाची सर! महाराष्ट्रात निसर्गाचा लपंडाव 
3

Maharashtra Heatwave : कुठे ४७ अंशांची आग, तर कुठे पावसाची सर! महाराष्ट्रात निसर्गाचा लपंडाव 

Pune News: पुण्यात माणुसकीला काळीमा! कर्जदार दांपत्याला बँक एजंटकडून लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; Video Viral
4

Pune News: पुण्यात माणुसकीला काळीमा! कर्जदार दांपत्याला बँक एजंटकडून लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.