Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hindu-Muslim Politics: ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा २० वर्षीय तरुण अटकेत; परिसरात तणावपूर्ण शांतता

अटक केलेल्या तरुणाची आई घरकाम करते. त्याच्या आईनेदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही कळेल, कोणतरी माझ्या मुलाला बोलण्यास भाग पाडले जात होते.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 10, 2026 | 11:47 AM
Hindu-Muslim Politics: ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा २० वर्षीय तरुण अटकेत; परिसरात तणावपूर्ण शांतता
Follow Us
Follow Us:
  • २० वर्षीय तरुणाने “पाकिस्तान झिंदाबाद” अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल
  • अटक करण्यात आलेला तरुण बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करतो
  • तरुणाला अटक झाल्यानंतर परिसरातील त्यांच्या हिंदू शेजाऱ्यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले
Pune News: पुण्यातील एका मोठ्या झोपडपट्टी परिसरात एका २० वर्षीय तरुणाने “पाकिस्तान झिंदाबाद” अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. या घटनेनंतर रविवारी संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि भीतीपोटी सोमवारी परिसरातील अनेक कुटुंबांनी इफ्तार रद्द केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला तरुण बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करतो. तो आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असून परिसरात त्याची ‘चांगला माणूस’ म्हणून त्याची ओळख होती. पण रविवारी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तो वादग्रस्त घोषणा देताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १९२ आणि १९६(१) अंतर्गत (धर्माच्या आधारावर दोन गटांत शत्रूत्वाला प्रोत्साहन देणे) गुन्हा दाखल केला आहे.

Pune LPG Shortage: पुण्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा: इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांच्या स्वयंपाकघरावर परिणाम

दरम्यान, तरुणाला अटक झाल्यानंतर परिसरातील त्यांच्या हिंदू  (Hindu-Muslim Politics) शेजाऱ्यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ‘हा मुलगा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही. “ज्या गोष्टीला तो विनोद समजत होता, तिचे एवढे गंभीर पडसाद उमटतील याची त्याला कल्पना नसावी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

तर तरुणाच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनीही यावर प्रतिक्रीया दिली आहे. त्याला त्याच्याच एका मित्राने अशा घोषणा देण्यासाठी ‘उत्तेजित’ केले होते. ऑनलाइन समोर आलेला व्हिडिओ एडिटेड आहे. त्या तरुणाने आपल्या कृत्याबद्दल आधीच माफी मागितली होती, असेही कुटुंबाने सांगितले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अटक केलेल्या तरुणाची आई घरकाम करते. त्याच्या आईनेदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही कळेल, कोणतरी माझ्या मुलाला बोलण्यास भाग पाडले जात होते. त्याला त्या प्रकरणाचे गांभीर्य समजले नाही. तो फक्त २० वर्षांचा आहे. त्याने आधीच त्याच्या चुकीबद्दल माफी मागितली आहे आणि इतर कुणाचीही माफी मागायची असेल तर मी त्याचीही माफी मागण्यास तयार आहे. ”

तर मुलाची काकू म्हणते, “आमचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. आम्ही भारतीय आहोत, भारतात जन्मलो आहोत आणि इथेच मरणार आहोत… त्याने जे काही सांगितले ते त्याने गांभीर्याने घेतले नाही.” तर, गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबियांशी ओळख असणारा एक हिंदू शेजाऱ्याने सांगितले की, “२० वर्षांचा मुलगा एक चांगला मुलगा आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तो सकाळी ९ वाजता कामावर जातो आणि त्यानंतर आईसोबत असतो. जर तो खरोखरच वाईट प्रवृत्तीचा असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, पण तो तसा नाही. तो प्रत्यक्षात एक चांगला मुलगा आहे. अजाणतेपणाने त्याची चूक झाली असावी.

Gairan Lands PMC: राज्यातील ७,८८७ हेक्टर गायरान जमिनी आता सरकारच्या मालकीच्या होणार

दुसऱ्या एका शेजाऱ्याने सांगितले की, ‘हिंदू आणि मुस्लिम सर्वजण येथे कुटुंबासारखे राहतात. दुसऱ्या एका महिलेने सांगितले की,’ तिच्या पतीच्या मृत्युनंतर, शेजारच्या मुस्लिम कुटुंबांनी तिला सर्वात मोठी मदत केली. आमची मुले आमच्या हिंदू शेजाऱ्यांसोबत आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती आणि शिवजयंती साजरी करतात. त्याने चूक केली आणि त्याची माफी स्वीकारली पाहिजे. त्याच्या कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या तरुणाला अटक का करावी?” असा सवालही संबंधित महिलेने उपस्थित केले आहेत.

 

 

Web Title: Pune news 20 year old youth arrested for raising pro pakistan slogans local tension rises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

सासवडमध्ये पुणे ग्रामीण एटीएस पथकाची मोठी कारवाई; गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
1

सासवडमध्ये पुणे ग्रामीण एटीएस पथकाची मोठी कारवाई; गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू
2

पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू

Pune News: कमाल! पहिल्याच प्रयत्नात ‘एमएमसीसी’चे  १२ विद्यार्थी झाले Chartered Accountant
3

Pune News: कमाल! पहिल्याच प्रयत्नात ‘एमएमसीसी’चे १२ विद्यार्थी झाले Chartered Accountant

नव्या गाड्यांच्या स्वागतासाठी पीएमपी सज्ज; डेपो अन् पार्किंगसाठी 100 एकर जागेची मागणी
4

नव्या गाड्यांच्या स्वागतासाठी पीएमपी सज्ज; डेपो अन् पार्किंगसाठी 100 एकर जागेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.