Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ASEAN Summit 2025 :- डोनाल्ड ट्रम्प समोर भारताचा गौरव! फिलिपिन्स राष्ट्राध्यक्षांनी नरेंद्र मोदींना दिला जागतिक सन्मान

ASEAN Summit :- ट्रम्प उपस्थित असतानाही फिलिपिन्स राष्ट्राध्यक्षांचे भारतावर कौतुक; आसियानमध्ये भारताचा दबदबा

  • By Dilip Bane
Updated On: Oct 27, 2025 | 03:40 PM
ASEAN Summit , ASEAN Summit Narendra Modi

ASEAN Summit , ASEAN Summit Narendra Modi

Follow Us
Close
Follow Us:
  • मलेशियात झालेल्या 47व्या आसियान शिखर परिषदेत भारताची मोठी चर्चा झाली.
  • फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांनी भारताचं कौतुक केलं.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप उपस्थित असताना भारताच्या भूमिकेची प्रशंसा झाली.
  • भारताने “Act East Policy” द्वारे आसियानशी व्यापार आणि सांस्कृतिक संबंध मजबूत केले आहेत.

क्वालालंपूर येथे पार पडलेल्या ASEAN Summit आसियान शिखर परिषदेत एक अनोखा प्रसंग घडला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump उपस्थित असतानाही संपूर्ण लक्ष वेधून घेतले ते भारताने. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी भारताच्या नेतृत्व, धोरण आणि जागतिक भूमिकेचं खुलेपणाने कौतुक केलं.

या वर्षी भारताचं प्रतिनिधित्व परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर Subrahmanyam Jaishankar यांनी केलं होतं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी परिषदेला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित केलं. आपल्या भाषणात मोदी म्हणाले, “एकविसावं शतक हे भारताचं शतक ठरणार आहे,” असं सांगत त्यांनी भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर भर दिला.

तथापि, संपूर्ण परिषदेचं लक्ष वेधून घेतलं ते मार्कोस ज्युनियर यांच्या वक्तव्यांनी. त्यांनी भारताच्या शांततापूर्ण परराष्ट्र धोरणाचं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पालनासाठी असलेल्या कटिबद्धतेचं विशेष कौतुक केलं. त्यांनी म्हटलं, “भारत आसियानसाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह भागीदार आहे. समुद्रातील कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांची भूमिका आदर्श आहे.”

Israel नं संपूर्ण लेबनॉनच उडवलं? Air Strike करत थेट…; हिज्बु्ल्लाहच्या ‘इतक्या’ सदस्यांना धाडले यमसदनी

भारत-आसियान संबंधांचा नवा अध्याय

भारत आणि आसियान देशांमधील संबंध गेल्या काही वर्षांत अधिक बळकट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी’ मुळे भारताने दक्षिण-पूर्व आशियातील देशांशी व्यापार, सांस्कृतिक आणि सुरक्षाविषयक संबंध दृढ केले आहेत.2024 मध्ये भारत आणि आसियान यांच्यातील व्यापार 131 अब्ज डॉलर्सवर पोहोचला असून, 2025 पर्यंत तो 200 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आज जवळपास भारताच्या 25 टक्के परकीय गुंतवणुकीचा संबंध आसियान देशांशी आहे.
याशिवाय, भारताने मांडलेला ‘मुक्त आणि खुला इंडो-पॅसिफिक प्रदेश’ हा विचार फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि इतर दक्षिण-पूर्व आशियाई देशांना अत्यंत महत्त्वाचा वाटतो. चीनकडून वाढत्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर भारताचं संतुलित आणि ठाम नेतृत्व या देशांसाठी विश्वासार्ह ठरतं आहे.

भारताविरूद्ध सुरु आहे मोठं प्लॅनिंग; दहशतवादी मसूद अझहरच्या ऑडियो रेकॉर्डिंगमधून मोठा गौप्यस्फोट

संस्कृती, इतिहास आणि धोरण यांचा संगम

भारत आणि आसियान देशांमधील संबंध केवळ राजकीय नाहीत, तर सांस्कृतिक पातळीवरही खोलवर रुजलेले आहेत. बौद्ध आणि हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून दोन्ही प्रदेशांमध्ये हजारो वर्षांपासून नातं टिकून आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कंबोडियातील अंगकोरवाट मंदिर.आज दोन मिलियनहून अधिक भारतीय मूळचे नागरिक आसियान देशांमध्ये स्थायिक आहेत. हे भारत आणि त्या देशांमधील सामाजिक व आर्थिक संबंधांना अधिक बळ देतात.धोरणात्मक दृष्टिकोनातून, भारताचा क्वाड गठबंधनात (भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया) सहभाग आसियान देशांच्या सुरक्षाविषयक भूमिकेला पूरक ठरतो. भारताचं संतुलित आणि शांततापूर्ण नेतृत्व आशिया खंडात स्थैर्य आणणारं ठरत आहे.
फिलिपिन्स राष्ट्राध्यक्षांचे भारतावरील कौतुक केवळ राजनैतिक नव्हे, तर प्रतीकात्मकदृष्ट्याही महत्त्वाचं आहे. ट्रम्पसारख्या नेत्यांच्या उपस्थितीत भारताला मिळालेलं हे आंतरराष्ट्रीय मानांकन स्पष्टपणे दाखवते की, भारत आता केवळ एक सहयोगी नाही, तर आशियाच्या शांततेचा आणि विकासाचा आधारस्तंभ बनला आहे.

Web Title: Philippines president praises india at asean summit as donald trump attends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Narendr Modi
  • S. Jayshankar

संबंधित बातम्या

India US Relations: ‘भारताशी मैत्री ही…’ मार्को रुबियोचे स्पष्ट विधान, दुसऱ्या बाजूला Trump कडून पाकिस्तानी नेत्यांचे कौतुक
1

India US Relations: ‘भारताशी मैत्री ही…’ मार्को रुबियोचे स्पष्ट विधान, दुसऱ्या बाजूला Trump कडून पाकिस्तानी नेत्यांचे कौतुक

जपानच्या नव्या PM साने ताकाइचींचा विजयानंतर ट्रम्पशी पहिला संवाद; ‘या’ मुद्द्यावंर झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
2

जपानच्या नव्या PM साने ताकाइचींचा विजयानंतर ट्रम्पशी पहिला संवाद; ‘या’ मुद्द्यावंर झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

पुन्हा शाहबाज आणि मुनीरच्या प्रेमात ट्रम्प! ASEAN परिषदेदरम्यान ‘महान व्यक्ती’ म्हणत केले कौतुक
3

पुन्हा शाहबाज आणि मुनीरच्या प्रेमात ट्रम्प! ASEAN परिषदेदरम्यान ‘महान व्यक्ती’ म्हणत केले कौतुक

दशकांपासून चाललेल्या थायलंड कंबोडिया संघर्षावर ‘विराम ‘ ; ट्रम्पच्या मध्यस्थीने दोन्ही देशात शांतता करार
4

दशकांपासून चाललेल्या थायलंड कंबोडिया संघर्षावर ‘विराम ‘ ; ट्रम्पच्या मध्यस्थीने दोन्ही देशात शांतता करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.