इस्त्रायलचा लेबनॉनवर भीषण हल्ला (फोटो- सोसल मीडिया)
इस्त्रायलने केला दक्षिण लेबनॉनवर हवाई हल्ला
अनेक नागरिकांचा झाला मृत्यू
दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमध्ये अनेक वाहनांचे नुकसान
इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये अनेक काळापासून संघर्ष सुरू आहे. इस्त्रायलने पुन्हा एकदा दक्षिण लेबनॉनवर पुन्हा हवाई हल्ला केला आहे. इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये तीव्र हल्ले केले आहेत. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. इस्त्रायलची लढाऊ विमाने दक्षिण लेबनॉनमध्ये घुसून हल्ला केल्याचे समजते आहे.
इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनवर हल्ला केला आहे. ड्रोन आणि लढाऊ विमाने लेबनॉनमध्ये घुसून हल्ला केला आहे. यामध्ये लढाऊ विमानांनी अनेक वाहनांना लक्ष्य केले आहे. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. या हवाई हल्ल्यात चार लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. अनेक वाहनांचे देखील यात मोठे नुकसान झाले आहे.
इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ले केले आहेत. यामध्ये हिजबुल्लाहचे अनेक नागरिक ठार झाले आहेत. तसेच यात एक सिरियाचा नागरिकाचा समावेश असल्याचे समजते आहे. इस्त्रायल सैन्याने याबाबत स्पष्टता केली आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहाचा वरिष्ठ अधिकारी आणि हत्यारे पुरवणाऱ्या माणसाला ठार मारण्यात आले आहे.
इराणची इस्रायलविरोधात मोठी कारवाई
इराणने इस्रायली गुप्तचर संस्था मोसादला मोठा धक्का दिला आहे. मोसादच्या दोन गुप्तहेरांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. इराणच्या कोम शहरातील एका व्यक्तीला इस्रायलसाठी हेरगिरी करण्याच्या संशयाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला यासाठी इराणच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. इराणच्या माध्यमांनी याची माहिती दिली.
इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. परंतु संबंधित व्यक्तीने बचावासाठी दया याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत शनिवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी फाशीची शिक्षा सुनावली. सध्या आरोपीचे नाव अधिकृत करण्यात आलेले नाही.
पण आरोपीवर झिओनिस्ट राजवटीला इराणची गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याला भ्रष्टाचार आणि इस्लाम धर्माविरोधी शत्रु ठरवण्यात आले आहे. आरोपीला इस्लामिक दंड संहितेनुसार मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीला २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. इस्रायली गुप्तहेरांशी संपर्क साधल्याच्या आणि त्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली होती. आरोपीने इस्रायलच्या गुप्तचर संस्थेच्या मोहिमा इराणमध्ये राबवल्या असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सध्या याबाबत इतर कोणतीही माहिती अधिकृत जाहीर करण्यात आलेली नाही.






