Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की रहस्यमय मृत्यू?

संत तुकाराम महाराजांचे प्रयाणगूढ : श्रद्धा की सत्य?

  • By Dilip Bane
Updated On: Oct 16, 2025 | 02:28 PM
Tukaram Maharaj Vaikuntha Gaman

Tukaram Maharaj Vaikuntha Gaman

Follow Us
Follow Us:

प्रस्तावना
संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ संत मानले जातात. त्यांच्या जीवनात आणि कार्यात जितकी प्रकाशमयता आहे, तितकंच त्यांच्या प्रयाणाविषयीचं गूढ आजही चर्चेचा विषय आहे.काहींच्या मते ते सदेह वैकुंठाला गेले, तर काही विद्वानांच्या मते त्यांची हत्या झाली. या दोन्ही मतांमध्ये सत्य शोधण्याचा प्रयत्न आजही सुरू आहे.

श्रीधर महाराज मोरे (देहूकर) – तुकारामांचे वंशज श्रीधर महाराज मोरे यांनी लिहिलेल्या चरित्रात तुकोबांच्या प्रयाणाचं तपशीलवार वर्णन आहे.
त्यांच्या मते- “इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना सांगितलं – ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्हीही चला’.
कीर्तनात तुकोबा भगवंतकथेत तल्लीन झाले आणि अदृश्य झाले.”

श्रीधर महाराजांनी असेही नमूद केले आहे की, या घटनेचा उल्लेख देहू गावच्या सनदेत (शके 30) मिळतो.
तुकोबांच्या गायब झाल्यानंतर पंचमीला टाळ, पत्र आणि कथा आकाशमार्गे परत आली. यावरून निर्णय झाला की तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.

डॉ. रावसाहेब कसबे यांचे मत – “तुकारामांची हत्या झाली असावी”

लेखक आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी धर्म आणि भक्तिसंप्रदायावर सखोल संशोधन केले आहे.
त्यांच्या मते – “तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कोणी सांगू शकलेलं नाही. मंबाजी गोसावी आणि इतर काही शक्ती त्यांच्या विरोधात काम करत होत्या. माझं मत असं आहे की, जोपर्यंत त्यांचा मृत्यूचं गूढ उलगडत नाही, तोपर्यंत तुकारामांची हत्याच झाली असं मानावं.”

कसबे यांनी सुदाम सावरकर यांच्या पुस्तकाचाही संदर्भ दिला आहे, ज्यात तुकोबांच्या हत्येचा थेट दावा केला आहे.

सुदाम सावरकर यांची मांडणी

सुदाम सावरकर हे संत तुकडोजी महाराजांचे शिष्य होते. त्यांच्या पुस्तकात नमूद आहे – “तुकोबा अदृश्य झाले म्हणजे काय झालं? नेमकं कसं झालं?
लोकांच्या पचनी न बसल्यामुळे ‘सदेह वैकुंठ गमन’ ही चमत्कारिक कथा रचली गेली.”

इतिहास आणि कालगणना

मराठी विश्वकोशानुसार:

जन्म: इ.स. 1608

प्रयाण: 9 मार्च 1650

वय: 42 वर्षे

त्यांच्या वचनातही उल्लेख आहे – “प्रयाण काळी देवे विमान पाठविले । कलिच्या काळामाजि अदभुत वर्तविले ।।”

ही वाणी वारकरी संप्रदायात आजही श्रद्धेने गायली जाते.

वारकरी समाजाची श्रद्धा

ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या मते – “तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले यावर वारकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे.
अशा श्रद्धेविरोधात बोलणाऱ्या विधानांचा आम्ही निषेध करतो.”

ते पुढे म्हणतात – “काही लोक प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करतात. आम्ही अशा वादांवर ऊर्जा खर्च करायची नाही.”

गूढ की श्रद्धा- निष्कर्ष – तुकाराम महाराजांच्या प्रयाणाबाबत दोन टोकाची मतं आहेत.

1) श्रद्धेचं मत: ते सदेह वैकुंठाला गेले.

2) संशोधकांचं मत: त्यांची हत्या झाली असावी.

या दोन दृष्टिकोनांमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे – तुकोबांचं जीवन आणि संदेश आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो.`

Web Title: Sant tukaram maharaj life death family autobiography

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • Religion
  • Sant Tukaram Maharaj

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय
1

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय

Pitru Paksha 2026:  पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता
2

Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते
3

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
4

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.