Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भगवान रामाने विभीषणाला सोपवले होते ‘हे’ मंदिर; मुघल आणि ब्रिटिशांनीही लुटले होते ‘हे’ ठिकाण

Sri Ranganathaswamy Temple : भारतातील अनेक प्राचीन मंदिरे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचेही साक्षीदार आहेत. तामिळनाडूमधील श्री रंगनाथस्वामी मंदिर हे असेच एक मंदिर आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 19, 2025 | 08:00 PM
Sri Ranganathaswamy Temple located in Tamil Nadu is one of the largest temples in India

Sri Ranganathaswamy Temple located in Tamil Nadu is one of the largest temples in India

Follow Us
Close
Follow Us:

श्रीरंगम (तामिळनाडू) – भारतातील अनेक प्राचीन मंदिरे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचेही साक्षीदार आहेत. तामिळनाडूमधील श्री रंगनाथस्वामी मंदिर हे असेच एक मंदिर आहे, ज्याचा उल्लेख केवळ धार्मिक ग्रंथांत नाही तर अनेक ऐतिहासिक घटनांमध्येही आढळतो. हे मंदिर इतके खास का आहे, याची अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कारणे आहेत.

भगवान रामाकडून विभीषणाला भेट

या मंदिराच्या उत्पत्तीची कथा रामायणाशी जोडलेली आहे. पौराणिक कथेनुसार, लंकेच्या राजघराण्यातील विभीषणाने जेव्हा प्रभू श्रीरामांची साथ स्वीकारली, तेव्हा रावणाचा पराभव केल्यानंतर श्रीरामांनी आपल्या हातून विभीषणाला एक अमूल्य भेट दिली. भगवान विष्णूच्या रूपातील श्री रंगनाथस्वामींची मूर्ती. हीच मूर्ती त्याने श्रीरंगम येथे स्थापित केली आणि तिथेच विष्णूने ‘रंगनाथ’ या स्वरूपात निवास करण्याची इच्छा व्यक्त केली.

भारताचे एक भव्य मंदिर

हे मंदिर कावेरी आणि कालिदम नद्यांमधील बेटावर वसलेले आहे आणि १५५ एकर क्षेत्रावर पसरलेले आहे. त्यामुळे ते भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिरात विष्णूशय्या स्वरूपातील भगवान विष्णू शेषनागावर झोपलेले आहेत. त्यांच्या शेजारी देवी लक्ष्मी, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचेही दर्शन होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेचे डूम्सडे प्लेन रशियाच्या डूम्सडे रेडिओपेक्षा किती वेगळे? जाणून घ्या त्यांना का म्हणतात ‘विनाशाचे चिन्ह’

इतिहासाच्या अनेक थरांतून गेलेले मंदिर

हे मंदिर केवळ श्रद्धेचेच नाही तर इतिहासाचेही प्रतीक आहे. चोल, पांड्य, होयसळ आणि विजयनगर साम्राज्याच्या काळात या मंदिराला राजाश्रय लाभला होता. मंदिराच्या भिंतींवर तमिळ, संस्कृत, मराठी, तेलुगू, कन्नड आणि ओडिया भाषांतील ८०० हून अधिक शिलालेख आजही पाहायला मिळतात.

मुस्लिम, मराठे आणि ब्रिटिशांनी केला लुटीचा प्रयत्न

इतिहासातील अनेक शक्तिशाली सत्तांनी या मंदिरावर आक्रमण केले. मोहम्मद बिन तुघलकने या मंदिरावर मोठा हल्ला केला होता. पुराव्यानुसार, जेव्हा त्याला मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती सापडली नाही, तेव्हा त्याने रागाने मंदिरातील उपस्थित भक्तांची कत्तल करण्याचा आदेश दिला. इतकेच नव्हे तर ब्रिटिशांनीही या मंदिरावर हल्ले केले होते.

उत्सव आणि परंपरा यांचे केंद्र

या मंदिरात मार्गझी तमिळ महिन्यात २१ दिवसांचा विशेष उत्सव साजरा केला जातो. या काळात १० लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. कृष्ण जन्मोत्सव हा येथे विशेष उत्साहात साजरा केला जातो. मंदिरात एकूण ८० पूजास्थळे आहेत, जे विविध देवतांना समर्पित आहेत.

वैकुंठाचे पृथ्वीवरील रूप

हे मंदिर विविध नावांनी ओळखले जाते. श्रीरंगम मंदिर, भूलोका वैकुंठ, तिरुवरंगम तिरुपती, पेरियाकोइल. या मंदिराचे धार्मिक महत्त्व एवढे मोठे आहे की, ते पृथ्वीवरील वैकुंठ मानले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणवर राज्य करू शकतात राजघराण्यातील ‘या’ 3 कन्या; रझा पहलवी यांच्या सुंदर मुली राजकीय केंद्रस्थानी

श्री रंगनाथस्वामी मंदिर

श्री रंगनाथस्वामी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. भगवान रामाने दिलेले हे मंदिर हजारो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असून, आजही ते भक्तांच्या श्रद्धेचे आणि भारतीय गौरवशाली परंपरेचे प्रतीक बनून उभे आहे.

Web Title: Sri ranganathaswamy temple located in tamil nadu is one of the largest temples in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • Lord Shri Ram
  • Ram Temple
  • special story
  • Tamilnadu

संबंधित बातम्या

Karur Stampede: TVK ची रॅलीसाठी विनवणी, मद्रास हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय, आता काय होणार?
1

Karur Stampede: TVK ची रॅलीसाठी विनवणी, मद्रास हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय, आता काय होणार?

World Pharmacist Day 2025 : का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या यामागील रंजक कारण
2

World Pharmacist Day 2025 : का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या यामागील रंजक कारण

चप्पलने मारले, संपूर्ण हॉस्टेलमध्ये निर्वस्त्र फिरवले अन्…; कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत भयानक Ragging
3

चप्पलने मारले, संपूर्ण हॉस्टेलमध्ये निर्वस्त्र फिरवले अन्…; कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत भयानक Ragging

आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 निमित्त HCL फाउंडेशनने देशव्यापी सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे केले नेतृत्व
4

आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 निमित्त HCL फाउंडेशनने देशव्यापी सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे केले नेतृत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.