Reza Pahlavi daughters leads : इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील सत्तास्थिती ढासळताना दिसत आहे. देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची सत्ता धोक्यात आली असून, आता जगभरात एकच प्रश्न चर्चेत आहे. यांच्यानंतर इराणवर कोण राज्य करणार? या प्रश्नाचे संभाव्य उत्तर म्हणजे इराणच्या माजी शाह रेझा पहलवी यांच्या तीन कन्या, ज्या सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय चर्चेचा विषय ठरत आहेत.
रझा पहलवी – शाह वंशाचा वारस
मोहम्मद रेझा पहलवी हे १९७९ पर्यंत इराणचे शाह होते. त्यांच्या पदच्युतीनंतर रझा पहलवी यांनी देशाबाहेरून इस्लामिक रिपब्लिकविरोधात लढा सुरू ठेवला. सध्या ते अमेरिकेत राहत असून, इराणमध्ये लोकशाही, मानवी हक्क आणि स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांसाठी काम करत आहेत. त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे की त्यांच्या तीन मुलीच त्यांच्या उत्तराधिकारी असतील.
नूर पहलवी – सोशल मीडिया स्टार आणि गुंतवणूकतज्ज्ञ
रझा पहलवी यांची ज्येष्ठ कन्या नूर पहलवी (३३ वर्षांची) ही सध्या न्यू यॉर्कमध्ये राहत असून, ‘सोफ्रेह कॅपिटल’ या गुंतवणूक संस्थेत प्राचार्य म्हणून काम करत आहे. तिने जॉर्जटाउन विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी आणि कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीए केले आहे. नूर ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून, इंस्टाग्रामवर तिचे १ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. आधुनिक विचारसरणी, राजकीय सजगता आणि नेतृत्वगुणांमुळे तिला भावी इराणसाठी एक शक्तिशाली पर्याय मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Canada Relations: CSIS अहवालातून धक्कादायक उघड! कॅनडामधून रचले जात आहेत भारतविरोधी हिंसाचाराचे कट
इमान पहलवी – आधुनिक जीवनशैली आणि अंतरधर्मीय विवाह
दुसरी कन्या इमान पहलवी (३२ वर्षांची) ही अमेरिकन एक्सप्रेस या बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे. इमानने नुकतेच ब्रॅडली शेरमन या ज्यू व्यावसायिकाशी पॅरिसमध्ये विवाह केला आहे. दोघे २०१७ पासून एकत्र होते आणि २०२३ मध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली होती. इमानचा विवाह हा मुक्त विचार आणि धार्मिक सहिष्णुतेचे प्रतिक मानला जात आहे.
फराह पहलवी – तरुण पिढीतील आशा
सर्वात धाकटी मुलगी फराह पहलवी-२ (२१ वर्षांची) ही वॉशिंग्टन येथे जन्मलेली असून सध्या तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे. याबाबत तिची भूमिका अद्याप सार्वजनिक नाही, परंतु तीही भावी राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
इस्लामिक रिपब्लिक विरोधात क्रांतीचे संकेत?
इराणमध्ये इस्लामिक शासनव्यवस्थेविरोधात असंतोष वाढत चालला आहे. खमेनी यांच्या पुतण्यानेही इस्लामिक रिपब्लिक संपवण्याचे समर्थन केले आहे. अमेरिकेतील निर्वासित रझा पहलवी यांनीही वेळोवेळी खमेनी यांच्यावर टीका केली आहे. देशात युद्धाच्या काळात जनतेचा संयम सुटत असून, अनेकांना राजघराण्याच्या पुनर्स्थापनेची आशा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran-Israel War : ते करत विनाशकारी हल्ल्याची तयारी? अरक अणुभट्टी रिकामी करण्याचा इस्रायली सैन्याचा इराणींना इशारा
पहलवी घराण्याच्या कन्यांचा उदय
आज जेव्हा इराण एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे, तेव्हा पहलवी घराण्याच्या कन्यांचा उदय एक नवे पर्व सुरू करू शकतो. लोकशाही, मानवी हक्क आणि आधुनिकतेच्या बाजूने उभ्या असलेल्या या तीन महिलांमुळे इराणच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. रझा पहलवी यांचा विश्वास आणि त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्या मुलींवर आहे.