मुंबई-पुणे दरम्यान धावणारी ‘डेक्कन क्वीन’ ९६व्या वर्षांत करणार पदार्पण
धावपळीच्या जीवनात कामानिमित्त बाहेर जाताना किंवा इतर वेळी कुठेही फिरायला जाताना प्रवास अधिक सुखकर आणि कमीत कमी वेळात होण्यासाठी लाखो प्रवासी नियमित लोकलने प्रवास करतात. त्यात मध्य रेल्वेच्या प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेल्वे गाड्यांपैकी एक असलेली लोकल ट्रेन म्हणजे ‘डेक्कन क्वीन’ . यंदाच्या वर्षी डेक्कन क्वीन 1 जून 2025 ला 96 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. संपूर्ण राज्यभरात ‘दख्खनची राणी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘डेक्कन क्वीन’ ला ९५ वर्ष पूर्ण झाले आहेत. आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान ही लोकल ट्रेन नियमित प्रवास करते. या रेल्वने दररोज लाखोंच्या संख्येने प्रवाह करत मुंबईमध्ये कामासाठी येतात.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
पुरुषाला लाजवेल असा करारी बाणा; त्याग आणि शौर्य म्हणजे आहिल्याबाई होळकर
1 जून 1930 साली मुंबईहून पुण्यात जाण्यासाठी डेक्कन क्वीन रेल्वे सुरु करण्यात आली होती. त्यावेळी ही रेल्वे गाडी ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (जीआयपीआर) मार्गावर धावत होती. ये रेल्वे गाडीमुळे मुंबईसह पुण्यातील लोक दररोज कामानिमित्त सुखाचा प्रवास करतात. दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी डेक्कन क्वीन रेल्वे सुरु करण्यात आली होती. दोन महत्वाच्या शहरांना जोडणारी पहिली डिलक्स ट्रेन असल्यामुळे तिला ‘डेक्कन क्वीन’ असे नाव देण्यात आले होते. चला तर जाणून घ्या डेक्कन क्वीनचा ९५ वर्षांचा इतिहास.
1 जून 1930 ला सुरु करण्यात आलेली पहिली गाडी ७ डब्यांची होती. रेल्वे प्रत्येकी 7 डब्यांच्या 2 रेकसह चालवण्यात आली होती. ज्यातील एक स्कार्लेट मोल्डिंगसह चंदेरी आणि दुसरी सोनेरी रेषांसह रॉयल ब्लू रंगाने रंगवण्यात आले होते. मूळ रेकच्या डब्यांच्या अंडर फ्रेम्सची बांधणी इंग्लंमध्ये करण्यात आली होती. तर या गाडीचा कोच बॉडी जीआयपी रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आला होता. 1930 पासून ते आत्तापर्यंत ही गाडी नागरिकांच्या सुखकर प्रवासासाठी मुंबई पुणे अशी नियमित चालवली जात आहे.
Dinvishesh : पु. ल. देशपांडे यांना पुण्यभूषण पुरस्काराने केले गौरवांकित; जाणून घ्या 30 मे चा इतिहास
भारतामध्ये तयार करण्यात आलेली एकमेव गाडी म्हणजे ज्यात डायनिंग कार आहे. डायनिंग कार म्हणजे चालत्या गाडीमध्ये बसून प्रवाशांच्या खाण्याची सोय. डेक्कन क्वीनला दख्खनची राणी असे सुद्धा म्हंटले जाते. ही गाडी नियमित पुणे स्टेशनवरून सकाळी 7.15 वाजता निघते आणि 10 वाजून 20 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचते. डेक्कन क्वीन गाडी रुळावर धावला लागली की आजूबाजूच्या अनेक गाड्या उभ्या करून ठेवल्या जातात, असे अनेक प्रवाशांनी सांगितले आहे.