फोटो सौजन्य: गुगल
राज्य चालवाणारा शासक हा थोर परााक्रमी राजा असतो हा एकंदरीतच समज सर्वसामान्यांमध्ये आहे. मात्र हा समज खोटा ठरवणाऱ्या अनेक रणरागिणी या भारताच्या भूमीत होऊन गेल्यात. मेरी झाँसी नही दुंगी म्हणत इंग्रजांशी लढताना पाठीवर बाळाला घेतलेली राणी लक्ष्मी बाई, स्वराज्याचा डोलारा उभा करणाऱ्या, रयतेस पोटचं पोर मानणाऱ्या राजमाता जिजाऊ यांसारख्या वीर महिलांनी स्रीचा कणखर बाणा जगाला पटवून दिला. त्यातलंच एक म्हणजे पुण्य़श्लोक अहिल्याबाई होळकर.
मराठ्य़ांना पराक्रमाचा आणि धाडसाचा वारसा लाभलेला आहे. परस्त्री मातेसमान आणि स्त्री म्हणजे शत्रुला कापणारी तळपती तलावर देखील देखील आहे. इंदौरच्या मल्हारराव होळकरांच्या घराण्याला त्याग आणि शौर्याचा मोठा वारसा लाभलेला आहे. याच होळकरांच्या घरातील रत्न म्हणजे अहिल्याबाई होळकर. हे सांगण्याचं कारण म्हणजे आज 31 मे म्हणजेच अहिल्याबाईंची जयंती. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 बीडच्या जामखेड तालुक्यातील चौंडी या लहान गावातला.
ज्या वयात मुली भातुकलीचा खेळ खेळतात त्या कोवळ्या म्हणजेच अवघ्या 9 व्या वर्षी अहिल्येचं लग्न होळकर घराण्यातच्या मल्हाररावांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झाला होतो. इतिहास अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, अहिल्याबाई या लहानपणापासून हजरजबाबी आणि निडर वृत्तीच्या होत्या. त्यांचं चातुर्य मल्हाररावांनी तारले होते. त्यानंतर 1733 साली विवाह झाल्यानंतर शिंदेंची लेक होळकर घराण्यात सुन म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतर अहिल्याबाईंच्या शिक्षणाला होळकरांच्या घरात श्रीगणेशा करण्यात आला. शिक्षणाने समृद्ध असलेला व्यक्ती विवेकशील असतो आणि हाच विवेकशील अहिल्याबाईंच्या वागण्याबोलण्यात होता.
इतिहास अभ्यासकांनी सांगितल्यानुसार, अहिल्याबाई न्य़ायनिवाडा करताना आपलं परकं, सख्य आणि सावत्र असा भेदभाव करत नसे. त्यांनी न्याय करताना, त्यांच्या पतीला खंडेरावांना देखील झुकतं माप दिलं नाही. अहिल्याबाईंचे पती खंडेराव यांना राजमहच्या लढाईत पराभव पत्करावा लागला होता. मात्र असं असलं तरी त्यांनी बरीच लूट जमा केली होती. ही लूट सरकारी पेटीत जमा करण्यास खंडेरावांचा विरोध होता त्यावेळी अहिल्याबाईंनी खंडेरावांना खडसावून सांगितले की, आणलेल्या लूटीवर रयतेचा हक्क आहे त्यावर तुंम्ही मालकी हक्क सांगू शकत नाही, असं केल्यास कारभारींना झडतीसाठी पाठवावे लागेल आणि तुमच्य़ावर कारवाई देखील केली जाईल. अशा शब्दात अहिल्याबाईंनी पती खंडेरावांना खडेबोल सुनावले. त्यांच्या या न्यायप्रिय स्वभावामुळे मल्हाररावांनी होळतकर घराण्याचा उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली. घर, रयत, सत्ता एकहाती सांभाळण्याची जबाबदारी वयाच्या 20 ते 22 व्या वर्षी अहिल्याबाईंच्या खांद्यावर आली.
पती खंडेरावांच्या मृत्यूंनंतर त्यांच्या अहिल्याबाई आणि नऊ पत्नी या सती जाण्यास तयार होत्या. मात्र मल्हार रावांनी रयतेची जबाबदारी ही अहिल्याबाईंवर सोपवली असल्याने त्यांना सती जाण्यास अडवलं. खंडेरावांच्या इतर 8 पत्नी सती गेल्या मात्र अहिल्याबाईंनी पती पश्चात रयत, सरकारी कामकाज नेटाने पाहिले होते. अशा या कणखर मनाच्या स्त्रीला नवराष्ट्रचा मानाचा सलाम!