Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामाला गती; फलाटावरील निवारा शेडचे काम सुरु

स्थानकातील फलाट दोनवर यापूर्वी कोणताही निवारा शेड नव्हते.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ स्थानकात प्रवासी निवडा शेड बांधण्यास सुरुवात केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 11, 2026 | 02:27 PM
Karjat News : नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामाला गती; फलाटावरील निवारा शेडचे काम सुरु
Follow Us
Follow Us:
  • नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामाला गती;
  • फलाटावरील निवारा शेडचे काम सुरु
 

कर्जत/संतोष पेरणे : मध्ये रेल्वेवरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकातील फलाट दोन वर प्रवाशांचे उन्हापासून संरक्षण होणार आहे.या स्थानकातील फलाट दोनवर यापूर्वी कोणताही निवारा शेड नव्हते.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ स्थानकात प्रवासी निवडा शेड बांधण्यास सुरुवात केली आहे.

ब्रिटिश काळात बनलेल्या नेरळ स्थानकात फलाट दोन वर केवळ दोन डब्बे येथे उभे राहणारे प्रवासी यांच्यासाठी निवारा शेड तेथे होते.त्या ठिकाणी अनेक वर्षे नवीन निवारा शेड उभारण्यात आले नव्हते.त्यात नेरळ स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी यांची संख्या हजारो मध्ये आहे,त्यामुळे येणारे जाणारे प्रवासी यांना या जंक्शन स्थानकात निवारा शेड नसल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती.

Karjat News : माथेरानमध्ये मनमानी कारभार ; राज्य हेरिटेज समितीचे नियम धाब्यावर

नेरळ स्थानकाचा कायापालट करण्याचे मुंबई रेल कॉर्पोरेशन यांच्याकडून घेण्यात आलेले धोरण लक्षात घेता नेरळ स्थानकाला नवीन रूप दिले जात आहे.त्यात फलाट एक वरील संपूर्ण परिसरात स्काय वॉक मुळे बंदिस्त करण्यात आला आहे.त्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवारा शेड निर्माण झाले आहे.मात्र फलाट एक वरील अडचणी कायम असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत होते. परंतु नेरळ स्थानकाच्या फलाट दोन वरील अर्धवट असलेल्या निवारा शेडचे काम सुरू झाले आहे.या निवारा शेड मुळे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण असून कर्जत दिशेकडून मुंबई दिशेकडे असे निवारा शेड उभारण्याचे काम सुरू झाले आहे.भविष्यात 15 डब्यांची लोकल कर्जत पर्यंत येणार असल्याने त्या दृष्टीने नेरळ स्थानकाची लांबी देखील वाढवली गेली आहे.त्या सर्व भागाला निवारा शेड उभे केले जात असल्याने प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

नेरळ स्थानकात फलाट दोन वर असलेल्या ब्रिटिश कालीन इमारती पाडण्यात येत असून या इमारती जमीनदोस्त करण्याचे कार्य पूर्ण झाल्यावर त्या भागात देखील निवारा शेडचा विस्तार होणार आहे.निवारा शेड उभारण्याचे कार्य मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून सुरू असून या कामाला गती देण्याची मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटना यांच्याकडून करण्यात येते.प्रवासी वर्गातून होणारी मागणी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी मुंबई विभागीय महाव्यवस्थापक यांच्याकडे मांडली आहे.

Karjat News : माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर; वन्यप्राण्यांचे रस्ते बंद करण्यांना अभय कोणाचं ?

 

Web Title: Karajat news development work at neral railway station accelerates work on shelter shed on platform begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • central railway
  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध
1

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा
2

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य
3

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
4

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.