Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २६ मे चा इतिहास

Vilasrao Deshmukh Birth Anniversary : आज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि रंगभूमीसाठी अत्यंत खास दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील उमदा चेहरा विलासराव देशमु यांचा जन्मदिवस आहे. तर महाराष्ट्राच्या रंगभूमीतील प्रसिद्ध नाटककार, विनोदी लेखक आणि कवी राम गणेश गडकरी यांचा जन्मदिवस आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 08:48 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

आज, २६ मे, आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी देखील अत्यंत विशेष आहे. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री कॉंग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा जन्मदिवस आहे. १९७४ मध्ये बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पादापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. युवा कॉंग्रेसचे नेते, उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना कामकाज पाहिले आहे. यानंतर १९८० मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी शिक्षण, कृषी, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार प्रभावीपणे पाहिला. त्यांची प्रशासनावर अत्यंत मजबूत पकड होती. आपल्या प्रभावी वक्तृत्त्वाने त्यांनी अनेक सभा गाजवल्या होत्या.

आजचा दिवस महाराष्ट्राच्या रंगभूमीसाठीही अत्यंत खास दिवस आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्राची रंगभूमी गाजवणारे प्रसिद्ध नाटककार, विनोदी लेखक आणि कवी राम गणेश गडकरी यांचा जन्मदिवस आहे. त्यांना गोविंदाग्रज म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी या नावाने १५० कविता लिहिल्या आहेत. तर बाळकराम या टोपनावाने काही विनोदी लेख लिहिले आहेत. एकट प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही चार नाटकेही लिहिली आहेत. राम गडकरी यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर असे म्हटले जायचे.

26 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1896 : निकोलस (दुसरा) रशियाचा झार झाला.
  • 1971 : बांगलादेशातील सिल्हेटमध्ये पाकिस्तानी सैन्याने 71 हिंदूंची हत्या केली.
  • 1986 : युरोपियन समुदाय ने नवीन ध्वज स्वीकारला.
  • 1989 : मुंबईजवळील न्हावा-शेवा बंदराचे उद्घाटन झाले.
  • 1999 : श्रीहरिकोटा येथून पी.एस.एल.व्हि. सी2 या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय.एस.एस.पी. 4 (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी.एल.आर.–टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
  • 2014 : नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
पांरपारिक पत्रांपासून ते डिजिटल सेवांपर्यंत… ; पुण्याच्या टपाल खात्याने स्वत:ला कसे बदललं? लोकांचा पोस्टमनवर ‘विश्वास’ कायम

26 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1667 : ‘अब्राहम डी. मुआव्हर’ – फ्रेन्च गणिती यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 1754)
  • 1885 : ‘राम गणेश गडकरी’ – नाटककार, कवी व विनोदी लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 23 जानेवारी 1919)
  • 1902 : सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ‘कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 1968)
  • 1906 : ‘बेन्जामिन पिअरी पाल’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 14 सप्टेंबर 1989)
  • 1930 : ‘करीम इमामी’ – भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 9 जुलै 2005)
  • 1937 : ‘मनोरमा’ – भारतीय अभिनेत्री आणि गायक यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑक्टोबर 2015)
  • 1938 : ‘बी. बिक्रम सिंग’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 12 मे 2013)
  • 1945 : ‘विलासराव देशमुख’ – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑगस्ट 2012)
  • 1951 : ‘सॅली क्रिस्टेन राइड’ – अमेरिकेची पहिली महिला अंतराळयात्री यांचा जन्म. (मृत्यू: 23 जुलै 2012)
  • 1961 : ‘तारसेम सिंग’ – भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1966 : ‘झोला बड’ – दक्षिण अफ्रिकेची धावपटू यांचा जन्म.
26 मे रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1703 : ‘सॅम्युअल पेपिस’ – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक यांचे निधन. (जन्म: 23 फेब्रुवारी 1633)
  • 1902 : ‘अल्मोन स्ट्राउजर’ – अमेरिकन संशोधक यांचे निधन. (जन्म: 11 फेब्रुवारी 1839)
  • 1908 : ‘मिर्झा गुलाम अहमद’ – अहमदिया पंथाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 13 फेब्रुवारी 1835)
  • 2000 : ‘श्रीपाद वामन काळे’ – अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक यांचे निधन.
  • 2000 : ‘प्रभाकर शिरुर’ – चित्रकार यांचे निधन
  • 2017 : ‘कंवर पाल सिंह गिल’ – पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पोलीस सेवा अधिकारी आणि पंजाब राज्याचे माजी पोलीस महासंचालक यांचे निधन.
Dinvishesh : सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांचे निधन; जाणून घ्या २५ मे चा इतिहास

Web Title: Vilasrao deshmukh birth anniversary history of 26th may marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Ajit Pawar Birth Anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार नेतृत्व अजित पवार यांची जयंती; जाणून घ्या २२ जुलैचा इतिहास
1

Ajit Pawar Birth Anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार नेतृत्व अजित पवार यांची जयंती; जाणून घ्या २२ जुलैचा इतिहास

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा
2

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन; जाणून घ्या २१ जुलैचा इतिहास
3

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन; जाणून घ्या २१ जुलैचा इतिहास

Dinvishesh : नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मानव ठरले ; जाणून घ्या २० जुलैचा इतिहास
4

Dinvishesh : नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मानव ठरले ; जाणून घ्या २० जुलैचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.