Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

What is Void Marriage: ‘शून्य विवाह’ म्हणजे काय? हिंदू विवाह कायदा १९५५ अंतर्गत कोणत्या अटींचे उल्लंघन केल्यास लग्न ठरते अवैध?

Void Marriage: शून्य विवाह म्हणजे असा विवाह जो कायद्याच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच अवैध आणि अस्तित्वात नसल्यासारखा मानला जातो. म्हणजेच, असा विवाह झाला असला तरी कायद्याच्या नजरेत तो वैध मानला जात नाही.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 23, 2026 | 09:44 AM
Hindu Marriage Act, Void Marriage, Family Law, Legal Rights, Marriage Law India,

Hindu Marriage Act, Void Marriage, Family Law, Legal Rights, Marriage Law India,

Follow Us
Close
Follow Us:
  • हिंदू विवाह अधिनियम, 1955 कायद्यांतर्गत विवाह वैध ठरण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत
  • कलम 5 मध्ये हिंदू विवाहासाठी काही मूलभूत अटी नमूद करण्यात आल्या आहेत
  • हिंदू विवाह अधिनियमात “शून्य विवाह” आणि “शून्यकरणीय विवाह” यामध्ये स्पष्ट फरक करण्यात आला आहे.
What is Void Marriage: भारतात विवाह ही केवळ सामाजिक परंपरा नसून एक महत्त्वपूर्ण कायदेशीर संस्थाही मानली जाते. पण अलीकडच्या काळात विवाह आणि नातेसंबंधात सातत्याने वितुष्ट निर्माण होऊ लागल्याने विवाह टिकणे जे समाजापुढे मोठे आव्हान ठरत आहेत. खरतंर हिंदू विवाह अधिनियम, 1955 कायद्यांतर्गत विवाह वैध ठरण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.अशातच या अटींचे उल्लंघन झाल्यास काही विवाहांना “शून्य विवाह” (Void Marriage) किंवा “शून्यकरणीय विवाह” (Voidable Marriage) घोषित केले जाऊ शकते. यामध्ये शून्य विवाह ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आता शून्य विवाह म्हणजे काय असा प्रश्नतुम्हालाही पडला असेल, चला तर मग जाणून घेऊ, काय आहे हा शून्य विवाह.

शून्य विवाह म्हणजे काय?

शून्य विवाह म्हणजे असा विवाह जो कायद्याच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच अवैध आणि अस्तित्वात नसल्यासारखा मानला जातो. म्हणजेच, असा विवाह झाला असला तरी कायद्याच्या नजरेत तो वैध मानला जात नाही. हा विवाह जणू काही कधी झाला नव्हताच, अशा स्वरूपाचा असतो.हिंदू विवाह अधिनियमाच्या कलम 11 मध्ये शून्य विवाहाबाबत तरतूद करण्यात आली आहे. या कलमानुसार, जर विवाहाने कलम 5 मधील काही आवश्यक अटींचे उल्लंघन केले असेल, तर तो विवाह शून्य घोषित केला जाऊ शकतो.

कोणत्या अटींचे उल्लंघन झाल्यास विवाह शून्य ठरतो?

कलम 5 मध्ये हिंदू विवाहासाठी काही मूलभूत अटी नमूद करण्यात आल्या आहेत. त्यातील विशेषतः कलम 5 मधील (i), (iv) आणि (v) या अटींचे उल्लंघन झाल्यास विवाह शून्य मानला जातो.

Child Abuse Awareness: बाललैंगिक अत्याचार, ‘पेडोफिलिक डिसऑर्डर’ आणि विकृतीची कारणे; आरोपींचे मानसशास्त्रीय पॅटर्न कसे ओळखाल?

 

यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होतो:

1. पहिला जोडीदार जिवंत असताना दुसरा विवाह

जर एखाद्या व्यक्तीचा विवाह आधीपासून अस्तित्वात असेल आणि त्याचा/तिचा जोडीदार जिवंत असेल, तर त्या व्यक्तीने केलेला दुसरा विवाह शून्य मानला जातो. हिंदू कायद्यानुसार एकपत्नी किंवा एकपत्नीत्वाची अट बंधनकारक आहे.

2. निषिद्ध नातेसंबंधातील विवाह

जवळच्या रक्तसंबंधातील व्यक्तींमध्ये विवाह करण्यास कायद्यानुसार मनाई आहे. अशा नातेसंबंधात विवाह झाल्यास तो अवैध ठरतो, जोपर्यंत संबंधित समाजात किंवा प्रथेनुसार अशा विवाहाला मान्यता नसते.

3. सपिंड नात्यातील विवाह

सपिंड संबंध म्हणजे विशिष्ट पिढ्यांपर्यंत रक्तसंबंध असलेल्या व्यक्तींमधील नाते. अशा व्यक्तींमध्ये विवाह केल्यास तो कायद्याने शून्य मानला जातो.

शून्य विवाह आणि शून्यकरणीय विवाहातील फरक

हिंदू विवाह अधिनियमात “शून्य विवाह” आणि “शून्यकरणीय विवाह” यामध्ये स्पष्ट फरक करण्यात आला आहे.

शून्य विवाह (Void Marriage): हा विवाह सुरुवातीपासूनच अवैध असतो. न्यायालयाच्या आदेशाशिवायही तो कायद्याने अमान्य मानला जातो.

शून्यकरणीय विवाह (Voidable Marriage): हा विवाह सुरुवातीला वैध मानला जातो; मात्र काही विशिष्ट कारणांवर न्यायालयाकडे अर्ज करून तो रद्द करता येतो.

उदा. फसवणूक, मानसिक असमर्थता किंवा जबरदस्तीने झालेला विवाह हा शून्यकरणीय विवाह ठरू शकतो.

हिंदू विवाह कायद्यातील शून्य व रद्द करण्यायोग्य विवाह : काय सांगतो कायदा?

हिंदू विवाह अधिनियम, १९५५ अंतर्गत विवाह वैध ठरण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालून देण्यात आल्या आहेत. या अटींचे उल्लंघन झाल्यास विवाह “शून्य” (Void) किंवा “रद्द करण्यायोग्य” (Voidable) ठरू शकतो. या दोन्ही संकल्पनांमध्ये मोठा कायदेशीर फरक असून, त्यांचे परिणामही वेगवेगळे असतात.

शून्य विवाह म्हणजे काय?

शून्य विवाह म्हणजे असा विवाह जो कायद्याच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच अवैध मानला जातो. म्हणजेच, असा विवाह कधी अस्तित्वातच नव्हता, असे कायदा मानतो. हिंदू विवाह अधिनियमाच्या कलम ११ मध्ये अशा विवाहांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Child Abuse Awareness part 2: घरातील हिंसा ठरतेय विकृतीचे मूळ; मुलांमधील ‘असंवेदनशीलता’ भविष्यासाठी धोक्याची घंटा

शून्य विवाह ठरण्याची प्रमुख कारणे

१. एकपत्नीत्वाच्या अटीचे उल्लंघन कलम ५(i):

जर विवाहाच्या वेळी पती किंवा पत्नी यांपैकी कोणाचाही आधीचा जोडीदार जिवंत असेल आणि कायदेशीर घटस्फोट झालेला नसेल, तर दुसरा विवाह शून्य ठरतो.

२. निषिद्ध नातेसंबंधातील विवाह – कलम ५(iv)
जवळच्या रक्तसंबंधातील व्यक्तींमध्ये विवाह करण्यास कायद्याने मनाई आहे. संबंधित समाजात अशी प्रथा मान्य नसल्यास असा विवाह शून्य मानला जातो.

३. सपिंड नातेसंबंधातील विवाह – कलम ५(v)

विशिष्ट पिढ्यांपर्यंत रक्तसंबंध असलेल्या व्यक्तींना सपिंड नाते म्हणतात. अशा नात्यातील विवाह, समाजमान्य प्रथा नसल्यास, शून्य ठरतो.

 

रद्द करण्यायोग्य विवाह म्हणजे काय?

हिंदू विवाह अधिनियमाच्या कलम १२ अंतर्गत “रद्द करण्यायोग्य विवाह” या संकल्पनेचा उल्लेख आहे. असा विवाह सुरुवातीला वैध मानला जातो; मात्र पीडित पक्ष न्यायालयात अर्ज करून तो रद्द करू शकतो. जर कोणीही न्यायालयात अर्ज केला नाही, तर विवाह वैध राहतो.

रद्द करण्यायोग्य विवाहाची कारणे

१. नपुंसकता

जर पती किंवा पत्नी यांपैकी एखादी व्यक्ती लैंगिक संबंध ठेवण्यास शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या असमर्थ असेल आणि त्यामुळे विवाह पूर्ण झाला नसेल, तर विवाह रद्द करता येतो.

२. मानसिक अस्वस्थता

विवाहाच्या वेळी एखादा पक्ष मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल किंवा गंभीर मानसिक विकाराने ग्रस्त असेल, तर विवाह रद्द करण्यायोग्य ठरतो.

३. फसवणूक किंवा बळजबरीने मिळवलेली संमती

जर विवाहासाठी संमती दबावाखाली किंवा फसवणुकीने घेतली गेली असेल, तर विवाह रद्द करता येतो.

Web Title: What is a void marriage essential conditions under the hindu marriage act 1955 explored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 09:44 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.