What was history like when someone ruled America the largest country
History of America as largest country : 4 जुलै 1776 रोजी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आपल्या स्वातंत्र्याची २४९ वी वर्षपूर्ती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. हा दिवस केवळ एक सार्वजनिक सुट्टी नाही, तर अमेरिकेच्या स्वातंत्र्य, लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूल्यांचा सन्मान करणारा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अभिमानाचा क्षण आहे.
४ जुलै १७७६ हा दिवस अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसाठी ओळखला जातो, जेव्हा कॉन्टिनेन्टल काँग्रेसने थॉमस जेफरसन यांनी लिहिलेला ऐतिहासिक ‘डेक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स’ स्वीकारला. या घोषणेमुळे अमेरिकेच्या १३ वसाहतींनी ब्रिटीश राजवटीपासून पूर्णपणे स्वतंत्र असल्याचे जाहीर केले आणि नव्या राष्ट्राची युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची पायाभरणी झाली.
जरी ४ जुलै हा अधिकृतपणे ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो, तरी स्वातंत्र्यासाठी मतदान प्रत्यक्षात २ जुलै १७७६ रोजी झाले होते, जेव्हा रिचर्ड हेन्री ली यांच्या प्रस्तावाला कॉन्टिनेन्टल काँग्रेसने संमती दिली. मात्र, ४ जुलै रोजी स्वातंत्र्याच्या घोषणेला लेखी स्वरूपात मान्यता देण्यात आली आणि म्हणूनच तो दिवस अमेरिकन इतिहासात टर्निंग पॉइंट ठरला. या घोषणेमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, “सर्व मानव समान निर्माण झाले आहेत आणि त्यांना त्यांच्या निर्मात्याने जीवन, स्वातंत्र्य आणि आनंदाच्या शोधाचे अविभाज्य अधिकार दिले आहेत.” ही वाक्ये आजही अमेरिकन लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत तत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सूर्यमालेत परग्रहीय ‘घुसखोर’! नासाचा ‘Interstellar Object A11pl3Z’ बद्दल धक्कादायक खुलासा
स्वातंत्र्याच्या घोषणेमध्ये ब्रिटनचा राजा जॉर्ज तिसरा यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. हा दस्तऐवज स्विकारल्यानंतर, २ ऑगस्ट १७७६ रोजी त्यावर स्वाक्षऱ्यांची प्रक्रिया सुरू झाली, आणि पूर्णपणे सर्व १३ वसाहतींच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी अनेक महिने लागले. या वसाहती होत्या: न्यू हॅम्पशायर, मॅसॅच्युसेट्स, रोड आयलंड, कनेक्टिकट, न्यू यॉर्क, न्यू जर्सी, पेनसिल्व्हेनिया, डेलावेअर, मेरीलँड, व्हर्जिनिया, उत्तर कॅरोलिना, दक्षिण कॅरोलिना आणि जॉर्जिया.
१९४१ पासून, ४ जुलै हा दिवस अमेरिकेत ‘संघीय सुट्टी’ म्हणून अधिकृतपणे साजरा केला जातो. यानिमित्ताने संपूर्ण देशभर परेड, फटाके, मेळे, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली आणि राजकीय भाषणे आयोजित केली जातात. अमेरिकन नागरिक या दिवशी कौटुंबिक सहभोजन, झेंडे फडकावणे आणि देशभक्तिपूर्ण गीतांद्वारे आपला अभिमान व्यक्त करतात. पण या उत्सवांपलीकडे, ४ जुलैचा खरा अर्थ अमेरिकन नागरिकांच्या मनात ‘स्वातंत्र्य आणि लोकशाहीची जाणीव’ जागवतो. हा दिवस संस्थापक पित्यांच्या बलिदानांची आठवण करून देतो आणि स्वतंत्रतेसाठी लढणाऱ्यांना आदरांजली वाहण्याचा प्रसंग ठरतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सीमेवर चीनचे ‘राक्षस’ तैनात! मानवाऐवजी यंत्रांचा वापर; भारतासाठी समोर उभे ठाकले नवे सुरक्षा आव्हान
४ जुलै १७७६ हा दिवस केवळ इतिहासातील एक तारीख नाही, तर ती अमेरिकन स्वातंत्र्याच्या लढ्याची, तत्त्वनिष्ठतेची आणि मानवी हक्कांची साक्ष आहे. आज २४९ वर्षांनंतरही, हा दिवस अमेरिकन लोकांच्या हृदयात एकतेचा, अभिमानाचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देतो. त्यामुळेच ४ जुलै हा दिवस केवळ अमेरिकेचाच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी लोकशाही आणि स्वातंत्र्याचा दीपस्तंभ मानला जातो.