सूर्यमालेत परग्रहीय ‘घुसखोर’! नासाचा 'Interstellar Object A11pl3Z' बद्दल धक्कादायक खुलासा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
interstellar object A11pl3Z : आपल्या सूर्यमालेत एक परग्रहीय ‘घुसखोर’ दाखल झाला असून, ही घटना खगोलशास्त्राच्या इतिहासात केवळ तिसऱ्यांदाच घडली आहे. A11pl3Z असे नाव असलेल्या या आंतरतारकीय वस्तूने जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे वेगवेगळे निरीक्षण करताना नासाने आणि युरोपियन स्पेस एजन्सीने (ESA) या घटनेला दुर्मिळ आणि ऐतिहासिक असे संबोधले आहे.तिसरा ‘आंतरतारकीय’ पाहुणा
A11pl3Z ही वस्तू सूर्यमालेबाहेरून आलेली आंतरतारकीय वस्तू (Interstellar Object) आहे. अशी वस्तू जी आपल्या सूर्यमालेत कोणत्याही ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणाने बांधली गेली नाही आणि जी एका वेगळ्या आकाशगंगेतील किंवा ताऱ्यांच्या प्रणालीतील असण्याची शक्यता आहे. ESA च्या निवेदनानुसार, या वस्तूचा मार्ग अत्यंत असामान्य असून, तिची गतीही साधारण खगोलीय वस्तूंप्रमाणे नाही. तिच्या कक्षेची विक्षिप्तता (eccentricity) 6 ते 11.6 दरम्यान असल्याचे निरीक्षणात आले आहे, जे अत्यंत टोकाचे मानले जाते. ही गती आणि दिशा सूचित करतात की A11pl3Z ही वस्तू केवळ आपल्या सूर्यमालेतून फिरत आहे आणि नंतर परत आंतरतारकीय अवकाशात निघून जाणार आहे.
या वस्तूचा सर्वप्रथम शोध नासाच्या ATLAS (Asteroid Terrestrial-impact Last Alert System) ने लावला. ATLAS हे पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या धोकादायक लघुग्रहांचा आणि वस्तूंचा शोध घेण्यासाठी वापरले जाणारे अलर्ट सिस्टम आहे. या घडामोडीनंतर, जगभरातील शास्त्रज्ञ व्यावसायिक आणि हौशी खगोलशास्त्रज्ञ – यांनीही A11pl3Z वर लक्ष केंद्रित केले आहे. ESA विविध दुर्बिणी आणि जागतिक नेटवर्कच्या साहाय्याने या वस्तूचे बारकाईने निरीक्षण करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : थायलंडच्या राजकारणात नाट्यमय वळण; सत्ता वाचवण्यासाठी निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांची तिरपी चाल अन्…
नासाच्या अहवालानुसार, A11pl3Z ही वस्तू सध्या गुरू ग्रहाच्या कक्षेत आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात ती सूर्याच्या अत्यंत जवळ पोहोचेल, जे सुमारे 1.35 खगोलीय युनिट्स (200 दशलक्ष किमी) एवढे अंतर आहे. ही वस्तू पृथ्वीच्या दिशेने येत नसल्यामुळे कोणताही धोका नाही, पण ती मंगळाच्या तुलनेने जवळून जाणार असल्याने ही शास्त्रज्ञांसाठी महत्त्वाची वैज्ञानिक संधी असणार आहे.
आंतरतारकीय वस्तूंचे निरीक्षण करणे हे खूपच कठीण आणि दुर्मिळ असते. याआधी केवळ दोनच अशा वस्तू – ʻOumuamua (2017) आणि 2I/Borisov (2019) – या ओळखल्या गेल्या होत्या. त्यामुळे A11pl3Z ही केवळ तिसरी ओळख पटलेली आंतरतारकीय वस्तू ठरली आहे. शास्त्रज्ञांचे मत आहे की आपल्या सूर्यमालेत अजूनही अशा अनेक आंतरतारकीय वस्तू प्रवेश करत असतील, पण त्यांचा वेग, आकार आणि लहानपणामुळे आपण त्या ओळखू शकत नाही. त्यामुळे A11pl3Z हे एक दुर्मिळ ‘कोस्मिक पाहुणे’ असल्याचे मानले जात आहे.
या वस्तूच्या निरीक्षणातून बाहेरील आकाशगंगा, ताऱ्यांच्या निर्मितीचे अवशेष, आणि वेगवेगळ्या ग्रह प्रणालींच्या विकासाबाबतची महत्त्वाची माहिती मिळू शकते. A11pl3Z ही वस्तू कुठून आली, तिचा रासायनिक किंवा खनिजीय संरचना कशी आहे, याचा अभ्यास भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी अमूल्य ठरेल. नासाने आणि ESA ने यावर सुरू केलेल्या संशोधनाकडे आता संपूर्ण वैज्ञानिक जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारतात जन्म घेणार पुढील दलाई लामा’; चीनचा जळफळाट, उत्तराधिकाऱ्याच्या मुद्द्यावरून ‘India vs China’ जुंपली
A11pl3Z या आंतरतारकीय धूमकेतूच्या आगमनामुळे सूर्यमालेतील आणि अवकाशातील अनोख्या घटकांचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही घटना केवळ एक खगोलीय अद्भुतता नसून, आपल्या विश्वाच्या रहस्यांचा थेट शोध घेण्याची एक अपूर्व संधी आहे.