Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pulse Polio Campaign: भारत १२ वर्षांपूर्वीच पोलिओमुक्त, तरीही दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम का राबवली जाते? जाणून घ्या मुख्य कारण

Pulse Polio Campaign: केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार, २८ जून २०२६ रोजी देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत बायव्हॅलेंट ओरल पोलिओ लसीचे (bOPV) दोन थेंब दिले जाणार आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 27, 2026 | 06:30 PM
Pulse Polio, Polio Free India, WHO, Public Health, Vaccination Drive, Child Health care, Immunity Boost,

Pulse Polio, Polio Free India, WHO, Public Health, Vaccination Drive, Child Health care, Immunity Boost,

Follow Us
Follow Us:

Pulse Polio Campaign: एक काळ असा होता की भारतात दरवर्षी पोलिओमुळे हजारो मुले कायमची अपंग होत असत. गावांपासून ते महानगरांपर्यंत, हा आजार पालकांसाठी सर्वात मोठी भीती बनला होता. परंतु अनेक वर्षांच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेनंतर, लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने आणि लाखो मुलांच्या लसीकरणामुळे भारताने या आजारावर एक ऐतिहासिक विजय मिळवला.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताला २७ मार्च २०१४ रोजी पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले असले, तरी दरवर्षी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवली जाते. अनेकांच्या मनात याबाबत प्रश्न निर्माण होतो. यामागील प्रमुख कारण म्हणजे जगातील काही देशांमध्ये आजही पोलिओ विषाणू पूर्णपणे नष्ट झालेला नसल्याने भारतात त्याचा पुन्हा शिरकाव होण्याची शक्यता कायम आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही शेजारील देशांमध्ये अजूनही पोलिओची प्रकरणे आढळत आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास आणि सीमापार मानवी हालचालींमुळे हा विषाणू भारतात पुन्हा येण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे देशातील प्रत्येक बालकाची पोलिओविरुद्धची प्रतिकारशक्ती कायम राहावी, यासाठी दरवर्षी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवली जाते.

Deafblind Awareness Day: धार आणि शांततेच्या जगात आशेचा किरण; जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

२७ मार्च २०१४ रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताला अधिकृतपणे पोलिओमुक्त घोषित केले. भारताच्या सार्वजनिक आरोग्य इतिहासातील ही एक सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते.

पोलिओ म्हणजे काय आणि तो किती धोकादायक आहे?

पोलिओ हा एक विषाणूजन्य आजार आहे जो प्रामुख्याने ५ वर्षांखालील मुलांना होतो. हा विषाणू मज्जासंस्था आणि मणक्यावर हल्ला करतो आणि अनेक प्रकरणांमध्ये हात किंवा पाय कायमचा लुळा पाडू शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये, तो श्वसनाच्या स्नायूंवरही परिणाम करू शकतो, ज्यामुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण होते.

भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण कधी आढळला होता?

भारतातील पोलिओचा शेवटचा रुग्ण १३ जानेवारी २०११ रोजी पश्चिम बंगालमध्ये नोंदवला गेला. महाराष्ट्रात, शेवटचा रुग्ण सप्टेंबर २०१० मध्ये बीड जिल्ह्यात आढळला होता. यानंतर, सलग तीन वर्षे एकही नवीन रुग्ण आढळला नाही, ज्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) २७ मार्च २०१४ रोजी भारताला पोलिओमुक्त घोषित केले.

 

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमांपैकी एक

‘दो बूंद जिंदगी की’ या घोषवाक्याखाली राबविण्यात येणारी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ही जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमांपैकी एक मानली जाते. दरवर्षी देशभरातील लाखो बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजले जातात. या मोहिमेत लाखो डॉक्टर, परिचारिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी सहभागी होतात.

भारतातील पोलिओबाबत महत्त्वाची माहिती

– राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम १९९५ मध्ये सुरू झाली.
– भारतातील शेवटचा पोलिओग्रस्त रुग्ण १३ जानेवारी २०११ रोजी आढळला.
– २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त घोषित केले.
– महाराष्ट्रातील शेवटचा पोलिओ रुग्ण सप्टेंबर २०१० मध्ये बीड जिल्ह्यात आढळला.
– पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी आजही दरवर्षी लाखो मुलांना पोलिओचे थेंब दिले जातात.

World MSME Day 2026: भारताच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा; 27 जूनला का साजरा केला जातो ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन’?

२८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार, २८ जून २०२६ रोजी देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत बायव्हॅलेंट ओरल पोलिओ लसीचे (bOPV) दोन थेंब दिले जाणार आहेत.

महाराष्ट्रात १.०३ कोटी बालकांना पोलिओचे थेंब

महाराष्ट्र शासनाच्या माहितीनुसार, यंदाच्या मोहिमेत राज्यातील सुमारे १.०३ कोटी बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभरात ८९,४८९ पोलिओ बूथ, २६,५३० ट्रान्झिट पथके, १३,५१८ मोबाईल पथके आणि ५८६ नाईट शिफ्ट पथके कार्यरत राहणार आहेत.

आरोग्य विभागाने सर्व पालकांना आवाहन केले आहे की, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

 

 

Web Title: Why india conducts pulse polio campaign every year even after who polio free certification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Child Health
  • Free Vaccination
  • Pulse Polio Vaccination
  • WHO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.