World Energy Independence Day highlights the shift to clean energy crucial for India's sustainable future
World Energy Independence Day : १० जुलै रोजी दरवर्षी साजरा होणारा जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन हा जगभरातील नागरिकांना आणि सरकारांना स्वच्छ, शाश्वत आणि पर्यायी ऊर्जेच्या वापराबाबत जागरूक करणारा एक महत्त्वाचा दिवस आहे. सौर, पवन, बायोगॅस, जल आणि भूऔष्णिक ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करून हा दिवस जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्याचे आणि पर्यावरणाच्या रक्षणाचे आवाहन करतो.
या दिवसाचे मूळ २००५ साली लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया) येथे घातले गेले. हरित ऊर्जेचे पुरस्कर्ते मायकेल डी. अँटोनोविच यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे हा दिवस महान शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांच्या वाढदिवशी साजरा केला जातो, जे एक शतकापूर्वीच अक्षय ऊर्जेच्या संकल्पना मांडत होते.
जगातील वाढत्या प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींमुळे आज ऊर्जा स्वातंत्र्य ही संकल्पना अधिक गरजेची झाली आहे. विशेषतः विद्युत वाहनांचा (EVs) वाढता प्रसार, वैयक्तिक घरांवर सौर पॅनेल बसवणे, ग्रामीण भागात बायोगॅस वापरणे हे लक्षणीय बदल आहेत. अक्षय ऊर्जा वापरल्याने कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन सुमारे ३०% पर्यंत कमी होऊ शकते, असे शास्त्रज्ञ सांगतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तैवानकडून चीनविरोधात मोठे शक्तिप्रदर्शन! अमेरिकेच्या HIMARS रॉकेट आणि अब्राम्स टँकसह सर्वात मोठा युद्धसराव सुरु
भारत एक विकसनशील आणि ऊर्जा-गव्हरण देश असून, येथे अजूनही लाखो कुटुंबांना शाश्वत व स्वच्छ ऊर्जेची गरज आहे. ऊर्जेच्या स्वावलंबनासाठी भारताने सौर ऊर्जा प्रकल्प, वारा ऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पांवर भर देणे सुरू केले आहे. प्रधानमंत्री कुसुम योजना, सौर ऊर्जा पार्क, आणि EV प्रोत्साहन धोरणे यांसारख्या उपक्रमांनी भारत ऊर्जा स्वातंत्र्याकडे सकारात्मक वाटचाल करत आहे. भारतासाठी ऊर्जा स्वातंत्र्य म्हणजे परकीय इंधनांवरील खर्चात बचत, ऊर्जा सुरक्षेची हमी आणि पर्यावरणीय शाश्वततेचे लक्ष्य गाठणे. याशिवाय, स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात उद्योगधंद्यांसाठी नवे रोजगार, नव्या संधीही निर्माण होत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : उत्तर कोरियात गुप्त हालचालींना वेग! किम जोंग उनने बदलले बॉडीगार्ड, नेमकं कारण काय?
ऊर्जा स्वातंत्र्य ही केवळ सरकारांची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. आपण आपल्या घरात सौर पॅनेल लावू शकतो, कमी वीज वापरणारे उपकरण वापरू शकतो, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू शकतो ही सर्व लहान पावले ऊर्जा बचतीसाठी मोलाची ठरतात. आजच्या दिवशी समाज, उद्योग, शेतकरी आणि तरुण पिढी यांना आवाहन आहे की त्यांनी ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने ठोस पावले उचलावीत. स्वच्छ, हरित आणि उज्ज्वल भविष्यासाठी हेच आजचे खरे ध्येय आहे.