Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक आरोग्याच्या शाश्वतीसाठी WHO ची झाली स्थापना; जाणून घ्या 07 एप्रिलचा इतिहास

विविध देशांमध्ये संसर्गजन्य आजार, कुपोषण आणि अपुरी वैद्यकीय सुविधा यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत होते. या पार्श्वभूमीवर सर्व देशांनी एकत्र येऊन जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी WHO ची स्थापना केली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 07, 2026 | 10:47 AM
World Health Organization WHO was established to ensure global health.

World Health Organization WHO was established to ensure global health.

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची आरोग्य संस्था असून तिची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर आरोग्यविषयक समस्या वाढत होत्या. विविध देशांमध्ये संसर्गजन्य आजार, कुपोषण आणि अपुरी वैद्यकीय सुविधा यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत होते. या पार्श्वभूमीवर सर्व देशांनी एकत्र येऊन जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी WHO ची स्थापना केली. WHO चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व लोकांना सर्वोच्च आरोग्य सुविधा मिळवून देणे. संस्था लसीकरण मोहिमा, रोगप्रतिबंध, संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापन यावर कार्य करते. पोलिओ, क्षयरोग, मलेरिया यांसारख्या आजारांविरोधात WHO ने मोठे योगदान दिले आहे. आज WHO जगभरातील आरोग्य धोरणे ठरवण्यात आणि देशांना मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य व्यवस्थेत या संस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. (Dinvishesh)

 

07 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1875 : आर्य समाजाची स्थापना झाली.
  • 1827 : जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता
  • 1906 : माउंट व्हेसुव्हियसचा उद्रेक होऊन नेपल्स शहराचा नाश झाला..
  • 1927 : AT&T अभियंता हर्बर्ट इव्हस यांनी पहिले लांब-अंतराचे सार्वजनिक दूरदर्शन प्रसारण (वॉशिंग्टन, डी.सी., वाणिज्य सचिव हर्बर्ट हूवर यांची प्रतिमा प्रदर्शित करून न्यूयॉर्क शहरापर्यंत) प्रसारित केले.
  • 1939 : दुसरे महायुद्ध – इटलीने अल्बेनियावर आक्रमण केले.
  • 1940 : पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
  • 1948 : जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.
  • 1964 : आय.बी.एम. सिस्टम 360 ची घोषणा.
  • 1989 : लाथा नावाच्या विषारी दारूमुळे बडोद्यात 128 जणांचा मृत्यू झाला.
  • 1996 : श्रीलंकेचा क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्याने सिंगरकरंडक स्पर्धेत 17 चेंडूत विश्वविक्रमी अर्धशतक झळकावले.
  • 2022 : केतनजी ब्राउन जॅक्सनची युनायटेड स्टेट्सच्या सर्वोच्च न्यायालयासाठी पुष्टी झाली, ती पहिली कृष्णवर्णीय महिला न्यायमूर्ती बनली.
हे देखील वाचा : जागतिक वारसस्थळांची जबाबदारी कोणाची? युद्धामध्ये भक्ष्यस्थानी वारसास्थळे अन् इतिहासाचे साक्षीदार

07 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1506 : ‘सेंट फ्रान्सिस झेविअर’ – ख्रिस्ती धर्मप्रसारक यांचा जन्म. (मृत्यू: 3 डिसेंबर 1552)
  • 1770 : ‘विल्यम वर्डस्वर्थ’ – स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 1850)
  • 1860 : ‘विल केलॉग’ – केलॉग्ज चे मालक यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑक्टोबर 1951)
  • 1891 : ‘सर डेविड लो’ – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 19 सप्टेंबर 1963)
  • 1920 : ‘पंडित रविशंकर’ – भारतरत्‍न सतार वादक यांचा जन्म. (मृत्यू: 12 डिसेंबर 2012)
  • 1925 : ‘चतुरानन मिश्रा’ – केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 2011)
  • 1938 : ‘काशीराम राणा’ – भाजपाचे लोकसभा सदस्य यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑगस्ट 2012)
  • 1942 : ‘जितेंद्र’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1954 : ‘जॅकी चेन’ – हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1982 : ‘सोंजय दत्त’ – भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर यांचा जन्म
हे देखील वाचा : आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या बळावर आरोग्यसेवेची नवी दिशा; AI ठरतोय गेमचेंजर?

07 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1498 : ‘चार्ल्स (आठवा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 30 जून 1470)
  • 1935 : ‘डॉ. शंकर आबाजी भिसे’ – भारतीय शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 29 एप्रिल 1867)
  • 1947 : ‘हेन्री फोर्ड’ – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 30 जुलै 1863)
  • 1977 : ‘राजा बढे’ – चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1912)
  • 2001 : गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा ‘डॉ. जी. एन. रामचंद्रन’ – जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1922)
  • 2004 : ‘केलुचरण महापात्रा’ – प्रसिद्ध ओडिसी नर्तक यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1926)

Web Title: World health organization who was established to ensure global health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • WHO

संबंधित बातम्या

महात्मा गांधींनी केला भारतीयांना स्वाभिमान जागवणारा मिठाचा सत्याग्रह; जाणून घ्या 06 एप्रिल
1

महात्मा गांधींनी केला भारतीयांना स्वाभिमान जागवणारा मिठाचा सत्याग्रह; जाणून घ्या 06 एप्रिल

स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शाहिस्ता खानची महाराजांनी छाटली बोटं; जाणून घ्या 05 एप्रिलचा इतिहास
2

स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शाहिस्ता खानची महाराजांनी छाटली बोटं; जाणून घ्या 05 एप्रिलचा इतिहास

शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक नारायणराव व्यास यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ०४ एप्रिलचा इतिहास
3

शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक नारायणराव व्यास यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ०४ एप्रिलचा इतिहास

स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर घेतला अखेरचा श्वास; जाणून घ्या 03 एप्रिलचा इतिहास
4

स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर घेतला अखेरचा श्वास; जाणून घ्या 03 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.