Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Post Day: ‘स्मार्टफोन’च्या युगातही अबाधित आहे पुण्याच्या ऐतिहासिक टपाल इमारतीचा रुबाब

World Post Day: जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने पुण्याच्या जीपीओकडे पाहिले तर ‘पत्रातून डिजिटल संदेशापर्यंत’चा प्रवास एका इमारतीत अनुभवता येतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2026 | 04:30 PM
World Post Day

World Post Day

Follow Us
Follow Us:
  • मुकुटाची पत्रपेटी अन् हत्ती बांधण्याचे दगड; पुणे जीपीओची अनोखी कहाणी
  • पुण्याच्या टपाल पेटीत दडला शहराचा इतिहास
  • हत्तींच्या पाठीवरून जाणाऱ्या टपालाची साक्षीदार पुणे जीपीओची ऐतिहासिक इमारत
पुणे/World Post Day: मोबाईलच्या एका क्लिकवर संदेश काही सेकंदांत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. व्हॉट्सअॅप, ई-मेल आणि सोशल मीडियाच्या युगात कागदावर लिहिलेल्या पत्राची जागा जवळपास इतिहासजमा झाली आहे. मात्र, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक जीपीओची इमारत आजही या बदलाची साक्ष देत उभी आहे. ‘दाक’च्या काळापासून (Navarashtra Special) डिजिटल सेवांपर्यंतचा टपाल व्यवस्थेचा प्रवास या इमारतीने जवळून पाहिला आहे.

पुण्यातील टपाल सेवेचा इतिहास ब्रिटिश काळापूर्वीपर्यंत जातो. पेशव्यांच्या काळात ‘दाक’च्या माध्यमातून महत्त्वाच्या ठिकाणी संदेश पोहोचविले जात होते. १८१८ नंतर ब्रिटिशांनी पुण्यातील टपाल व्यवस्था अधिक संघटित केली. पुढे १८५४च्या पोस्ट ऑफिस कायद्यानंतर देशभर टपाल व्यवस्थेत मोठे बदल झाले.

Post Office च्या ‘या’ योजनेत पंतप्रधान मोदीही करतात गुंतवणूक, केवळ व्याजातून होते लाखोंची कमाई

पुणे जीपीओच्या परिसरात या जुन्या काळाच्या अनेक खुणा आजही पाहायला मिळतात. टपाल वाहून नेण्यासाठी पूर्वी हत्तींचा वापर केला जात असे. त्या हत्तींच्या साखळ्या किंवा दोर बांधण्यासाठी वापरले जात असलेले दगड आजही परिसरात इतिहासाची साक्ष देतात. तसेच जीपीओ परिसरातील जुन्या पत्रपेटीवर राणी एलिझाबेथच्या मुकुटाचे चिन्ह आहे. त्या पत्रपेटीतून पाठविलेल्या पत्रांवर पुणे मुख्य टपाल कार्यालयाची विशेष चित्रमय शिक्कामोर्तब होत असे.

काळ बदलला आणि टपाल व्यवस्थेनेही त्यानुसार स्वतःमध्ये बदल केले. स्पीड पोस्ट, पार्सल, बचत योजना, टपाल जीवन विमा, आधारशी संबंधित सेवा यांसह अनेक सेवा टपाल कार्यालयातून उपलब्ध झाल्या. त्यामुळे आज टपाल कार्यालय म्हणजे केवळ पत्र पाठविण्याचे ठिकाण राहिलेले नाही. पुणे जीपीओसह शहरातील विविध टपाल कार्यालयांमध्ये नागरिक विविध आर्थिक व नागरिक सेवा घेण्यासाठी येतात.

एकेकाळी एखादे पत्र आपल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस, आठवडे लागत होते. आता डिजिटल संदेश काही सेकंदांत पोहोचतो. तरीही कागदावर लिहिलेल्या पत्राची भावनिक किंमत कायम आहे. त्यामुळेच पुण्याच्या या ऐतिहासिक जीपीओकडे पाहताना हा केवळ एक सरकारी कार्यालयाचा परिसर नसून, शहराच्या बदलत्या संवादव्यवस्थेचा जिवंत इतिहास असल्याचे जाणवते.

जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने पुण्याच्या जीपीओकडे पाहिले तर ‘पत्रातून डिजिटल संदेशापर्यंत’चा प्रवास एका इमारतीत अनुभवता येतो.

मोठी बातमी! India Post GDS 4th Merit List जाहीर; एकूण २८,६३६ जागांमध्ये तुमची निवड झाली का? ‘या’ सोप्या ट्रिकने लगेच चेक करा

पुणे जीपीओच्या अंगणात इतिहासाच्या खुणा 

१९व्या शतकात पुण्यात संघटित टपाल व्यवस्थेचा विस्तार
१८५४ – पोस्ट ऑफिस कायद्यानंतर देशभर टपाल व्यवस्थेत मोठा बदल
१९२८ – पुणे जीपीओच्या सध्याच्या इमारतीचा विस्तार
हत्तींच्या टपालाची साक्ष – जुन्या काळातील हत्ती बांधण्यासाठी वापरलेले दगड आजही परिसरात
ऐतिहासिक पत्रपेटी – राणी एलिझाबेथच्या मुकुटाचे चिन्ह असलेली पत्रपेटी
आजचे जीपीओ – पत्रांबरोबरच पार्सल, बचत, विमा, आधार आदी विविध सेवांचे केंद्र.

Web Title: World post day navarashtra special postal services peshwa dak system to digital news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • India Post
  • navarashtra special
  • post office

संबंधित बातम्या

World Octopus Day : ‘तीन हृदये, अफाट बुद्धिमत्ता आणि निळे रक्त…’; असे आहे समुद्रातील या बुद्धिमान प्राण्याचे रहस्यमय विश्व
1

World Octopus Day : ‘तीन हृदये, अफाट बुद्धिमत्ता आणि निळे रक्त…’; असे आहे समुद्रातील या बुद्धिमान प्राण्याचे रहस्यमय विश्व

Indian Air Force Day: 8 ऑक्टोबर रोजी का साजरा केला जातो भारतीय हवाई दल दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
2

Indian Air Force Day: 8 ऑक्टोबर रोजी का साजरा केला जातो भारतीय हवाई दल दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

World Cotton Day: 7 ऑक्टोबरला का साजरा केला जातो जागतिक कापूस दिवस? जाणून घ्या ‘पांढऱ्या सोन्याचे’ महत्त्व
3

World Cotton Day: 7 ऑक्टोबरला का साजरा केला जातो जागतिक कापूस दिवस? जाणून घ्या ‘पांढऱ्या सोन्याचे’ महत्त्व

Peaceful Communication: संघर्षाच्या काळात ‘संवाद’ कसा ठरू शकतो शांततेचा सर्वात मोठा मार्ग? जाणून घ्या सविस्तर
4

Peaceful Communication: संघर्षाच्या काळात ‘संवाद’ कसा ठरू शकतो शांततेचा सर्वात मोठा मार्ग? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.