
World Science Day for Peace and Development
World Science Day 2025 : दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी जागतिक विज्ञान दिन साजरा केला जातो. आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, तसेच समाजाच्या प्रगतीमध्ये विज्ञानाचे महत्त्व आणि भूमिका स्पष्ट करतो. यंदा २०२५ चा जागतिक विज्ञान उत्सव हा समरकंद, उझबेकिस्तान येथे युनेस्को जनरल कॉन्फरन्सच्या ४३ व्या अधिवेशनात साजरा केला जाणार आहे. जगात शांतता आणि विकास प्रस्थापित करणे हे या दिनाचे महत्त्व असते. तसेच लोकांना विज्ञानाचे महत्त्व पटवनू देणे देखील याचा हेतू आहे. आज आपण या दिनानिमत्त यंदाची थीम, या दिवसाचा इतिहास आणि त्याचा जागतिक प्रभावाबद्दल जाणून घेणार आहे. यासाठी हा संपूर्ण लेख नक्की वाचा.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जागतिक विज्ञान दिन आपल्या समाजात विज्ञानाची भूमिका आणि त्याचे महत्त्व अधोरेखित तर करतोच, शिवाय विज्ञानातील समस्यांवरील वादविवादंमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावते. या दिनाची घोषणा २००१ मध्ये UNESCO ने केली होती, जो २००२ पासून अधिकृतपण साजरा केला जाऊ लागला. या दिनाची सुरुवात बुडापेस्टमध्ये १९९९ साली झाली होती. वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन सायन्स या परिषदेत विज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञानाच्या वापरावरील उद्दिष्टे साध्य करण्याचा अजेंडा प्रस्तावित करण्यात आला होता. येथेच १० नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आणि १० नोव्हेंबर २००२ पासून हा दिन अधिकृपणे साजरा होऊ लागला.
हा जागतिक विज्ञान दिन सुरु झाल्यामुळे लोकांमध्ये विज्ञानाबाबत जनजागृती वाढली. लोक सामाजिक विकासासाठी विज्ञानाचा वापर करु लागले. तसेच अनेक लोकांची विज्ञानामध्ये रुची वाढत गेली. विशेष करुन विज्ञानाच्या अभ्यासात मुला-मुलींची रुची देखील वाढत गेली. या दिनाचा समाजाच्या हितासाठी आणि विज्ञानाच्या प्रगतीवर प्रचंड प्रभाव वाढला. यामुळे जगभर विज्ञानावर आधारित कार्यक्रम सुरु झाले.
या दिवशी देशभरात अनेक देशांमध्ये शैक्षणिक विज्ञान कार्यक्रम आणि विज्ञानविषय चर्चा सत्रांचे आयोजन केले जाते. विशेष करुन UNESCO ने स्थापन केलेल्या Israeli Palestinian Science Orgnization २००१ मध्ये सुरु झाला होता.
काय आहे यंदाची थीम?
यंदा जागतिक विज्ञान दिनानिमित्त, विश्वास, परिवर्तन यांवर आधारित २०५० साठी आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत जनजागृती निर्माण करणे आहे. याद्वारे लोकांचा विज्ञावरील विश्वास वाढेल, समाजातील समस्यांचे निराकरण होईल आणि भविष्याची दिशा ठरवणे देखील सोपे जाईल. समानता, सुरक्षितता आणि संधी यांचे समीकरण घडविण्याचे एक उत्तम साधन हा दिवस आहे. सध्या देश हवामन बदल, पाणी टंचाई आणि अन्नसुरक्षा यांसारख्या समस्यांना तोंड देत आहे. याला सामोरे जाण्यासाठी जागतिक एकतेचे महत्त्व अधोरेखित आज केले जाईल.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा