World Tsunami Awareness Day : जगातील सर्वात विनाशकारी त्सुनामीच्या घटना, ज्याने लाखो लोकांचा घेतला होता बळी!
दरवर्षी विनाशकारी आपत्ती त्सुनामीच्या जनजागृतीसाठी ५ नोव्हेंबर रोजी त्सुनामी जागरुकता दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा हेतू म्हणजे समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांमध्ये त्सुनामीबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि अशा अपत्तीच्या वेळी स्वत:ला वाचवण्यासाठी कशी तयारी करावी या बद्दल जागरुक करणे आहे. आज आपण या दिनानिमत्ती जगभरातील शास्त्रज्ञांच्या मते, त्सुनामी समुद्राजवळी भागात वर्षातून दोनदा उत्पन्न होते. मोठ्या आणि दूरगामी त्सुनामी या सरासरी दोनदा दशकातून येतात.
गेल्या काही वर्षात या विनाशकारी आपत्तीने जगभरातील अनेक देशांना झटका दिला आहे. आज आपण यातील सर्वात घातक त्सुनामींची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच त्सुनामी का घडते आणि त्याचा अंदाज कसा लागतो या बद्दलही आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ.
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्सुनामी म्हणजे साध्या समुद्राच्या उंट लाट असातता. ज्या अचानक प्रचंड वेगाने निर्माण होतात आणि काही मिनिटांत संपूर्ण किनारी प्रदेश उद्ध्वस्त करु शकतात. या लाटा खुल्या समुद्रात काही सेंटीमीटर उंचीवर असतात, पण किनाऱ्याजवळ आल्यानंतर याचा वेग वाढतो आणि या लाटा अनेक मीटर उंच होता. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, ३० मीटर उंची म्हणजे सुमारे १०० फूट उंचीपर्यंत किंवा त्याहून अधिक उंचीच्या असतात.
समुद्राच्या तळाशी झालेल्या भूकंपामुळे आणि ज्वालामुखीच्या स्फोटामुळे किंवा भूस्खलनामुळे अतिशय विध्वंसक त्सुनामी निर्माण होते. ज्यामुळे प्रचंड विध्वंस घडून येतो.
कसा लावला जातो त्सुनामीचा अंदाज?
अलीकडे बदलत्या तंत्रज्ञामुळे त्सुनामी येण्यापूर्वी काही प्रमाणात त्याचा अंदाज घेँणे शक्य झाले आहे. समुद्रातील सेन्स आणि भूकंपमापक यंत्रामुळे समुद्रातील हालचालींवर नजर ठेवता येते. उपग्रह प्रणालीमुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील बदलांचे निरिक्षण केले जाते. पाण्याच्या पातळीत झालेल्या बदल, किनाऱ्यावरुन मागे सरकणारे पाणी अशा गोष्टींचा तपास केला जातो. यामुळे लोकांना काही तास आधी किंवा काही मिनिटे आधी लोकांना सतर्क करता येते, ज्यामुळे जीवितहीनी कमी होते.
जागतिक ऐतिहासिक त्सुनामी डेटाबेसनुसार, इंडोनेशियात सर्वात विध्वंसक त्सुनामी आली होती. २६ डिसेंबर २००४ मध्ये उत्तर सुमात्रा बेटावर ९.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामुळे १६७ फूट उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या, ज्याचा मोठा दूरगामी परिणाम झाला. या भूकंपाने २,३०,००० लोकांचा बळी घेतला होता. तसेच १३ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते.
तर दुसरी सर्वात मोठी त्सुनामी पोर्तुगाल मध्ये आली होती. १ नोव्हेंबर १७५५ मध्ये लिस्बनच्या ८.५ तीव्रतेचा भूकंप घडला होता. या भूकंपामुळे १०० फूट उंच लाटा निर्माण झाल्या होत्या. याचा पोर्तुगाल, स्पेन आणि मोरोक्कोला झटका बसला, ज्याने ५० हजार लोकांचा बळी घेतला होता.
यानंतर जपानमध्ये सर्वात दोन मोठ्या त्सुनामी आल्या होता. पहिली २० सप्टेंबर १८९८ मध्ये ८.३ तीव्रतेचा भूकंप घडला होता. यामुळे हाशिमोतो बंदर शहर पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. ज्यामध्ये ३१ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर दूसरी त्सुनामी १५ जून १८९६ रोजी सानरिकू येथे घडली होती. ८.३ स्केलचा भूकंपा घडला होता. याने २७ हजार लोकांचा बळी घेतला होता.
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा






