-
तिसऱ्या महायुद्धामुळे असुरक्षितता वाढली असून हुकूमशाहीला खतपाणी मिळाले आहे.
-
सरकारांच्या अपयशामुळे आणि जनरेशन Z च्या जागरूकतेमुळे लोक सरकारांविरुद्ध उभे राहत आहेत.
-
लोकशाही वाचवण्यासाठी सरकारांनी पारदर्शकता, संवाद आणि जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.
Gen Z political satire World War III : मानवजातीच्या इतिहासात युद्धे नेहमीच राजकारण, सत्ताकांक्षा आणि विचारसरणीच्या संघर्षातून उद्भवली आहेत. पहिले आणि दुसरे महायुद्ध मानवी सभ्यतेला घातक ठरले, पण त्यातून लोकशाही, मानवी हक्क आणि शांतीची महत्त्वाची शिकवण मिळाली. तरीसुद्धा, आज जर जग तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत उभे आहे, तर त्याचा एक मोठा परिणाम म्हणजे जगभरात हुकूमशाहीचे वाढते वर्चस्व आणि नागरिकांचा आपल्या सरकारांविरुद्ध वाढता रोष.प्रश्न असा उभा राहतो हे सर्व घडत का आहे? दोष सरकारांचा आहे का? की ‘Gen Z’ सारख्या नव्या पिढीच्या दृष्टिकोनामुळे ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे?