• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Worry About Widowed Women Using White Color Everyday

विधवा झाली तरी ‘ती’चं अस्तित्व संपत नाही; उर्वरित आयुष्यात पांढऱ्याला आपलसं करणाऱ्या स्त्रियांची व्यथा

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रंग असतात. विविध रुपात, स्वरुपात, ढंगात आपण हे रंगाचे आवडणं जगत असतो. कधी आवडत्या रंगाचे कपडे घालून तर कधी निसर्गात जाऊन या रंगाची किमया अनुभवत असतो. पण विधवा झालेल्या स्त्रियांच्या आयुष्यातून तर हा रंगाचा सोहळा हिसकावून घेतला जातो. त्याबाबत व्यथा मांडणारा आजचा रंग.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 07, 2024 | 04:01 PM
white color information and importance in marathi

उर्वरित आयुष्य पांढरा रंगाला आपलसं करणाऱ्या विधवा स्त्रियांची व्यथा मांडणारा लेख (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवरात्रीमध्ये स्त्री शक्ती पुजली जाते. रोजच्या आयुष्यात विविधांगी रुपाने ‘ती’ आपली शक्ती म्हणून राहत असते. तिच्या अस्तित्वामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात बहर येतो…आयुष्य रंगून जाते. कधी ती महाकाली असते…तर कधी योगेश्वरी असते…कधी ती लक्ष्मी असते…तर कधी ती सरस्वती असते. तिची प्रत्येक रुपं तारणहार आणि रक्षणकर्ती असतात. आज सरस्वतीच्या रुप दर्शवणारी ती पांढऱ्या रंगामध्ये दिसून येत आहे. हा पांढरा रंग म्हणजे शुद्धतेचा आणि शांततेते प्रतिक आहे. पांढरा हा निर्मळतेचा आणि पवित्रतेचा द्योतक आहे.

पांढरा रंग हा पाण्यासारखाच नितळ आहे. चंद्रासारखा तेजस्वी आहे तर मोत्यासारखा मौल्यवान सुद्धा आहे. हा रंग सर्व समावेशक असून सर्वांना आपल्यामध्ये सामील करुन घेणारा आहे. प्रत्येक स्त्री देखील अशीच सर्वांची सुखदुःख सामावून घेणारी असते. मात्र तिची दुःख जाणारी फार थोडी संवेदनशील मनं असतात. तिने प्रत्येक नात्याला भरभरुन प्रेम आणि माया दिली तरी तिच्यावर बंधन घालणारे हातच जास्त असतात. प्रत्येक टप्प्यावर तिला रोखणारे आणि मर्यादा घालण्याचा प्रयत्न करणारे जास्त लोक असतात. यामधील एक भयानक आणि तिच्या अस्तित्वाला ठेच पोहचवणारी प्रथा म्हणजे विधवा म्हणून तिला हिणवणे.

विधवा स्त्रीचे अस्तित्व समाजाकडून आजही नाकारले जाते. तिचे नवऱ्याव्यतिरिक्त आणि नवऱ्याशिवाय आयुष्य आहे, हे अजून समाज मानायला तयार होत नाही. जुन्या प्रथा परंपराचा पगडा असलेल्या ठिकाणी तर हे प्रकार अधिक तीव्रतेने जाणवतात. शहरी भागांमध्ये याचे प्रमाण कमी असले तरी खेड्यागावांमध्ये आजही विधवा स्त्रीवर अनेक बंधने घातली जातात. तिला पांढरी साडी घालण्यास सांगितले जाते. तिचा क्षृंगार करण्याचा अधिकार काढून घेतला जातो. एवढचं काय तर तिला हळदी कुंकू लावण्याचा देखील हक्क दिला जात नाही.

बंधनांच्या विळख्यात अडकलेली विधवा स्त्री ही अबला होऊन जाते. हळदी कुंकूचा हक्क हा लग्न आधी कुमारिकेला देखील असतोच. मात्र नवरा गेल्यानंतर तो पूर्णपणे काढून घेतला जातो. हिरवा चुडा नाही की रंगीत साड्या नाहीत. तिच्या आय़ुष्यातील एक प्रकारे रंगचा उडालेला असतो. किंबहूना तो रंग काढून घेतलेला असतो. शुभकार्यातून आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून तिला वगळले जाते. एका प्रकारे तिचे सामाजिक अस्तित्व नाहीसे करण्याचा प्रयत्न केला जातो.

विधवा होणे हे कोणी मागून घेत नाही, पण ते आलंच म्हणजे ‘ती’ संपली असं होत नाही. समाजाच्या बंधनांमुळे ती अगदी कोमेजून जाते. कधीकाळी शुद्धतेचा आणि निर्मळतेचे प्रतिक असलेला हा पांढरा रंग विधवेच्या आयुष्याची मात्र राख करतो. तिला तो अक्षरशः नकोसो होतो. मग ना तिला मोती हवा असतो ना चंद्र…तिला हवा असतो तो फक्त मोकळा श्वास…समाजाच्या बंधनाशिवाय…

– प्रिती माने

Web Title: Worry about widowed women using white color everyday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 04:01 PM

Topics:  

  • Navratri
  • white color

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

Mar 03, 2026 | 05:47 PM
Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

Mar 03, 2026 | 05:44 PM
‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं

Mar 03, 2026 | 05:35 PM
Iran Israel War: इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार? इस्त्रायलने दिले ‘हे’ भयंकर आदेश

Iran Israel War: इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार? इस्त्रायलने दिले ‘हे’ भयंकर आदेश

Mar 03, 2026 | 05:26 PM
Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत

Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत

Mar 03, 2026 | 05:25 PM
Video: दुबईत मिसाईल अटॅकच्या भीतीमध्येही भारतीयांचा हटके अंदाज; भोजपुरी स्टाईलमध्ये तरुणांनी केली कमेंट्री

Video: दुबईत मिसाईल अटॅकच्या भीतीमध्येही भारतीयांचा हटके अंदाज; भोजपुरी स्टाईलमध्ये तरुणांनी केली कमेंट्री

Mar 03, 2026 | 05:08 PM
SA vs NZ Head to Head: सेमीफायनलची रणधुमाळी! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड–दक्षिण आफ्रिका भिडणार; आकडेवारीत कोणाचे पारडे जड?

SA vs NZ Head to Head: सेमीफायनलची रणधुमाळी! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड–दक्षिण आफ्रिका भिडणार; आकडेवारीत कोणाचे पारडे जड?

Mar 03, 2026 | 05:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.