Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गणपती बाप्पा आता जाणार आणि नवरात्रीमध्ये देवीचे आगमन होणार आहे. नऊ दिवस देवीची पूजा, उपवास, गरबा आणि रोज नवीन रंगाचे कपडे याची मजा काही वेगळीच असते.यंदा म्हणजे 2026 मध्ये शारदीय नवरात्री कधी आहे याची सगळेच वाट बघत आहेत. चला तर मग यंदाच्या नवरात्रीच्या तारखा आणि रोज कोणता रंग घालायचा याची पूर्ण माहिती बघूया.
यंदाच्या वर्षी शारदीय नवरात्री रविवार, 11 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होत आहे. आणि सोमवार, 19 ऑक्टोबरला संपणार आहे. 20 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणतात. हा नऊ दिवसांचा उत्सव दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांसाठी असतो. प्रत्येक दिवशी देवीच्या एका रूपाची पूजा केली जाते. या नऊ दिवसात लोक उपवास करतात, घट बसवतात आणि देवीची मनापासून पूजा करतात. Navratri 2026:
या नऊ दिवसात देवीची पूजा केली तर शक्ती, ज्ञान आणि पैसा मिळतो अशी श्रद्धा आहे.नऊ दिवसांचे नऊ रंग आणि त्याचं महत्वनवरात्रीत सगळ्यात जास्त आकर्षण असतं ते नऊ रंगांचं. प्रत्येक दिवशी एक ठराविक रंग असतो आणि त्या रंगाचे कपडे घातले की देवीचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं. हा फक्त फॅशनचा भाग नाही तर याला आध्यात्मिक महत्व पण आहे. प्रत्येक रंग हा देवीच्या एका गुणाचं प्रतीक आहे.
श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी
पहिला दिवस – 11 ऑक्टोबर, रविवार – नारंगी रंग
पहिल्या दिवशी घटस्थापना असते. नारंगी रंग हा उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचा रंग आहे. हा रंग घातला की मनात एक वेगळाच जोश येतो.
दुसरा दिवस – 12 ऑक्टोबर, सोमवार – पांढरा रंग
पांढरा रंग म्हणजे शांतता आणि पवित्रता. दुसऱ्या दिवशी पांढरे कपडे घातले की मन एकदम शांत आणि प्रसन्न वाटतं.
तिसरा दिवस – 13 ऑक्टोबर, मंगळवार – लाल रंग
लाल रंग हा शक्तीचा आणि प्रेमाचा रंग आहे. देवीचा सगळ्यात आवडता रंग लालच आहे. या दिवशी लाल रंग घातला की एकदम भारी लूक येतो.
चौथा दिवस – 14 ऑक्टोबर, बुधवार – रॉयल ब्लू
हा रंग श्रीमंती आणि आत्मविश्वास दाखवतो. रॉयल ब्लू रंगात तुम्ही एकदम उठून दिसाल.
पाचवा दिवस – 15 ऑक्टोबर, गुरुवार – पिवळा रंग
पिवळा रंग हा आनंद आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. या दिवशी पिवळे कपडे घालून तुम्ही दिवस एकदम फ्रेश करू शकता.
सहावा दिवस – 16 ऑक्टोबर, शुक्रवार – हिरवा रंग
हिरवा रंग म्हणजे निसर्ग आणि नवीन सुरुवात. हा रंग बघितला की मन प्रसन्न होतं.
सातवा दिवस – 17 ऑक्टोबर, शनिवार – राखाडी रंग
राखाडी रंग हा थोडा वेगळा वाटेल पण तो समतोल आणि शांततेचा रंग आहे.
आठवा दिवस – 18 ऑक्टोबर, रविवार – जांभळा रंग
आठव्या दिवशी म्हणजे दुर्गा अष्टमीला जांभळा रंग असतो. हा रंग समृद्धी आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो.
नववा दिवस – 19 ऑक्टोबर, सोमवार – मोरपंखी हिरवा
शेवटच्या दिवशी मोरपंखी हिरवा रंग आहे. हा रंग खूपच सुंदर दिसतो आणि याने नवरात्रीची सांगता एकदम खास होते.तर मंडळी, ही आहे यंदाच्या नवरात्रीच्या नऊ रंगाची लिस्ट. ही लिस्ट आत्ताच सेव्ह करून ठेवा आणि आपल्या नवरात्रीच्या कपड्यांची तयारी आतापासूनच सुरू करा.
Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व






