फोटो सौजन्य - X
हर्ष दुबे : भारताचा अ संघ 30 मे पासून होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसी आणि भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भिमन्यू ईश्वरण याच्याकडे भारतीय असंघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले आहे. तर या संघाचा उपकर्णधार ध्रुव जुरेल असणार आहे. त्याचबरोबर या संघामध्ये करुण नायरला देखील संघामध्ये स्थान मिळाले आहे. असे म्हटले जाते की कोणत्याही मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी खूप कठीण मेहनत घ्यावी लागते. त्यानंतरच यशाचे फळ मिळते आणि ते फळ देखील गोड असते.
कठीण परिश्रमानंतर यश कधी दार ठोठावेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात जन्म झालेला २२ वर्षीय स्टार गोलंदाज हर्ष दुबे देखील अशाच आशेने देशांतर्गत स्पर्धांमध्ये सतत कठोर परिश्रम करत होता. तथापि, १६ मे रोजी, जेव्हा या तरुण खेळाडूची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघात निवड झाली तेव्हा त्याला त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले. हर्षची पहिल्यांदाच भारतीय अ संघात निवड झाली आहे.आता त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, हर्षच्या चमकदार कामगिरीवर एक नजर टाकूया.
भारत अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात एक नवीन नाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे हर्ष दुबे. या २२ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाजाने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे जन्मलेल्या हर्ष दुबेने डिसेंबर २०२२ मध्ये रणजी ट्रॉफीसह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. फक्त तीन हंगामात त्याने आपल्या गोलंदाजीने अशी जादू निर्माण केली की निवडकर्त्यांनाही त्याच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष करता आले नाही.
In Vidarbha’s victorious Ranji Trophy 2024-25 campaign, 22-year-old Harsh Dubey took 69 wickets, setting a new record for most scalps in a single season.
Today, he features in India-A’s squad for its tour of England.
REPLUG: @Anishpathiyil‘s feature on the left-arm spinner ➡️… pic.twitter.com/7wYNuVulTg
— Sportstar (@sportstarweb) May 16, 2025
२०२४-२५ चा रणजी ट्रॉफी हंगाम हर्षसाठी खूप खास होता. त्याने या हंगामात ६९ बळी घेत एक नवा विक्रम रचला आणि विदर्भाला रणजी जेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी, त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवडण्यात आले. हर्षने आतापर्यंत १८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण ९७ विकेट्स घेतल्या आहेत. तो अलिकडेच सनरायझर्स हैदराबाद संघात दाखल झाला आहे, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. हर्ष दुबेची कठोर परिश्रम आणि प्रतिभा त्याला भारतीय क्रिकेटचा पुढचा स्टार बनवू शकते. आता सर्वांच्या नजरा इंग्लंड दौऱ्यातील त्याच्या कामगिरीवर आहेत.
अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार) , नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (विकेटकिपर), मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलिल अहमद, रूतुराज गायकवाज, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे
शुभमन गिल आणि साई सुदर्शन (दोघेही दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध होतील).