Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Games : टेनिसमध्ये महाराष्ट्राला दोन रौप्यपदके! एकेरीत वैष्णवी आडकर, तर दुहेरी पूजा-आकांक्षा जोडीचे रुपेरी यश

38th National Games : टेनिसमध्ये महाराष्ट्राला दोन रौप्यपदके मिळाली आहेत. एकेरीत वैष्णवी आडकर, तर दुहेरीत पूजा-आकांक्षा जोडीने रूपेरी यश मिळवले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 11, 2025 | 08:17 PM
38th National Games : टेनिसमध्ये महाराष्ट्राला दोन रौप्यपदके! एकेरीत वैष्णवी आडकर, तर दुहेरी पूजा-आकांक्षा जोडीचे रुपेरी यश

38th National Games : टेनिसमध्ये महाराष्ट्राला दोन रौप्यपदके! एकेरीत वैष्णवी आडकर, तर दुहेरी पूजा-आकांक्षा जोडीचे रुपेरी यश

Follow Us
Close
Follow Us:

देहरादून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी टेनिसमधील महिलांच्या वैयक्तिक विभागात दोन रौप्यपदकांची कमाई केली. पुण्याची खेळाडू वैष्णवी आडकर हिला एकेरीमध्ये अंतिम सामन्यात गुजरातच्या वैदेही चौधरी हिच्याकडून पराभूत व्हावे लागले, तर दुहेरीमध्ये पूजा इंगळे व आकांक्षा निठुरे यांना वैदेही व तिची सहकारी झील देसाई यांच्याकडून हार स्वीकारावी लागली.

बेसलाईनवरून व्हॉलीजचा कल्पकतेने उपयोग

एकेरीतील सरळ लढतीत वैदेही हिने वैष्णवीचे आव्हान ६-४, ६-४ असे सहज परतवले. या दोन्ही सेट्समध्ये वैदेही हिने फोरहॅंड परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच, तिने बेसलाईनवरून व्हॉलीजचा कल्पकतेने उपयोग केला. वैष्णवी हिने दोन्ही सेट्समध्ये सर्व्हिस राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, तिच्याकडून झालेल्या नकळत चुकांचा वैदेही हिला फायदा झाला.

सामना संपल्यानंतर वैष्णवी म्हणाली, वैदेही विरुद्ध आज माझा अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा खेळ होऊ शकला नाही. तसेच मला महत्त्वाच्या क्षणी सर्व्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. अर्थात हे रौप्यपदकही माझ्यासाठी प्रेरणादायक आहे. अजून भरपूर मला संधी उपलब्ध आहेत. त्या दृष्टीनेच येथील कामगिरी माझ्यासाठी शिकवण्याची शिदोरीच आहे.‌
दुहेरीत पूजा-आकांक्षा पराभूत
महाराष्ट्राच्या पूजा इंगळे व आकांक्षा निठुरे यांना अंतिम सामन्यात वैदेही चौधरी व झील देसाई या अवल दर्जाच्या खेळाडूंविरूध्द पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. वैदेही व झील यांनी हा सामना ६-३, ६-२ असा जिंकला. दोन्ही सेटमध्ये गुजरातच्या या जोडीने क्रॉसकोर्ट फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्यांनी सर्व्हिस व प्लेसिंग यावर चांगले नियंत्रण ठेवले होते. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या जोडीला दोन्ही सेट्स मध्ये स्वतःच्या सर्व्हिस व परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचाही फायदा गुजरातच्या जोडीला झाला.

अंतिम फेरीत पराभव

हा सामना झाल्यावर आकांक्षा व पूजा यांनी सांगितले की, अंतिम फेरीत आम्हाला जरी पराभव पत्करावा लागला तरी देखील या कामगिरी बाबत आम्ही समाधानी आहोत.‌ येथील रुपेरी कामगिरी आम्हाला भावी करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहे. अजून भरपूर स्पर्धांमध्ये आम्हाला भाग घ्यावयाचा आहे. येथील अनुभव त्या दृष्टीनेच महत्त्वाचा आहे.

Web Title: 38th national games 2025 maharashtra wins two silver medals in tennis vaishnavi adkar wins singles pooja akanksha pair wins doubles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 08:17 PM

Topics:  

  • 38th National Games 2025
  • gold medal
  • maharashtra
  • National Games
  • Silver Medal

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.