फोटो सौजन्य - सोशल मीडिया
युवराज सिंहचा बायोपिक : भारताचा स्टार माजी क्रिकेटर युवराज सिंह त्याच्या सहा सिक्सरमुळे प्रसिद्ध आहे. तो जेव्हा मैदानामध्ये फलंदाजीसाठी यायचा तेव्हा समोरच्या गोलंदाजाला घाम फुटायचा. त्याच्या आक्रमक शैलीसाठी त्याचबरोबर त्याच्या अग्रेसिव्ह अंदाजात तो मैदानामध्ये वावरत असे. बऱ्याचदा त्याला मुलाखतीमध्ये प्रश्न केला होता की जर तुमचा बायोपिक करण्यात आला तर तुम्हीला कोणत्या बॉलीवूड अभिनेत्याने केलेला आवडेल. अशा वेळी बऱ्याचदा युवराज सिंहने त्याच्या बायोपिक अनेक कलाकारांची निवड केली होती. आता लवकरच चॅम्पियन क्रिकेटर युवराज सिंहचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, कारण दिग्दर्शक आणि निर्माते त्यांच्या बायोपिकच्या तयारीला लागले आहेत.
सोशल मीडियावर नुकतेच फोटो सोशल मीडियावर Tseries ने शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी युवराज सिंह, भूषण कुमार आणि रवी भागचंदका यांच्यासोबतच फोटो शेअर केला आहे. यामध्ये कॅप्शन लिहिले आहे की, खेळपट्टीपासून ते लाखो लोकांच्या हृदयापर्यंतचा दिग्गजांचा प्रवास पुन्हा जिवंत करा—युवराज सिंगची धैर्य आणि गौरवाची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर येत आहे! असे देण्यात आले आहे.
युवराज भूषण कुमार आणि रवी भागचंदका या तिघांचा फोटो आणि अनाऊन्समेन्ट ऐकून क्रिकेट चाहते बरेच उत्साही झाले आहेत. कारण युवराज सिंह हा एक भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी असो किंवा खेळ प्रेमींसाठी एक प्रेरणा आहे. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये अजुनपर्यत कोणते कलाकार असणार आहेत यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
लवकर युवराज सिंहच्या आयुष्यवर चित्रपट येणार आहे. यावर युवराज सिंह म्हणाला की, “माझी कथा जगभरातील माझ्या लाखो चाहत्यांना दाखवली जाईल याचा मला मनापासून आदर वाटतो. क्रिकेट हे माझे सर्वात मोठे प्रेम आणि सर्व उच्च आणि नीचतेतून शक्तीचा स्रोत आहे. मला आशा आहे की हा चित्रपट इतरांना त्यांच्या स्वतःच्या आव्हानांवर मात करण्यास आणि त्यांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित करेल”.
युवराज सिंहने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाने फोटोखाली कॉमेंट्स करून सोशल मीडियावर अभिनंदन केले आहे. सुरेश रैनाने कॉमेंट मध्ये लिहिले आहे की, “वाट पाहू शकत नाही युवी पाजी❤️🙌 खूप खूप अभिनंदन ❤️”