
चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका! (Photo Credit - X)
अक्षर पटेल बाहेर
स्पिन ऑलराऊंडर अक्षर पटेल आजारपणामुळे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांतून बाहेर पडला आहे. तब्येत खराब असल्यामुळे तो रविवारी धर्मशाला येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यातही खेळू शकला नव्हता. त्यामुळे, ३१ वर्षीय स्पिन ऑलराऊंडर शाहबाज अहमदचे नशीब फळफळले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अक्षरच्या जागी शाहबाज अहमदला संघात सामील केले आहे.
🚨 NEWS 🚨#TeamIndia allrounder, Axar Patel has been ruled out of the remaining two @IDFCFIRSTBank T20Is against South Africa due to illness. 🔽 Details | #INDvSA | @akshar2026 https://t.co/CZja7iaLNm — BCCI (@BCCI) December 15, 2025
BCCI ने दिले स्पष्टीकरण
बीसीसीआयने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे, “टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेल हा आजारामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन टी-२० सामन्यांतून बाहेर झाला आहे. मात्र, तो लखनऊमध्ये टीमसोबत आहे, जिथे त्याचे पुढील वैद्यकीय मूल्यांकन केले जाईल.”
शाहबाजचे दोन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन
पुरुषांच्या निवड समितीने लखनऊ आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी शाहबाज अहमदला त्याच्या जागी संघात घेतले आहे. शाहबाजचे जवळपास दोन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याने भारतासाठी शेवटचा सामना ऑक्टोबर २०२३ मध्ये खेळला होता. शाहबाजने आतापर्यंत ३ एकदिवसीय आणि २ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
वाचा भारतीय संघाचा अपडेटेड स्क्वॉड
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद