फोटो सौजन्य - IndianPremierLeague
पर्पल कॅप – ऑरेंज कॅप : इंडीयन प्रिमियर लिग 2025 चा आज 55 वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांंधी मैदानावर खेळवला जाणार आहे. आजचा सामना अक्षर पटेलच्या दिल्ली कॅपिटल्स विरुध्द सनराइझर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. सध्या सर्व संघ प्लेऑफच्या शर्यतीसाठी लढत आहेत. पहिल्या चार स्थानावर असलेल्या या संघाना सेमीफायनलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांचे तत्वज्ञान खूप सोपे आहे. खूप दूरचा विचार न करता आणि वर्तमानातील जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे.
अर्शदीपने लखनौच्या पहिल्या तीन फलंदाजांना बाद करून पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. त्याने आयपीएलच्या चालू सिझनमध्ये आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत आणि प्रसिद्ध कृष्णा याने १९ विकेट्स तर जोश हेझलवूड १८ विकेट्स घेतले आहेत. आता अर्शदीप सिंह हा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सामन्यानंतर अर्शदीप म्हणाला, ‘मी फार पुढचा विचार करत नाही आणि सध्या मी फक्त वर्तमानात जगण्याचा आनंद घेत आहे. आम्ही एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. तो म्हणाला, ‘सुरुवातीला चेंडूवर थोडी हालचाल झाली आणि मला तो खूप आवडला.’ पॉवरप्लेमध्ये मिशेल मार्श, एडन मार्कराम आणि निकोलस पूरन सारख्या आक्रमक फलंदाजांच्या विकेट घेण्यास तो यशस्वी झाला याचा अर्शदीपला आनंद आहे.
Prabhsimran Singh चे वडील लढत आहेत जीवन आणि मृत्यूची लढाई! पॅशनपाहून जगाने केला सलाम
ऑरेंज कॅपची लढत फारच मनोरंजक होत चालली आहे, यामध्ये पहिल्या स्थानावर आरसीबीचा स्टार फलंदार विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. विराट कोहलीने आतापर्यत 11 सामने खेळले आहेत यामध्ये त्याने 505 धावा केल्या आहेत. एवढेच नव्हे तर यामध्ये 7 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. दुसऱ्या स्थानावर गुजरातचा साई सुदर्शन आहे, त्याने 10 सामन्यात 504 धावा केल्या आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडीयन्सचा सुर्यकुमार यादव आहे, त्याने आतापर्यत 11 सामने खेळले आहेत. 11 सामन्यात त्याने 475 धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानावर राजस्थान रॅायल्सचा यशस्वी जयस्वाल आहे. त्याने 12 सामन्यात 473 धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानावर जोस बटलर आहे, त्याने 10 सामन्यात 470 धावा केल्या आहेत.
No changes in the Orange Cap race, as Virat Kohli continues to lead the chart🧡💪
watch Live Ipl on CRICX11#ViratKohli #RCB #IPL2025 #CRICX11 #CRICX11GAMES pic.twitter.com/b8InetkjMS
— Cricx11 Official (@cricx11official) May 5, 2025