फोटो सौजन्य - IndianPremierLeague
प्रभसिमरन सिंग : लखनऊ सुपर जायंट्सविरूध्द काल पंजाब किंग्सचा सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने कालच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा 37 धावांनी पराभव केला. लखनौविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा युवा फलंदाज प्रभसिमरन सिंगने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रभसिमरनने फक्त 48 चेंडूमध्ये 7 षटकार आणि 6 चौकारांसह 91 धावा केल्या आणि पंजाब किंग्सने लखनौविरुद्ध २३७ धावांचे मोठे लक्ष्य उभे करण्यात यशस्वी ठरले. प्रत्युत्तरात, लखनौ संघ फक्त १९९ धावा करू शकला आणि त्यांना ३७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
सामन्यातील कामगिरीपेक्षा प्रभसिमरन सिंगच्या जिद्दीचे जास्त कौतुक केले जात आहे. सामन्यानंतर, प्रभसिमरनच्या काकांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की त्याचे वडील आजाराने ग्रस्त आहेत. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागत आहे.
पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यत ११ सामने खेळले आहेत आणि यामध्ये त्याने १७० च्या स्ट्राईक रेटने ४३७ धावा केल्या आहेत. लखनौविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने ९१ धावांची तुफानी खेळी केली. जग त्याच्या खेळीपेक्षा त्याच्या वृत्तीला जास्त सलाम करत आहे. लखनौविरुद्ध पंजाबच्या विजयानंतर, टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, त्याचे काका सतविंदर सिंग म्हणाले की त्यांचा भाऊ आजारी आहे.
Uncle of Prabhsimran Singh said: [Pratyush Raj from TOI]
“The only time my younger brother smiles these days is when he sees Prabhsimran bat in IPL – He is going through dialysis thrice in a week – as an elder brother I can’t see the pain he is enduring – I have to step out of… pic.twitter.com/PHC6sgItoW
— Johns. (@CricCrazyJohns) May 5, 2025
प्रभसिमरनच्या वडिलांचे आठवड्यातून ३ वेळा डायलिसिस होते. अशा परिस्थितीत, स्पर्धा सोडून घरी जाण्याऐवजी, प्रभसिमरन संघासाठी विजयाचा पाया रचून सर्वांचे मन जिंकत आहे. सामन्यानंतर, प्रभसिमरनच्या काकांनी सांगितले की जेव्हा ते टीव्हीवर प्रभसिमरनला फलंदाजी करताना पाहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येते. २३ वर्षीय प्रभसिमरनला प्रशिक्षण देणारे सतविंदर सिंग म्हणाले की, त्याचा मोठा भाऊ म्हणून मी त्याला या कठीण काळात वेदनांमध्ये पाहू शकत नाही. त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागते. मला ते दिसत नाही आणि जेव्हा डॉक्टर डायलिसिससाठी येतात तेव्हा मी घराबाहेर पडतो. माझ्या भावासाठी मी दररोज देवाकडे प्रार्थना करत नाही आहे.
प्रभसिमरन सिंग यांचे काका सतविंदरपाल सिंग यांना त्यांचा धाकटा भाऊ किती काळ जगेल हे माहित नव्हते, पण त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा एक मार्ग शोधला. त्याने सांगितले, “प्रत्येक पंजाब किंग्ज सामन्यापूर्वी, मी त्याला बैठकीच्या खोलीत घेऊन जातो. आम्ही एकत्र सामना पाहतो आणि प्रत्येक वेळी कॅमेरा सिम्मू (प्रभसिमरन) वर असतो तेव्हा तो हसतो. जर सिम्मूने धावा काढल्या तर तो हसत राहतो. त्या क्षणी तो त्याचे दुःख विसरतो. जर सिम्मूने घाईघाईने एक अविचारी शॉट खेळला तर तो ओरडतो आणि छोटे आराम नल खेल (हुशारीने खेळा) म्हणतो.”