PCB Controversial Statements : A Shocking Statement has Come from PCB Regarding Rachin Ravindra Who Got Injured in First Match at Pakistan
PCB Controversial Statements : ICC चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान त्रिकोणी मालिका आयोजित केली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने पाकिस्तानला हरवून दमदार सुरुवात केली, पण या सामन्याच्या निकालापेक्षा ज्या गोष्टीची जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे रचिन रवींद्रची दुखापत.
फ्लडलाईट्सच्या चुकीच्या पद्धतीमुळे झाले नुकसान
या सामन्यात रचिन रवींद्रच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यानंतर पाकिस्तानच्या स्टेडियममधील फ्लडलाइट्सबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरं तर, पाकिस्तानच्या डावाच्या ३७ व्या षटकात, रचिन रवींद्र झेल घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा झेल चुकला. जेव्हा रचिन चेंडू पकडण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा फ्लडलाइट्समुळे त्याला चेंडू नीट दिसत नव्हता असे वाटत होते. अशा परिस्थितीत चेंडू थेट त्याच्या विकेटवर लागला.
पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिकेचे आयोजन
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिकेचे आयोजन केले गेले. ज्यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ सहभागी झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तिन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला गेला. न्यूझीलंड संघाने हा सामना जिंकला असला तरी रचिन रवींद्रच्या गंभीर दुखापतीमुळे संघ मोठा चिंतेत होता. आता रचिनच्या दुखापतीबाबत न्यूझीलंड क्रिकेट संघाने अपडेट दिले आहेत.
एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी
अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र शनिवारी पाकिस्तान विरुद्धच्या तिरंगी मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला होता. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना चेंडू जाऊन रचिनच्या कपाळावर जाऊन आदळला आणि रक्ताच्या धारा वाहू लागल्या. यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले.
३८ व्या षटकात मायकेल ब्रेसवेलची गोलंदाजी
सामन्यातील ३८ व्या षटकात मायकेल ब्रेसवेल गोलंदाजी करत होता. क्षेत्ररक्षण करताना चेंडू टिपण्याचा प्रयत्न करीत होता. फ्लडलाइट्समुळे चेंडू त्याच्या नजरेतून सुटला आणि तो थेट त्याच्या चेहऱ्यावर आदळला. यानंतर रचिनच्या कपाळातून रक्त वाहू लागले आणि त्याला तात्काळ मैदानाबाहेर काढण्यात आले.
३८व्या षटकात झेल घेताना चेंडू कपाळावर
न्यूझीलंड क्रिकेटच्या निवेदनात म्हटले आहे की, ३८व्या षटकात झेल घेताना चेंडू कपाळावर लागल्याने रवींद्रला मैदान सोडावे लागले. त्याच्या कपाळाला मोठी जखम झाली असून, त्याच्यावर मैदानावर उपचार करण्यात आले आणि तिथेच त्याला टाकेही घालण्यात आले. आता तो ठिक आहे आणि HIA प्रोटोकॉलअंतर्गत त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवले जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या सामन्यात रचिन खेळू शकणार नाही.