Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK, T20 World Cup : PCB अध्यक्ष नक्वी यांचे स्थान धोक्यात? भारताकडून लाजिरवाण्या पराभवानंतर असीम मुनीरचा राग अनावर 

15 फेब्रुवारी रोजी T20 विश्वचषक 2026 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटमध्ये अशांतता वाढल्याचे समोर येत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 16, 2026 | 07:20 PM
IND vs PAK, T20 World Cup: PCB President Naqvi's position in danger? Asim Munir's anger is uncontrollable after embarrassing defeat by India

IND vs PAK, T20 World Cup: PCB President Naqvi's position in danger? Asim Munir's anger is uncontrollable after embarrassing defeat by India

Follow Us
Close
Follow Us:

IND vs PAK, T20 World Cup 2026 : रविवारी, 15 फेब्रुवारी रोजी T20 विश्वचषक 2026 सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने  आले होते,  या सामन्यात भारताने  पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने सुपर 8 मध्ये स्थान निश्चित केले.  तर पाकिस्तानचे स्थान मात्र धोक्यात आले आहे. या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटमध्ये अशांतता वाढल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानच्या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचे स्थान धोक्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर या संपूर्ण प्रकरणावर नाराज असल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा : IND vs PAK, T20 World Cup : ‘गलत जगह U-turn…’, दिल्ली पोलिसांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली! पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

असीम मुनीर यांना राग अनावर?

एका वृत्तांनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील सुरू असलेल्या वादादरम्यान, मोहसिन नक्वी यांनी विधान केले होते की, ते पाकिस्तान सरकार किंवा कोणत्याही व्यक्तीला घाबरत नाहीत. या विधानात असीम मुनीर यांचे देखील नाव समोर आल्याने लष्करप्रमुखांना राग अनावर झाला आहे.

क्रिकेट आणि प्रशासनाशी संबंधित बाबी त्या व्याप्तीपुरत्या मर्यादित ठेवण्यात याव्यात आणि लष्करप्रमुखांचे नाव चर्चेत समाविष्ट करण्यात येऊ नये, असे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे मत असल्याचे पुढे येत आहे. म्हणूनच मुनीर आणि  मोहसिन नक्वी या दोघांमधील तणावाचे वृत्त समोर येत आहे.

शोएब अख्तरचा तीव्र संताप

भारताविरुद्धच्या पराभवानंतर माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने देखील तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की क्रिकेटची काहीच समज नसलेली व्यक्ती आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष बनली आहे. जर नेतृत्वच मजबूत नसेल तर संघाची प्रगती तरी कशी होणार? असा प्रश्न देखील गोलंदाज शोएब अख्तर याने उपस्थित केला आहे.

हेही वाचा : AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

शोएब अख्तर पुढे असाही म्हणाला की, अक्षम आणि अननुभवी व्यक्तीला उच्च पदावर नियुक्त करणे देशाच्या खेळासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. त्याचे विधान सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय होत आहे आणि पाकिस्तान क्रिकेटमधील  वादविवादाला आणखीच खतपाणी घालत आहे. भारताविरुद्धच्या या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये केवळ संघाच्या कामगिरीवरच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि प्रशासकीय निर्णयांवर देखील गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

Web Title: Ind vs pak t20 world cup asim munir angry with pcb chairman naqvi after indias defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • Mohsin Naqvi
  • PCB
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
1

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.