इंग्लंडच्या बर्लिंगहम येथील राष्ट्रकुल स्पर्धेचा (Commonwealth Games 2022) ९ वा दिवस भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा नमुना ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी एका मागोमाग एक अशी १४ पदक पटकावून शनिवारी अक्षरशः पदकांचा पाऊस पाडला. भारताने ९ व्या दिवसा पर्यंत एकूण ४० पदक जिंकली असून यात १३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १६कांस्य पदकांचा समावेश आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारतीय कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी करत ६ सुवर्णांसह १२ पदके जिंकली. तर बजरंग पुनिया, दीपक पुनिया, विनेश फोगट, रवी कुमार दहिया, नवीन आणि साक्षी मलिक यांनी सुवर्णपदक पटकावली आहेत. भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर १३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १६ कांस्य अशी एकूण ४० पदके भारताच्या खात्यात आहेत. यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदक क्रमवारीत भारत (India) सध्या ५ व्या स्थावर आहे तर ऑस्ट्रेलिया १५५ पदक पटकावून प्रथम स्थानावर राज्य करीत आहे.
रविवारी राष्ट्रकुल स्पर्धेच्या १० व्या दिवशी बॉक्सिंगमध्ये ४ सुवर्णपदके पणाला लागली असून याशिवाय अॅथलेटिक्स, टेबल टेनिस, महिला क्रिकेट, महिला हॉकी आणि बॅडमिंटनमध्येही भारताला पदक मिळू शकतात. तर क्रिकेटच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने येणार आहेत.
भारताची पदकसंख्या : ४०
१३ सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी कुमार दहिया, विनेश फोगाट, नवीन
११ रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरूष लॉन बॉल्स संघ
१६ कांस्य : गुरूराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरभ घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्विन शंकर, दिव्या काकरान, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा सिहग, दीपक नेहरा