IPL 2026: Big news for RCB fans! Explosive batsman AB De Villiers will return to the team, Mr. 360 Degree gave a hint
AB de Villiers will return to RCB : आगामी आयपीएल २०२६ चा १९ हंगाम आरसीबी संघासाठी धमाकेदार असण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे एबी डिव्हिलियर्स या खेळाडूचे अंगमनचे संकेत आहेत. एबी डिव्हिलियर्सचे दक्षिण आफ्रिकेसह भारतातदेखील मोठे चाहते आहेत. यामागील कारण म्हणजे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळण्याची शैली आहे. जेव्हा जेव्हा आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघाची चर्चा होत असते. तेव्हा आपसूकच एबी डिव्हिलियर्सचे नाव समोर येत असते. त्याने आयपीएलमध्ये आरसीबीला कित्येकदा आपल्या वादळी फलंदाजीने विजय मिळवून दिला आहे. आता अशातच त्याने आरसीबीमध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.
एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये अनेक वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे. परंतु, तो संघात होता तोपर्यंत त्याच्या काळात संघाला आयपीएलचे विजेतपद मात्र जिंकता आले नाही. याची चाहत्यांना खंत आहे. एबीने २०२१ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जरी घेतली असेल तरी देखील त्याची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या सगळ्यानंतर, पुन्हा एकदा तो आयपीएलमध्ये खेळत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स, जो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत गोलंदाजांचा चांगला समाचार घेण्यासाठी ओळखला जात होता. एबी डिव्हिलियर्स आता पुन्हा एकदा आयपीएलमुळे चर्चेत आला आहे. एबी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स संघाचा एक प्रमुख भाग राहीला आहे. आरसीबीने आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. आरसीबीने विजेतपद जिंकले तेव्हा एबी डिव्हिलियर्स देखील तेव्हा स्टेडियममध्ये प्रेक्षक म्हणून हजर होता. त्यानंतर, तो संघासोबत मिळून जोरदार सेलिब्रेशन करताना देखील दिसून आला होता.
आता एबी डिव्हिलियर्सने आरसीबी संघात परतण्याचे संकेत दिले आहेत. तो म्हणाला की जर आरसीबीला हवे असेल तर तो संघासाठी प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकाची भूमिका बाजवण्यास तयार आहे. तो म्हणाला की तो नेहमीच मनापासून आरसीबीशी जोडला जाणार आहे. जर फ्रँचायझीला वाटत असेल की संघात त्याच्यासाठी भूमिका आहे, तर तो योग्य वेळ आल्यावर निश्चितच संघाशी जुळायला आवडेल.
हेही वाचा : Photo : T20 क्रिकेटमध्ये 500+ विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज कोणते? नवीन सदस्य झाला क्लबमध्ये सामील
दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने भारतात आयपीएलमध्ये खूप मोठे नाव कमावले आहे. एबी डिव्हिलियर्सने २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून २०२१ पर्यंत त्याने एकूण १८४ आयपीएल सामने खेळलेले आहेत. यामध्ये त्याने ३ शतके आणि ४० अर्धशतके लागावळी आहेत. त्याने एकूण ५,१६२ धावा फटकावल्या आहेत. त्याच वेळी, एबी डिव्हिलियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून १५६ सामने खेळले असून या दरम्यान सरासरी ३९.७१ आहे तर स्ट्राईक रेट १५१.६९ आहे.