Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमन्यू ईश्वरनच्या वडिलांनी त्यांच्या मुलाशी केलेल्या भावनिक संभाषणाचा केला खुलासा!

मालिकेदरम्यान टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये अनेक बदल केले, परंतु अभिमन्यू ईश्वरनला खेळण्याची संधी दिली नाही. २९ वर्षीय फलंदाज संपूर्ण दौऱ्यात संघासोबत राहिला, परंतु संधीची त्याला आस होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 08, 2025 | 11:13 AM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामन्याची कसोटी मालिका पार पडली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील नुकत्याच संपलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २-२ अशी बरोबरीत सुटली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात ६ धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली. यामध्ये अनेक खेळाडू जखमी झाले त्यामुळे त्यांच्या जागेवर अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळाली. तर काही खेळाडू संघामध्ये असेही होते ज्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये भारताचा कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, अभिमन्यू ईश्वरण या खेळाडूंना एकही सामना खेळण्याची संधी या दौऱ्यावर मिळाली नाही. पाचवी सामन्यांमध्ये कुलदीप यादव ला संघामध्ये संधी का मिळाली नाही यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्याचबरोबर साई सुदर्शन यांनी फार काही चांगली कामगिरी केली नाही परंतु त्याला या मालिकेत तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर करून नायरने देखील विशेष कामगिरी केली नाही त्याने या मालिकेमध्ये एक अर्धशतक झळकावले आहे. 

IND vs AUS : भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा अंडर-19 संघ जाहीर! 2 कसोटी…3 एकदिवसीय सामने खेळणार

भारताच्या संघामध्ये असा एक खेळाडू आहे ज्याला मागील अनेक वर्षांपासून प्लेइंग इलेव्हनमध्ये एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने अजून कोण टीम इंडियासाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलेले नाही. मालिकेदरम्यान टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये अनेक बदल केले, परंतु अभिमन्यू ईश्वरनला खेळण्याची संधी दिली नाही. २९ वर्षीय फलंदाज संपूर्ण दौऱ्यात संघासोबत राहिला, परंतु संधीची त्याला आस होती. मुख्य मालिकेपूर्वी त्याने दौऱ्यातील दोन सराव सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली.

ओव्हल कसोटीत भारताचे अनेक प्रमुख खेळाडू जखमी झाले होते आणि प्लेइंग ११ मध्ये अनेक बदल करण्यात आले होते, परंतु अभिमन्यू ईश्वरन निराश झाला होता. त्याला संधी मिळाली नाही. यूट्यूब चॅनलवर विकी लालवाणीशी बोलताना, ईश्वरनचे वडील रंगनाथन परमेश्वरन ईश्वरन यांनी त्यांच्या मुलाच्या निराशेबद्दल खुलासा केला. रंगनाथन म्हणाले, ‘अभिमन्यू ईश्वरनची निवड न झाल्यामुळे तो निराश झाला होता. मी त्याला फोन केला तेव्हा तो म्हणाला, ‘बाबा, मला अजूनही स्थान मिळालेले नाही.’ तथापि, संघात निवड न झाल्याने, ईश्वरनने हार मानली नाही आणि तो त्याचे सर्व लक्ष आगामी स्थानिक हंगामावर केंद्रित करत आहे.

ZIM vs NZ 2nd Test: पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावावर, गोलंदाजांनंतर फलंदाजांनी केला कहर

वडील म्हणाले, ‘अभिमन्यू ईश्वरन दुलीप ट्रॉफीच्या तयारीसाठी बंगळुरूला गेला आहे. तो तिथे १०-१२ दिवस घालवेल. त्यानंतर तो काही काळ डेहराडूनला येईल आणि परत येईल. तो काळजीत होता, पण तो म्हणाला, ‘मी हे स्वप्न २३ वर्षांपासून जगत आहे आणि एक-दोन सामन्यांमध्ये निवड न झाल्याने ते भंग होणार नाही.’

Web Title: Abhimanyu easwaran father reveals emotional conversation with his son

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • cricket
  • India vs England
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…
1

कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…

Women’s World Cup Point Table : 2025 च्या विश्वचषक उपांत्य फेरीसाठी टीम इंडिया कशी पात्र ठरू शकते? जाणून घ्या समीकरण
2

Women’s World Cup Point Table : 2025 च्या विश्वचषक उपांत्य फेरीसाठी टीम इंडिया कशी पात्र ठरू शकते? जाणून घ्या समीकरण

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आकाश चोप्राने केली ICC कडे मागणी! DLS पद्धतीत बदल करा…
3

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आकाश चोप्राने केली ICC कडे मागणी! DLS पद्धतीत बदल करा…

PCB ची मोठी कारवाई! पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला, मोहम्मद रिझवानकडून काढून घेतले कर्णधारपद
4

PCB ची मोठी कारवाई! पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला, मोहम्मद रिझवानकडून काढून घेतले कर्णधारपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.