फोटो सौजन्य – X
झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना झाला आहे, यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने पहिला सामना जिंकुन 1-0 अशी आघाडी घेतली आहे. झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस आता संपला आहे. पहिला दिवस पूर्णपणे न्यूझीलंड संघाच्या नावावर होता. प्रथम गोलंदाजांनी आणि नंतर फलंदाजांनी कहर केला. खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने ४९ धावांची आघाडी घेतली आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅट हेन्री आणि पदार्पणाची कसोटी खेळणारे झाचेरी फॉल्क्स यांनी निर्माण केलेल्या वादळामुळे झिम्बाब्वेचा संघ पहिल्या डावात १२५ धावांवर बाद झाला. झिम्बाब्वेकडून ब्रेंडन टेलरने सर्वाधिक ४४ धावा केल्या. त्याच्याशिवाय यष्टीरक्षक क्रेग एर्विनने ३३ धावांची नाबाद खेळी केली.
A 162-run opening stand between Devon Conway (79*) and Will Young (74) to give us a 49-run lead by stumps.
Conway & Jacob Duffy (8*) will resume at the crease tomorrow. Scorecard | https://t.co/DnWSGE9t8b #ZIMvNZ #CricketNation 📷 = Zimbabwe Cricket pic.twitter.com/BTdrQ9rtdM
— BLACKCAPS (@BLACKCAPS) August 7, 2025
निक वेल्च आणि शॉन विल्यम्स यांनी प्रत्येकी ११ धावा केल्या. कर्णधार क्रेग एर्विनने २८ चेंडूत ७ धावांची खेळी केली. सिकंदर रझा यांनी ५ धावा केल्या. ब्रायन बेनेट आणि ट्रेवर ग्वांडू यांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. विन्सेंट मासेकेसा यांनी १, ब्लेसिंग मुझाराबानी यांनी ३ आणि तनाका चिवांगाने ४ धावा केल्या. मॅट हेन्रीने ५ आणि झाचेरी फॉल्क्सने ४ बळी घेतले. मॅथ्यू फिशरने १ बळी घेतला.
पहिल्या डावात न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. ट्रेवर ग्वांडूने ही भागीदारी मोडली. त्याने विल यंगला बाद केले. यंगने १०१ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ११ चौकार निघाले. खेळ संपेपर्यंत डेव्हॉन कॉनवे ७९ धावांवर आणि जेकब डफी ८ धावांवर नाबाद आहेत. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड मोठ्या धावसंख्येवर लक्ष केंद्रित करेल.
दुसऱ्या टोकाकडून मॅट हेन्रीला २३ वर्षीय युवा गोलंदाज जॅक फौल्क्सचीही चांगली साथ मिळाली. फौल्क्सने १६ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त ३८ धावा देत ४ बळी घेतले. फौल्क्सने शॉन विल्यम्स, कर्णधार क्रेग एर्विन आणि सिकंदर रझा सारख्या मोठ्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. झिम्बाब्वेकडून टेलरने सर्वाधिक ४४ धावा केल्या, तर तफाडझ्वा त्सिगा ३३ धावा करून नाबाद राहिला.