फोटो सौजन्य – X
भारताच्या युवा संघाचा नुकताच इंग्लड दौरा पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने या दौऱ्यावर कमालीची कामगिरी केली होती. यामध्ये भारताच्या संघाने एकदिवसीय मालिका जिंकली, तर कसोटी मालिका अनिर्णयित राहिली. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या युवा संघांमध्ये मालिका रंगणार आहे. टीम इंडियाची घोषणा आधीच झाली आहे आणि आता ऑस्ट्रेलियाच्या अंडर १९ संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. मोठी गोष्ट म्हणजे भारतीय वंशाचे दोन खेळाडू देखील पिवळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसतील.
ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावर पोस्ट करून भारताविरुद्ध खेळणाऱ्या १५ सदस्यीय अंडर-१९ संघाची घोषणा केली आहे. भारतीय वंशाचे दोन खेळाडू यश देशमुख आणि आर्यन शर्मा ऑस्ट्रेलियाच्या जर्सीमध्ये खेळतील.
ऑस्ट्रेलियन अंडर-१९ संघ: सायमन बज, अॅलेक्स टर्नर, स्टीव्ह होगन, विल मलाज्झुक, यश देशमुख, टॉम होगन, आर्यन शर्मा, जॉन जेम्स, हेडन शिलर, चार्ल्स लॅचमंड, बेन गॉर्डन, विल बॅरोम, केसी बार्टन, अॅलेक्स ली यंग आणि जेडेन ड्रेपर
प्रवास राखीव: झेड हॉलिक, टॉम पॅडिंग्टन आणि ज्युलियन ऑसबोर्न
ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघातील सामना कधी होईल?
ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या युवा खेळाडूंमधील मालिका २१ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. दोन्ही १९ वर्षांखालील संघ एकूण ३ एकदिवसीय सामने आणि २ चार दिवसांचे कसोटी सामने खेळणार आहेत. संपूर्ण वेळापत्रक खाली दिले आहे:
पहिला युवा एकदिवसीय सामना: २१ सप्टेंबर २०२५ (इयान हीली ओव्हल, ब्रिस्बेन)
दुसरा युवा एकदिवसीय सामना: २४ सप्टेंबर २०२५ (इयान हीली ओव्हल, ब्रिस्बेन)
तिसरा युवा एकदिवसीय सामना: २६ सप्टेंबर २०२५ (इयान हीली ओव्हल, ब्रिस्बेन)
The next batch of future stars ✨ Congrats to all selected in a 15-man U19 squad ahead of an upcoming series against the India U19s in Brisbane and Mackay. pic.twitter.com/PoCa2d2Szk — Cricket Australia (@CricketAus) August 8, 2025
पहिली युवा कसोटी: ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ (इयान हिली ओव्हल, ब्रिस्बेन)
दुसरी युवा कसोटी: ७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ (ग्रेट बॅरियर रीफ अरेना, मॅके)
भारतीय अंडर-१९ संघाची घोषणा एका आठवड्यापूर्वी झाली होती. गेल्या आठवड्यात बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. आयुष म्हात्रे भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. वैभव सूर्यवंशीसह संघात अनेक प्रतिभावान नावे आहेत.
भारतीय 19 वर्षाखालील संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, नमन पुष्पनजीत पटेल, हेमन कुमार पटेल, हेन कुमार, डी. खिलन पटेल, उद्धव मोहन आणि अमन चौहान