
Abhishek Sharma-Smriti won the lottery for honorarium! Received special honor from ICC; Read in detail
हेही वाचा : Eng vs NZ T20 series: इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन घोषित! न्यूझीलंडविरुद्ध ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
अभिषेक शर्माने प्रामुख्याने आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करून त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याचे आणि सातत्यतेचे प्रदर्शन घडवले. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, आयसीसीने सप्टेंबर २०२५ साठी पुरुष खेळाडू म्हणून अभिषेक शर्माला “महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू” म्हणून निवडले आहे. हा पुरस्कार त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मानले जात आहे.
महिला क्रिकेटमध्ये, स्मृती मानधनाने सप्टेंबर महिन्यात आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग मोठे डाव खेळून संघाला विजयाच्या मार्गावर पोहचवले. तिने तीन सामन्यात १२५, ११७ आणि ५८ अशा धावा केल्या, तिच्या सातत्यपूर्ण फॉर्म आणि तंत्राचे प्रदर्शन तिने सर्वांना घडवले. या कामगिरीची दखल घेत, आयसीसीने तिला महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून गौरवले आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अभिषेक शर्माने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, आयसीसीकडून सन्मानित होणे ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. संघाच्या विजयात त्याच्या कामगिरीचे योगदान आहे याचा आनंद असून संघासोबत खेळणे आणि आव्हानांना तोंड देणे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे, असे देखील त्याने सांगितले. तर स्मृती मानधना म्हणाली की, महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार स्वीकारून मला सन्मानित झाल्याचे वाटत आहे. हा सन्मान तिला खेळाडू म्हणून वाढत राहण्यासाठी आणि तिच्या क्षमता आणखी विकसित करण्यासाठी प्रेरणा देत आहे.
हेही वाचा : IND VS AUS : ऑस्ट्रेलियाची आता खैर नाही! ‘रो-को’ने सराव सत्रात मैदानात गाळला घाम;पहा Video
अभिषेक शर्माने २०२५ च्या आशिया कपमध्ये सात सामन्यांमध्ये ३१४ धावा फटकावल्या. यामध्ये त्याने तीन अर्धशतके झळकवली. त्याची सरासरी ४४.८५ होती, जी त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध करते. तर मानधना यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे १२५, ११७ आणि ५८ धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंच्या सातत्यपूर्ण चमकदार खेळींमुळे त्यांच्या वैयक्तिक क्षमतांचे प्रदर्शन तर झालेच, शिवाय संघाच्या कामगिरीलाही नवीन उंचीवर पोहचवले आहे.