इंग्लंड टिम(फोटो-सोशल मीडिया)
England’s playing XI against New Zealand : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपला प्लेइंग इलेव्हन घोषित केला आहे. हा सामना शनिवारी, १८ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात हॅरी ब्रूक इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. संघाने फलंदाजीच्या क्रमात काही बदल देखील केले आहेत. फिल साल्ट आणि जोस बटलर सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही यष्टीरक्षक-फलंदाज त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत आणि संघ त्यांच्याकडून जलद सुरुवातीची अपेक्षा करणार आहे.
हेही वाचा : IND vs AUS: कशी असेल पर्थची खेळपट्टी? कोण मारेल बाजी? पहिली झलक समोर आली; वाचा सविस्तर
युवा फलंदाज जेकब बेथेलला मधल्या फळीत स्थान देण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांच्या फिरकी गोलंदाजीने संघाला अतिरिक्त पर्याय म्हणून उपलब्ध झाले आहेत. आगामी टी२० विश्वचषकापूर्वी संभाव्य संयोजनांचा शोध घेण्यासाठी संघात अनुभवी खेळाडूंसह काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. इंग्लंड हा सामना जिंकून मालिकेमध्ये आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर न्यूझीलंड दमदार खेळ दाखवत इंग्लिश संघाला आव्हान देण्यासाठी तयार आहे.
टॉम बँटन देखील आता इंग्लंडच्या टी-२० संघात परतत आहे आणि सॅम करन आणि जॉर्डन कॉक्ससह मधल्या फळीला बळकटी देणारे खेळाडू आहेत. ब्रायडन कार्स आणि ल्यूक वूड हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहेत. तर लियाम डॉसन आणि आदिल रशीद फिरकी गोलंदाजीची जबाबदारी पार पाडतील.
इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील सामने सर्व फॉरमॅटमध्ये अत्यंत रोमांचक होत आले आहेत. टी-२० फॉरमॅटमध्ये, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २७ टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने १६ विजय मिळवले आहेत.तर न्यूझीलंडने १० सामन्यात विजय मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
हेही वाचा : आनंदाची बातमी! 2025 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार, ‘या’ शहराला मिळाला यजमानपदाचा मान
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेतील तीन सामने १८, २० आणि २३ ऑक्टोबर रोजी खेळले जाणार आहेत. पहिले दोन सामने क्राइस्टचर्चमध्ये आणि शेवटचा सामना ऑकलंडमध्ये खेळला जाईल. ही मालिका टी-२० कर्णधार म्हणून हॅरी ब्रूकसाठी महत्वाची असणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरने टी-२० मध्ये मोठ्या संघांविरुद्ध आपली छाप पाडली आहे. ही मालिका ब्रूकच्या नेतृत्व क्षमतेची ओळख करून देणार आहे.