
Until when can changes be made to the Indian squad for the T20 World Cup? Are you aware of the ICC rules? Read in detail.
Indian squad for the 2026 T20 World Cup: बीसीसीआयकडून २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा २०२६ची विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. त्यामुळे आता भारतीय संघाला आपले जेतेपद कायम राखण्याची चांगली संधी चालून आली आहे. भारतीय संघ आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. आज जाहीर करण्यात आलेला संघ प्राथमिक मानला जाईल, कारण आयसीसीचे नियम वर्षाच्या अखेरीस संघात बदल करण्यास परवानगी देतात. त्यामुळे या संघात काही बदल संभवतात.
आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व संघांना कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या किमान एक महिना आधी त्यांची अंतिम १५ सदस्यीय संघ यादी सादर करणे आवश्यक असते. २०२६ चा टी-२० विश्वचषक स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व देशांना जानेवारीच्या सुरुवातीला त्यांचे प्राथमिक संघ सादर करणे आवश्यक असणार आहेत. बीसीसीआय आज १५ खेळाडूंची नावे जाहीर केले आहेत. परंतु निवड समितीला दिलेल्या अंतिम मुदतीत बदल करण्याचा पूर्ण अधिकार असणार आहे.
विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता आयसीसीच्या नियमांनुसार, बीसीसीआय ७ जानेवारी २०२६ पर्यंत अतिरिक्त परवानगीशिवाय आपल्या संघात बदल करू शकते. या दरम्यान, जर एखाद्या खेळाडूचा फॉर्म खालावला किंवा संघाचे संतुलन बिघडले तर निवडकर्त्यांना संघात बदल करता येणार आहेत.परंतु, ७ जानेवारीनंतर कोणत्याही बदलांसाठी बीसीसीआयला आयसीसी तांत्रिक समितीची मान्यता घेणे बंधनकारक असणार आहे. अंतिम मुदतीनंतर बदल सामान्यतः गंभीर दुखापत झाल्यासच शक्य असतात, ज्यासाठी वैद्यकीय अहवाल गरजेचं असतो.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, इशान किशन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.